@skdeolankar

@skdeolankar

https://t.me/skdeolankar

निर्वसाहतीकरणाची वर्तुळपूर्ती ?

डॉ. शैलेंद्र देवळाणकर, परराष्ट्र धोरण विश्लेषक

विद्यार्थ्यांसाठी : स्पर्धा परीक्षांच्या दृष्टिकोनातून लेखाचे महत्त्व

• इंग्लंड, स्कॉटलंड, वेल्स आणि नॉर्दन आयर्लंड यांची भौगोलिक व राजकीय रचना समजून घेण्यासाठी, तसेच ग्रेट ब्रिटन आणि युनायटेड किंगडम यांतील फरक जाणून घेण्यासाठी हा लेख उपयुक्त आहे.

• लेखात मांडलेल्या संयुक्त राजकीय निवेदनाच्या संदर्भातून स्कॉटलंड, वेल्स आणि नॉर्दन आयर्लंडमधील स्वायत्तता व विभक्त होण्याच्या मागण्यांचा अभ्यास करता येईल.

• ब्रेक्झिट, आर्थिक अडचणी आणि प्रादेशिक राष्ट्रवाद यांचा परस्परसंबंध समजून घेता येईल.

• संभाव्य विभाजनाचे इंग्लंडच्या अर्थव्यवस्थेवर, राजकीय स्थैर्यावर आणि आंतरराष्ट्रीय स्थानावर काय परिणाम होऊ शकतात, याचा विचार करता येईल.

• युरोपीय महासंघाशी संबंध, संभाव्य पुनर्प्रवेश आणि व्यापारावरील परिणाम या मुद्द्यांतून आंतरराष्ट्रीय संबंध, घटनात्मक प्रक्रिया व निर्वसाहतीकरणाविषयी विश्लेषणात्मक प्रश्नांची तयारी करता येईल.

---

निर्वसाहतीकरणाची वर्तुळपूर्ती?

डॉ. शैलेंद्र देवळाणकर, परराष्ट्र धोरण विश्लेषक

ज्या साम्राज्यावर कधीही सूर्यास्त होत नाही, असे साम्राज्य म्हणून ग्रेट ब्रिटेनची एकेकाळी जगात ख्याती होती. हजारो वर्षे ब्रिटेनने जगावर राज्य केले. आशिया, आफ्रिका आणि लॅटीन अमेरिकेमध्ये ब्रिटेनच्या जवळपास ३० वसाहती होत्या. त्यांचा दबदबा संपूर्ण जगावर होता. पण दुसर्‍या महायुद्धानंतर ब्रिटेनच्या साम्राज्याला उतरती कळा लागली आणि ती एका निर्णायक टप्प्यावर येऊन पोहोचली आहे. युनायटेड किंगडम म्हणून ओळखला जाणार्‍या या देशाची विभागणी होण्याची शक्यता असून त्यातून काही प्रांत विभक्त होणार आहेत. ज्या ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने व्यापाराच्या नावाने प्रवेश करून भारतावर प्रदीर्घ काळ राज्य केले ती कंपनी काही वर्षांपूर्वी एका भारतीय कंपनीने विकत घेतली. इंग्लंडला जीडीपीच्या आकारमानाबाबतही भारताने मागे टाकले. आता हा देश फुटीच्या उंबरठ्यावर आहे. कारण युनायटेड किंगडममधील कॉन्टीट्युटनल कंट्रीं’नी आता बंडाचा झेंडा उगारला आहे.

युनायटेड किंगडममधील नॉर्दन आयलंड, स्कॉटलंड आणि वेल्स या तिन्ही देशांचे पंतप्रधान अलीकडेच वेल्सच्या राजधानीत एकत्र आले आणि त्यांनी एका कॉमन पॉलिटिकल मेमोरंडमवर स्वाक्षर्‍या केल्या. त्यांनी इंग्लंडला असे सांगितले की, तुम्ही आता घटनात्मक बदल करा, कारण आम्हाला आता वेगळे व्हायचे आहे. यापूर्वी अशाच स्वरुपाची मागणी स्वतंत्रपणाने या तिन्ही प्रांतांकडून झालेली आहे. पण तिघांनी एकत्र येऊन इंग्लंडला ‘अल्टिमेटम’ देणे हे पहिल्यांदा घडले आहे. त्यामुळे युनायटेड किंगडम फुटून चार स्वतंत्र देश तयार होणार आहेत का, अशी चर्चा सुरू झाली आहे. १९८९-९० ला सोव्हिएत महासंघाचे

Report Page