साहित्यिक ते दिग्दर्शक जाणून घ्या रत्नाकर मतकरींच्या विपुल लेखनाबद्दल

साहित्यिक ते दिग्दर्शक जाणून घ्या रत्नाकर मतकरींच्या विपुल लेखनाबद्दल

https://t.me/LoksattaOnline

ज्येष्ठ साहित्यिक, नाटककार, दिग्दर्शक, निर्माते, बालनाटय़ चळवळीचे अध्वर्यु, स्तंभलेखक रत्नाकर मतकरी यांचे काल रात्री निधन झाले. कला, साहित्य क्षेत्रात त्यांचे मोठे योगदान होते. १९५५ मध्ये वयाच्या सोळाव्या वर्षी त्यांनी ‘वेडी माणसं’ ही एकांकिका लिहिली. तेव्हा ते एल्फिन्स्टन कॉलेजला पहिल्या वर्षांला होते. त्यापूर्वी त्यांनी शाळेत असताना वर्गाच्या हस्तलिखितासाठी ‘पन्नादाई’ ही एकांकिका लिहिली होती आणि टागोरांच्या ‘लिव्हिंग ऑर डेड’ या गूढकथा सदृश कथेचा अनुवाद ‘कदम्बिनी’ या नावाने केला होता.

रत्नाकर मतकरी हे अष्टपैलू व्यक्तीमत्व होते. नाटक, एकांकिका, बालनाट्य, कथा, गूढकथा, कादंबरी, ललित लेख, वैचारिक साहित्य यामध्ये त्यांनी विपुल लेखन केले. त्याचबरोबर ते रंगकर्मी, दिग्दर्शक, निर्माता आणि चित्रकार देखील होते. त्यांनी महाराष्ट्रात बालरंगभूमीची मुहूर्तमेढ रोवून, सुमारे तीस वर्षे पदरमोड करून बालनाट्यांची निर्मिती केली. झोपडपट्टीतीतील मुलांना त्यांना ’नाटक’ शिकवले.

२००१ साली पुण्यामध्ये झालेल्या बालकुमार साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. बालनाटयापासून प्रायोगिक, व्यावसायिक अशी सर्व प्रकारची नाटके त्यांनी लिहिली. ‘माझं काय चुकलं?’ ‘लोककथा ७८’, ‘आरण्यक’, ‘चार दिवस प्रेमाचे’, ‘घर तिघांचे हवे’, ‘बकासुर’ आदी नाटकांतून त्यांच्या चतुरस्र शैलीचा वानवळा मिळतो. त्यांनी ‘बालनाटय़’ आणि ‘सूत्रधार’ या संस्था स्थापन करून त्याद्वारे निर्मिती व दिग्दर्शनही केले.

रत्नाकर मतकरी यांची प्रकाशित पुस्तके

अचाटगावची अफाट मावशी (बालसाहित्य)

अजून यौवनात मी (नाटक)

अ‍ॅडम

अंतर्बाह्य

अपरात्र (कथासंग्रह)

अलबत्या गलबत्या (नाटक, बालसाहित्य)

अलिबाबाचं खेचर एकोणचाळीसावा चोर (बालसाहित्य)

अलल् घुर्र घुर्र (बालसाहित्य)

अंश (कथासंग्रह)

आचार्य सर्वज्ञ (नाटक, बालसाहित्य)

आत्मनेपदी (लेखकाने स्वतःच्या घडणीबद्दल, लिखाणाबद्दल, नाट्यचळवळीबद्दल, स्वतःवर प्रभाव टाकणाऱ्या माणसांबद्दल लिहिलेले मनोगत)

आम्हाला वेगळं व्हायचंय (नाटक)

आरण्यक (महाभारतावरील कथानकावर आधारित नाटक. या नाटकाच्या पुस्तकाला दुर्गा भागवत यांची प्रस्तावना आहे.)

आरशाचा राक्षस (बालनाट्य)

इंदिरा (नाटक, लेखन आणि दिग्दर्शन - रत्‍नाकर मतकरी)

इन्व्हेस्टमेंट (या कथासंग्रहातील ’इन्व्हेस्टमेंट’ या कथेवर याच नावाचा मराठी चित्रपट आहे.)

एकदा पहावं करून (मूळ इंग्रजी नाटकाचा स्वैर अनुवाद असलेले नाटक, गुजराथीत हे नाटक ’बे लालना राजा’ या नावाने रंगभूमीवर आले आहे, दिग्दर्शक : अरविंद जोशी)

एक दिवा विझताना (कथासंग्रह)

एक होता मुलगा (बालनाटक)

ऐक टोले पडताहेत (गूढकथासंग्रह)

कबंध (कथासंग्रह)

कर्ता-करविता (नाटक)

कायमचे प्रश्न (वैचारिक)

खेकडा (कथासंग्रह)

खोल खोल पाणी (नाटक)

गहिरे पाणी (रंगमंचावर अनेकदा सादर झालेल्या कथांचा संग्रह. दूरचित्रवाणीवरही या कथा ५०हून अधिक भागांत क्रमशः प्रदर्शित झाल्या)

गाऊ गाणे गमतीचे (बालगीते)

गांधी : अंतिम पर्व (नाटक)

गोंदण (कथासंग्रह)

घर तिघांचं हवं

चटकदार - ५+१ (बालसाहित्य)

चि.सौ.कां.चंपा गोवेकर (नाटक)

चमत्कार झालाच पाहिजे ! (बालसाहित्य)

चार दिवस प्रेमाचे (ललित)

चूकभूल द्यावी घ्यावी (एकांकिका)

चोर आणि चांदणं (चतुर सारिकेचा वग, चोर आणि चांदण, प्रेमपुराण आणि बेडरूम बंद या चार विनोदी एकांकिकांचा संग्रह)

जस्ट अ पेग (एकांकिका)

जादू तेरी नझर (नाटक)

जावई माझा भला (नाटक)

जोडीदार

जौळ (कथासंग्रह)

ढगढगोजीचा पाणी प्रताप (बालसाहित्य)

तन-मन (नाटक)

तृप्त मैफल (कथासंग्रह)

दहाजणी

दादाची गर्ल फ्रेंड

२ बच्चे २ लुच्चे (बालसाहित्य)

धडपडे बडबडे मारकुटे आणि मंडळी (बालसाहित्य)

निजधाम (कथासंग्रह)

निम्माशिम्मा राक्षस (बालसाहित्य)

निर्मनुष्य (कथासंग्रह)

निवडक मराठी एकांकिका

परदेशी (कथासंग्रह)

पानगळीचं झाड

पोर्ट्रेट आणि दोन एकांकिका

प्रियतमा (नाटक)

प्रेमपुराण (एकांकिका)

फॅंटॅस्टिक

सरदार फाकडोजी वाकडे (बालसाहित्य)

फाशी बखळ (कथासंग्रह)

बकासुर (नाटक)

बारा पस्तीस

बाळ, अंधार पडला

बृहन्महाराष्ट्र मंडळ शिकागो संमेलन २०११ - भाषण

बेडरूम बंद (एकांकिका)

ब्रह्महत्या

भूत-अद्‌भुत (बालसाहित्य)

मध्यरात्रीचे पडघम (कथासंग्रह)

महाराजांचा महामुकुट (बालनाट्य)

महाराष्ट्राचं चांगभलं (ललित)

माकडा माकडा हुप ! (बालसाहित्य)

मांजराला कधीच विसरू नका (नाटक, बालसाहित्य)

माझे रंगप्रयोग (७०४ पानी ग्रंथ - आत्मकथन, अनुभव कथन, आठवणी)

माणसाच्या गोष्टी भाग १, २.

मृत्युंजयी (गूढकथासंग्रह)

यक्षनंदन

रंगतदार ६+१ (आचार्य सर्वज्ञ, आरशाचा राक्षस, एक होता मुलगा, महाराजांचा महामुकुट, मांजराला कधीच विसरू नका !, राजकन्येचा कावळ्याचा फार्स, हुशार मुलांचे नाटक या ७ बाल-नाटिकांचा संग्रह)

रंगयात्री

रंगरूप-रंगभूमी चिकित्सा

रंगांधळा (कथासंग्रह)

रत्‍नपंचक

रत्नाकर मतकरी यांच्या गोंदण, शांततेचा आवाज आणि सोनेरी सावल्या या ३ ललित पुस्तकांचा संच

रत्‍नाकर मतकरी यांच्या श्रेष्ठ कथा : भाग १, २. (संपादक गणेश मतकरी)

रत्‍नाक्षरं - रत्‍नाकर मतकरी : व्यक्ती आणि साहित्य (ललित)

रसगंध (माहितीपर)

राजकन्येचा कावळ्याचा फार्स (बालनाटक)

राक्षसराज झिंदाबाद (बालसाहित्य)

शाबास लाकड्या (बालसाहित्य)

लोककथा - ’७८

विठो रखुमाय (नाटक)

वेडी माणसं (एकांकिका)

व्यक्ती आणि वल्ली (नाटक) (सहलेखक - पु.ल. देशपांडे)

शनचरी (रत्नाकर मतकरी यांच्या निवडक गूढकथा, संपादक - डाॅ.कृष्णा नाईक)

शब्द ..शब्द ..शब्द

शांततेचा आवाज (ललित)

शूऽऽ कुठं बोलयचं नाही (नाटक, मूळ इंग्रजी नाटकावर आधारित))

संदेह (कथासंग्रह)

संभ्रमाच्या लाटा (कथासंग्रह)

सहज (कथासंग्रह)

साटंलोटं (नाटक)

सुखान्त (नाटक)

सोनेरी मनाची परी

सोनेरी सावल्या (ललित)

स्पर्श अमृताचा (नाटक)

स्वप्नातील चांदणे (परिकथासंग्रह)

हसता हसविता (ललित)

हुशार मुलांचे नाटक (बालनाटिका)

रत्नाकर मतकरी यांना मिळलेले पुरस्कार

१९७८ अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेचा ज्योत्स्ना भोळे पुरस्कार

१९८६ उत्कृष्ठ पटकथेसाठी दादासाहेब फाळके पुरस्कार (चित्रपट : माझं घर माझा संसार)

नाट्यदर्पणचा नाना ओक पुरस्कार

१९८५ अखिल भारतीय नाट्यपरिषदेचा देवल पुरस्कार

१९८५ राज्य शासनाचा अत्रे पुरस्कार

१९९९ नाट्यव्रती पुरस्कार

२००३ संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार

२०१६ ‘माझे रंगप्रयोग’ या ग्रंथासाठी इंदिरा-भालचंद्र पुरस्कार

२०१६ शांता शेळके पुरस्कार

२०१८ साहित्य अकादमी बाल साहित्य पुरस्कार

Report Page