ज्येष्ठ साहित्यिक शरणकुमार लिंबाळे यांना २०२० चा सरस्वती सन्मान पुरस्कार

ज्येष्ठ साहित्यिक शरणकुमार लिंबाळे यांना २०२० चा सरस्वती सन्मान पुरस्कार

https://t.me/LoksattaOnline

मराठीतील ज्येष्ठ साहित्यिक शरणकुमार लिंबाळे यांना २०२० या वर्षीचा सरस्वती सन्मान पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यांच्या ‘सनातन’ या कादंबरीला हा पुरस्कार जाहीर झाला आहे. १५ लाख रुपये, प्रशस्तीपत्रक आणि सन्मानचिन्ह असं या पुरस्काराचे स्वरूप आहे.

दिल्लीच्या के. के. बिर्ला फाउंडेशनकडून हा पुरस्कार दिला जातो. देशातल्या २२ भाषांमधील पुस्तकांचे अवलोकन करून दरवर्षी एका लेखकाला हा पुरस्कार दिला जातो. याआधी १९९३ मध्ये विजय तेंडुलकर व २००२ मध्ये महेश एलकुंचवार यांना हा पुरस्कार मिळाला होता.

१९९१ मध्ये केके बिर्ला फाउंडेशनच्यावतीने सुरू केलेला सरस्वती सन्मान पुरस्कार देशातील प्रतिष्ठित व सर्वोच्च साहित्यिक पुरस्कारांपैकी एक म्हणून ओळखला जातो.

शरणकुमार लिंबाळे यांची ४० पेक्षा अधिक पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत. तसेच, अक्करमाशी हे आत्मचरित्र देखील प्रसिद्ध आहे. १९८६ ते १९९२ या कालावधीत ते सोलापूरच्या आकाशवाणी केंद्रावर उद्घोषक म्हणून कार्यरत होते. त्यानंतर यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातून ते सेवानिवृत्त झाले.

◉𝐉𝐨𝐢𝐧 𝐭𝐡𝐞 𝐜𝐡𝐚𝐧𝐧𝐞𝐥 𝐚𝐧𝐝 𝐬𝐮𝐠𝐠𝐞𝐬𝐭 𝐲𝐨𝐮𝐫 𝐟𝐫𝐢𝐞𝐧𝐝𝐬 𝐭𝐨 𝐣𝐨𝐢𝐧 𝐭𝐡𝐞 𝐜𝐡𝐚𝐧𝐧𝐞𝐥 𝐥𝐢𝐧𝐤 ↡↡

https://t.me/LoksattaOnline

Report Page