नवं संकट? चीनमध्ये हजारो लोकांना ब्रुसेलोसिसचा संसर्ग; जाणून घ्या काय आहे हा आजार

नवं संकट? चीनमध्ये हजारो लोकांना ब्रुसेलोसिसचा संसर्ग; जाणून घ्या काय आहे हा आजार

https://t.me/LoksattaOnline

वायव्य चीनमध्ये ब्रुसेलोसिसचा (brucellosis) संसर्ग झालेले हजारो रुग्ण सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. एका औषध निर्मिती कंपनीमधून लीक झालेल्या रसायनांमुळे विषाणूमुळे होणाऱ्या या आजाराचे हजारो रुग्ण आढळून आल्याचे सांगण्यात येत आहे. गान्सू प्रांतातील लॅन्झू शहरातील आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार ब्रुसेलोसिसचे तीन हजार २३५ रुग्ण आढळून आले आहेत. ब्रुसेला या विषाणुमुळे हा आजार होतो असं सांगण्यात आलं आहे.

ग्लोबल टाइम्समध्ये प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार, २४ जुलै २०१९ ते २० ऑगस्टदरम्यान झॉनगुम लॅन्झू येथील जैविक औषधनिर्मिती करणाऱ्या कारखान्यामध्ये लस निर्मिती करण्याचं काम केलं जात होतं. लॅन्झू येथील प्राणी संशोधन केंद्राजवळ असणाऱ्या या कारखान्यामध्ये प्राण्यांना होणाऱ्या आजारावर उपचार करण्यासाठी ब्रुसेला विषाणुंच्या मदतीने औषधांची निर्मीत करण्यात येत होती. याच औषध निर्मितीदरम्यान कारखान्यातील धूर आणि गॅस प्रक्रिया न करता तो बाहेर सोडण्यात आला. त्यामधूनच लोकांना आता आजाराची बाधा झाली आहे.

हवेमध्ये सोडण्यात आलेल्या या गॅसमधून विषाणूचा प्रसार झाला. या कालावधीमध्ये दोरदार वारा वाहत असल्याने मोठ्या क्षेत्रावर या विषाणूचा प्रसार झाला. कारखान्यामधून बाहेर फेकण्यात आलेल्या धूरामध्ये आणि गॅसमध्ये बॅक्टेरियांबरोबरच प्रक्रिया करण्यात आलेल्या रसायने आणि इतर द्रव्याचे सूक्ष्म थेंबही (एरोसोल्स, aerosols) होते. हे वाऱ्याबरोबर वाहत गेल्याने अनेकांना ब्रसेलोसिसचा संसर्ग झाला आहे.

काय आहे हा आजार?

ब्रुसेलोसिसला मेडिटेरियन फिव्हर असंही म्हटलं जातं. ब्रेसेला विषाणू पाहून मानवाला या आजाराचा संसर्ग होतो. गुरं, शेळ्यांच्या माध्यमातून मानवाला या विषाणूचा संसर्ग होतो. डोकं दुखणे, दिवसाआड ताप येणे, घसा खवखवणे ही या आजाराची लक्षणं आहेत. चीनमधील आरोग्य खात्याने दिलेल्या माहितीनुसार या विषाणूचा मानवाच्या प्रजनन क्षमतेवरही परिणाम होतो. युरोपियन सेंटर फॉर डिसीज प्रिव्हेन्शन अॅण्ड कंट्रोलने दिलेल्या माहितीनुसार वेळीच उपचार न मिळाल्याने ब्रसेलोसिसमुळे मृत्यूही होऊ शकतो.

"औषधांच्या मदतीने दिर्घकालीन उपाचारानंतर ब्रुसेलोसिस आजार ठीक होऊ शकतो. प्राण्यांना लस देणे, संसर्ग झालेल्या प्राण्यांना मारुन टाकणे तसेच दूध वगैरे सारखे दुग्धजन्य पदार्थांचे शुद्धीकरण करणे या माध्यमातून या विषाणूचा संर्सग रोखता येतो," असं युरोपियन सेंटर फॉर डिसीज प्रिव्हेन्शन अॅण्ड कंट्रोलने म्हटलं आहे. चीनमधील झिंग्वा या सरकारी वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार झॉनगुम लॅन्झू येथील जैविक औषधनिर्मिती करणाऱ्या कारखान्यामधून नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला संसर्ग सुरु झाल्याचे पहिले वृत्त समोर आलं होतं. त्यानंतर या रुग्णांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे. डिसेंबर पर्यंत ब्रुसेलोसिसचे १८१ रुग्ण आढळून आलं होतो. यामध्ये विद्यार्थी आणि शिक्षकांचाही समावेश होता. १९८० च्या दशकामध्ये चीनमध्ये ब्रुसेलोसिसचा संसर्गाच्या घटना अनेकदा घडल्या आहेत..

◉𝐉𝐨𝐢𝐧 𝐭𝐡𝐞 𝐜𝐡𝐚𝐧𝐧𝐞𝐥 𝐚𝐧𝐝 𝐬𝐮𝐠𝐠𝐞𝐬𝐭 𝐲𝐨𝐮𝐫 𝐟𝐫𝐢𝐞𝐧𝐝𝐬 𝐭𝐨 𝐣𝐨𝐢𝐧 𝐭𝐡𝐞 𝐜𝐡𝐚𝐧𝐧𝐞𝐥 𝐥𝐢𝐧𝐤 ↡↡

https://t.me/LoksattaOnline

Report Page