द अल्केमिस्ट

द अल्केमिस्ट


📚 पुस्तक - द अल्केमिस्ट ✒️ लेखक - पावलो कोएलो'द अल्केमिस्ट' हे जागतिक पातळीवर गाजलेले व गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये विक्रमी खपासाठी नोंद झालेले पुस्तक आहे. या पुस्तकाने वाचकाच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे.याचा मराठी अनुवाद नितीन कोतापल्ले यांनी केला आहे. 'द अल्केमिस्ट' ही सँतीयागो नावाच्या मेंढपाळाची कहाणी आहे. तो एका लहान खेड्यात राहत असतो. मेंढ्यांची देखभाल करणे हेच त्याचे दिवसभराचे काम होते. त्याला सतत एक विचित्र स्वप्न पडत असे. व स्वप्नात नक्कीच काहीतरी भविष्य दडलेले आहे असे त्याला वाटायचे. म्हणून तो शेजारच्या गावातील जोतिष बाईला स्वप्नाचा अर्थ विचारतो. ती सांगते की इजिप्तमध्ये पिरॅमिड पाशी त्याला खजिना मिळणार आहे. मग तो खजिना शोधण्यासाठी इजिप्तला जातो या प्रवासाचे वर्णन पुस्तकात केलेले आहे. सँतीयागोला प्रवासात आधी सालेमचा राजा भेटतो. तो सँतीयागो त्याच्या सर्व मेंढ्या विकायला सांगतो. व तो त्याला आपल्याला आयुष्याकडून अपेक्षित असलेले ध्येय ( personal legend ) बद्दल माहिती सांगतो. यातून सॅनला समजते की, personal legend म्हणजे आपण आहोत त्याहून अधिक चांगले, परिपक्व होतो, तेव्हा आपल्याला आयुष्याचे ध्येय, सार समजतं. जेव्हा आपण एखादी गोष्ट मनापासून करतो तेव्हा संपूर्ण जग आपल्याला ती गोष्ट पूर्ण करण्यास मदत करते.


प्रवासात त्याला अनेक लोक भेटतात. शेवटी त्याला त्याचा खरा गुरू भेटतो. व तो त्याचे पुढील मार्गदर्शन करतो. संपूर्ण प्रवासात त्याला अनेक कठीण व खडतर अडथळे येतात व तो अडथळे पार करून अखेर पिरॅमिड पर्यंत पोहचतोच. तो पिरॅमिड पाशी खूप वेळ खणत असतो. परंतु त्याला काहीही सापडत नाही नंतर काही लोकांची टोळी तेथे येते व त्यांना त्याच्याकडे थोडेसे सोनं सापडते. व त्यांना वाटते तो आणखी सोने शोधत आहे म्हणून त्याला आणखी खणायला लावतात. परंतु त्यांना काहीही सापडत नाही मग ते त्याच्याकडे सापडलेले थोडेसे सोने घेऊन निघून जातात. जाताना त्या टोळीचा मोरक्या म्हणतो "स्वप्न पडतात म्हणून सात समुद्र पार करून कोणीही येत नसत. मलाही एक स्वप्न सारखे पडते स्पेनमध्ये एका पडक्या चर्च जवळ झाडाखाली मेंढपाळ राहतात व त्या झाडाखाली खूप मोठा खजिना आहे. म्हणून त्यासाठी मी एवढ्या लांब जायचे का ? हे कोणी वेडाच करू शकतो तुझ्यासारखा. हे ऐकून सँतीयागोला खूप आनंद होतो जो खजिना त्याच्या जवळच होता त्या खजिन्याच्या शोधात तो सात समुद्र पार करून आलेला होता. तो नंतर त्याच्या गावी जाऊन झाडाखाली खणून पाहतो तर त्याला खरोखरच खजिना सापडतो. परंतु त्याला हे समजलेलं असतं की तो प्रवासात जे काही शिकला तोच त्याचा खजिना होता. तो रस्त्यात एका वीरान वाळवंटात अडकलेला असतो व बाहेर पडताना त्याला प्राण्यांची मदत होते व त्याला प्राण्यांची भाषा समजू लागलेली असते त्यासाठी काही परवलीचे शब्द असतात. संतियागोला आता जीवनाचा खरा अर्थ समजतो व आपला आनंद कशात आहे हे देखील समजते. खूप प्रेरणादायी पुस्तक आहे नक्की वाचा. पुस्तकपरिचय कसा वाटला ते comment करून नक्की कळवा.
@vastavmarathi

Report Page