‘आयसीसी’च्या पंच समितीत अनंतपद्मनाभन यांचा समावेश

‘आयसीसी’च्या पंच समितीत अनंतपद्मनाभन यांचा समावेश

https://t.me/LoksattaOnline

केरळचे माजी फिरकीपटू आणि पंच के. एन. अनंतपद्मनाभन यांचा ‘आयसीसी’च्या आंतरराष्ट्रीय पंचांच्या समितीत समावेश करण्यात आला आहे.

‘आयसीसी’च्या पंचांच्या समितीत स्थान मिळवणारे अनंतपद्मनाभन हे चौथे भारतीय पंच ठरले आहेत. सी. शामशुद्दीन, अनिल चौधरी आणि विरेंदर शर्मा यांचा यापूर्वी पंचांच्या समितीत समावेश करण्यात आला होता. ५० वर्षीय अनंतपद्मनाभन यांनी ‘आयपीएल’ तसेच अनेक स्थानिक स्पर्धामध्ये पंच म्हणून भूमिका बजावली आहे.

नितीन मेनन यांची आयसीसीच्या एलिट पॅनलमध्ये निवड झाल्यानंतर अनंतपद्मनाभन यांना आंतरराष्ट्रीय पॅनलमध्ये स्थान देण्यात आलं आहे. ESPNCricinfo ने यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे.

अनंतपद्मनाभन यांच्याव्यतिरीक्त आंतरराष्ट्रीय पॅनलमध्ये सी. शमशुद्दीन, अनिल चौधरी आणि विरेंद्र शर्मा या तीन पंचांचा समावेश आहे. अनंतपद्मनाभन हे भारतीय स्थानिक क्रिकेटमधले अनुभवी पंच म्हणून ओळखले जातात. आयपीएलमधील अनेक सामन्यांसह, अ श्रेणीच्या सामन्यांत अनंतपद्मनाभन यांनी पंच म्हणून काम पाहिलं आहे. केरळकडून १९८८ ते २००४ या काळात अनंतपद्मनाभन यांनी १०५ प्रथमश्रेणी सामने खेळले आहेत. केरळकडून रणजी क्रिकेटमध्ये २ हजार धावा आणि २०० बळी असा विक्रम करणारे अनंतपद्मनाभन हे पहिले खेळाडू होते.

Report Page