उदारमतवादी राजकारणी

उदारमतवादी राजकारणी

https://t.me/LoksattaOnline

वाजपेयी व अडवाणी यांचे खंदे समर्थक असलेले जसवंतसिंह हे आधुनिक राजकीय विचार पुढे नेणारे होते. उदार लोकशाहीवादी नेता असलेल्या जसवंत यांना वाजपेयी यांच्या पंतप्रधान काळात महत्त्वाची पदे मिळाली. १९९८ ते २००४ या काळात त्यांनी संरक्षण, परराष्ट्र, अर्थ या तीन महत्त्वाच्या खात्यांचा कार्यभार सांभाळला. डिसेंबर १९९९ मध्ये कंदहार विमान अपहरण प्रकरणावेळी ते प्रवाशांच्या बदल्यात दहशतवाद्यांना सोडण्यासाठी विमानाने कंदहारला गेले होते. त्यामुळे त्यांच्या कारकीर्दीला धक्का बसला. मौलाना मसूद अझहर याच्यासह तीन जणांना आयसी ८१४ विमानातील १५० प्रवाशांच्या बदल्यात सोडण्यात आले होते. त्या वेळी दहशतवाद्यांनी एका प्रवाशाला ठार मारले होते. जसवंतसिंह यांना वाद नवीन नव्हते. त्यामुळे आठ दिवस चाललेल्या विमान अपहरण प्रकरणात त्यांच्यावर टीका झाली. खांद्यावर पट्टी असलेला शर्ट हे त्यांचे खास वैशिष्टय़. वाजपेयींच्या काळात १९९८ मध्ये पोखरण २ अणुचाचण्या करण्यात आल्या. त्यानंतर १९९९ मध्ये कारगिल संघर्ष झाला. भारत-पाकिस्तान यांच्यात आग्रा शिखर बैठक २००१ मध्ये झाली. त्याच वेळी अमेरिकेशी संबंधही अणुचाचण्यांनंतर ताणले गेले. लष्करी पार्श्वभूमी घेऊन आलेल्या जसवंत यांचे इंग्रजीवरचे प्रभुत्वही त्यांचे महत्त्व वाढवणारे ठरले. वाजपेयी यांच्या तेरा दिवसांच्या सरकारमध्ये ते अर्थमंत्री होते. भाजपने २००९ मध्ये त्यांना पक्षातून काढले तेव्हा त्यांनी महंमद अली जिना यांची प्रशंसा केली होती. २०१० मध्ये त्यांना पक्षात पुन्हा घेतले, पण राजस्थानातील बारमेर मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून लढल्याने त्यांना २०१४ मध्ये काढण्यात आले. जसवंत यांनी १९६५ मध्ये आठ वर्षांच्या सेवेनंतर लष्कराची नोकरी सोडली. वाजपेयी पंतप्रधान झाले तेव्हा १९९८ मध्ये त्यांना परराष्ट्र खाते मिळाले. त्या वेळी भारत व पाकिस्तान यांच्यात १९९९ मध्ये कारगिल संघर्ष झाला, २००१ मध्ये संसदेवर हल्ला व १९९८ मध्ये पाकिस्तानच्या अणुचाचण्या झाल्या. १९९८ ते २००२ या काळात परराष्ट्रमंत्री म्हणून त्यांनी अनेक घटना पाहिल्या. अमेरिकेबरोबरचे संबंध सुधारण्याचा प्रयत्न केला. कारण त्यानंतर २००० मध्ये अमेरिकी अध्यक्ष क्लिंटन भारतात आले होते. जुलै २००२ मध्ये जसवंत अर्थमंत्री झाले. त्या वेळी त्यांनी युनिट ट्रस्ट ऑफ इंडियाची फेररचना केली. २०१२ मध्ये ते एनडीएचे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार होते, पण त्यांचा यूपीएचे हमीद अन्सारी यांनी पराभव केला. अजमेरचे मेयो कॉलेज व खडकवासलाच्या एनडीएत त्यांचे शिक्षण झाले. २००४ -२००९ या काळात ते राज्यसभेत विरोधी पक्षनेते होते. साठच्या दशकात ते राजकारणात आले. सुरुवातीला त्यांना यश आले नाही, नंतर भैरोसिंह शेखावत हे त्यांचे गुरू होते. ते पाच वेळा राज्यसभेवर, तर चार वेळा लोकसभेवर निवडून गेले होते.

◉𝐉𝐨𝐢𝐧 𝐭𝐡𝐞 𝐜𝐡𝐚𝐧𝐧𝐞𝐥 𝐚𝐧𝐝 𝐬𝐮𝐠𝐠𝐞𝐬𝐭 𝐲𝐨𝐮𝐫 𝐟𝐫𝐢𝐞𝐧𝐝𝐬 𝐭𝐨 𝐣𝐨𝐢𝐧 𝐭𝐡𝐞 𝐜𝐡𝐚𝐧𝐧𝐞𝐥 𝐥𝐢𝐧𝐤 ↡↡

https://t.me/LoksattaOnline

Report Page