इशर अहलुवालिया यांचे निधन

इशर अहलुवालिया यांचे निधन

https://t.me/LoksattaOnline

नवी दिल्ली : प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ इशर अहलुवालिया (वय ७४) यांचे शनिवारी निधन झाले. त्यांनी १० महिने मेंदूच्या कर्करोगाशी दिलेली झुंज अखेर अपयशी ठरली.

१ ऑक्टोबरला त्यांचा ७५ वा वाढदिवस होता. त्यांच्या पश्चात पती व नियोजन आयोगाचे माजी उपाध्यक्ष मोंतेक सिंग अहलुवालिया, पुत्र पवन व अमन असा परिवार आहे.

अहलुवालिया यांनी आंतरराष्ट्रीय आर्थिक संबंध भारतीय संशोधन परिषदेच्या (आयसीआरआयईआर) अध्यक्ष व संचालक म्हणून काम केले होते. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीत त्यांच्या कारकीर्दीस सुरुवात झाली. नंतर त्या भारतात परत आल्या. त्यांनी इंडस्ट्रियल ग्रोथ इन इंडिया- स्टॅगनेशन सिन्स मिड सिक्स्टीज व प्रॉडक्टव्हिटी अँड ग्रोथ इन इंडियन मॅन्युफॅक्चरिंग, ट्रान्सफॉर्मिग अवर सिटीज-पोस्ट कार्ड्स ऑफ चेंज, अर्बनायझेशन इन इंडिया-चॅलेंजेस, अ‍ॅपॉरच्युनिटीज अँड दी वे फॉरवर्ड (संपादन) ही पुस्तके लिहिली.

त्या सेंटर फॉर पॉलिसी रिसर्च या संस्थेत प्राध्यापक होत्या. ‘ब्रेकिंग थ्रू- अ मेमॉयर बाय इशर जज अहलुवालिया’ हे त्यांचे पुस्तक गेल्याच महिन्यात प्रसिद्ध झाले होते. पंजाबच्या राज्य नियोजन मंडळाच्या त्या काही काळ उपाध्यक्षा होत्या.

◉𝐉𝐨𝐢𝐧 𝐭𝐡𝐞 𝐜𝐡𝐚𝐧𝐧𝐞𝐥 𝐚𝐧𝐝 𝐬𝐮𝐠𝐠𝐞𝐬𝐭 𝐲𝐨𝐮𝐫 𝐟𝐫𝐢𝐞𝐧𝐝𝐬 𝐭𝐨 𝐣𝐨𝐢𝐧 𝐭𝐡𝐞 𝐜𝐡𝐚𝐧𝐧𝐞𝐥 𝐥𝐢𝐧𝐤 ↡↡

https://t.me/LoksattaOnline

Report Page