@skdeolankar

@skdeolankar

https://t.me/skdeolankar

मिमांसा चीनच्या सोनेखरेदीची

- डॉ. शैलेंद्र देवळाणकर, परराष्ट्र धोरण विश्लेषक

जागतिक अर्थकारणामध्ये सद्यस्थितीत अमेरिका ही सर्वांत मोठी अर्थव्यवस्था असून दुसर्‍या स्थानावर चीनचा क्रमांक लागतो. तथापि, २०४९ पर्यंत चीनला जगातील सर्वांत मोठी आर्थिक महाशती बनायचे आहे. शी झिनपिंग राष्ट्राध्यक्ष बनल्यानंतर 2012 मध्ये चीनने यासाठी एक व्यापक योजना आखली असून त्यासाठी २०२३, २०३५ आणि २०४९ असे टप्पे आखण्यात आले आहेत. अमेरिकेच्या आर्थिक स्थानाला हादरा देण्यासाठी चीनने अलीकडील काळात डी-डॉलरायजेशनच्या प्रवाहामध्ये आघाडी घेतली आहे. कोणत्याही परिस्थितीत डॉलरच्या माध्यमातून होणारे जागतिक व्यवहार कमी कसे करता येतील यासाठी चीनचा आटापिटा सुरू आहे. यातून डॉलरची आंतरराष्ट्रीय अर्थकारणातील जी मतेदारी आहे, ती चीनला संपुष्टात आणायची असून त्याजागी युआन या आपल्या राष्ट्रीय चलनाचे मोल चीनला वाढवायचे आहे. अलीकडील काळात झालेल्या युआनच्या अवमूल्यनामुळे चीनला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. कोविड महामारीनंतर गटांगळ्या खाऊ लागलेली चीनची अर्थव्यवस्था अद्यापही पूर्ववत झालेली नाहीये. चीनमध्ये मागणी कमालीची घटलेली आहे. औद्योगिकीकरणाचे चक्रही कोविडपूर्व स्थितीत आलेले नाहीये. चीनच्या अर्थव्यवस्थेचा कणा असणारा बांधकाम उद्योग प्रचंड आर्थिक संकटात सापडला आहे. अशी सर्व चिंताजनक स्थिती असताना चीन प्रचंड मोठ्या प्रमाणावर सोन्याची खरेदी करत असल्याचे गेल्या तीन-चार महिन्यांमध्ये दिसून आले आहे.

चीनची सोनेखरेदी

एकट्या मार्च महिन्यात चीनने ५ टन सोन्याची आयात केली आहे. चालू वर्षातील पहिल्या तीन महिन्यांचा विचार करता चीनने तब्बल २७ टन सोनेखरेदी केली आहे. परिणामी सद्यस्थितीत चीनकडे एकूण २२६२ टन सोन्याचा साठा आहे. चीनी गुंतवणूकदारांनीही गोल्ड ईटीएफमध्ये गुंतवणूक वाढवली आहे. चीन अचानकपणाने इतया मोठ्या प्रमाणावर सोनेखरेदी करु लागल्यामुळे जगभराती सोन्याच्या किमतीही प्रभावित झाल्या आहेत. सोन्याने पाहता पाहता ७० हजारांपर्यंत मजल मारल्यामुळे सोन्यातील गुंतवणूकदारांमध्ये आनंद असला तरी नव्याने सोनेखरेदी करणार्‍यांची काहीशी निराशा झाली आहे. २०१४ ते २०२४ या दहा वर्षांचा कालखंड पाहिल्यास आजघडीला सोन्याचे भाव दुपटीहून अधिक आहेत. या भाववाढीला चीनकडून होणारी वारेमाप खरेदी हे एक कारण आहे; पण याबाबत चिंताही व्यत होत आहे.

* चिंतेचे कारण काय?

या चिंतेस पार्श्वभूमी आहे ती कोविडपूर्व कालखंडाची. कोरोना महामारीचा उद्रेक जगभरात होण्यापूर्वी चीनने संपूर्ण जगभरामधून वैद्यकीय साधनांची, पीपीई किटस्ची मोठ्या प्रमाणावर खरेदी केली होती. त्यावेळी त्याचे महत्त्व कुणाही देशाला उमगले नव्हते किंवा त्याकडे लक्षही गेले नव्हते. परंतु कोरोनाचा प्रसार जसजसा होत गेला तसतसे चीनच्या या खरेदीचे रहस्य जगाच्या लक्षात आले. त्यामुळेच आता चीन जेव्हा अभूतपूर्व पातळीवर सोन्याची खरेदी करु लागला आहे तेव्हा येणार्‍या काळात निर्माण होणार्‍या काही धोयांची चीनला चाहूल लागली आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

हा प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविक आहे. कारण सोन्याचा साठा हा कोणत्याही राष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचा भकम आधार मानला जातो. कोणत्याही चलनाचे मूल्य प्रामुख्याने त्या राष्ट्राकडे असलेल्या सोन्याच्या साठ्यावर ठरते. एखादी आपत्ती येते तेव्हा या चलनाचे अवमूल्यन होते. अवमूल्यन झाल्यामुळे विनिमयाचे खूप सारे प्रश्न निर्माण होतात. अशा वेळी राष्ट्रांकडून आणि नागरिकांकडून सोन्यावर गुंतवणूक होते. सोने हे वैयतिक पातळीवर जसे आर्थिक सुरक्षितता प्रदान करणारे असते तशाच प्रकारे राष्ट्रासाठीही सोन्याचा साठा हा आर्थिक सुरक्षा देणारा असतो. भारताचे उदाहरण घेतल्यास गेल्या ४-५ महिन्यात आरबीआयने देखील साधारण १४ टन सोन्याची खरेदी केलेली आहे. गेल्या काही वर्षातील ही सर्वाधिक मोठी खरेदी मानली जाते. हे करण्यामागचे कारण देखील जागतीक स्तरावर निर्माण झालेली कमालीची असुरक्षितता आणि अस्थिरता हेच आहे. अशा प्रतिकूल वातावरणातील व्यवस्थापनाची रणनीती म्हणून सोन्याच्या साठवणुकीकडे पाहिले जाते.

आज रशिया युक्रेन युद्ध साधारण दोन वर्षे उलटूनही संपण्याचे नाव घेत नाहीये. कोरोना महामारीचा परिणाम अजूनही जागतिक पातळीवर कमालीचा दिसून येत आहे. आजही पुरवठा साखळी बर्‍यापैकी विस्कळीत झालेली आहे. अनेक देशांच्या चलनाचे अवमूल्यन झालेले आहे. दरम्यानच्या काळातील आखातातील परिस्थिती देखील अस्थिर झालेली आहे. इस्त्रायलकडून इराणवर अद्यापही प्रतिहल्ला झालेला नाहीये. जग या प्रत्युत्तराची वाट बघत आहेे. कारण इराणने पहिल्यांदा इस्त्रायलवर क्षेपणास्र हल्ले केले. त्यामुळे आखातामधली परिस्थिती स्फोटक बनली आहे. वैश्विक पटलावरच्या या वाढत्या असुरक्षिततेमुळे केवळ भारतच नव्हे तर जगभरातील अनेक राष्ट्रे सोन्याची खरेदी करत आहेत.

गेल्या काही वर्षांमध्ये संरक्षण सामग्रीच्या खरेदीप्रमाणे राष्ट्रांचा कल हा प्रामुख्याने सोने खरेदीकडे वाढलेला आहे. अनेक इस्लामिक देश, लॅटीन अमेरिकेतील देश, आफ्रिकन देश, विकसनशील आणि गरीब देश सोन्यामध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करताना दिसून येत आहेत. याचा परिणाम सोन्याचे भाव वधारण्यावर झाला आहे.

* अमेरिका-चीन संघर्षाचे कारण

पण चीनच्या सोनेखरेदीमागे आर्थिक सुरक्षिततेबरोबरच अन्य एक महत्त्वाचे कारण आहे, ते म्हणजे सुरुवातीला म्हटल्यानुसार डॉलरला शह देणे. आशिया खंडामध्ये आजघडीला सोन्याची सगळ्यात जास्त आयात करणारा देश आहे चीन. पण गेल्या दोन वर्षांमध्ये चीनकडून सोन्याची खरेदी तब्बल ३० टयांनी वाढलेली आहे. यामागे प्रामुख्याने अमेरिका आणि चीन यांच्यातील संघर्षाचे महत्त्वाचे कारण आहे. आता हा संघर्ष केवळ संरक्षण किंवा सामग्री पातळीवर राहिलेला नसून तो आर्थिक पातळीवर येऊन थांबलेला आहे. डॉलर हा अमेरिकेच्या एकूणच सामर्थ्याचा मुख्य स्त्रोत आहे. डॉलरच्या माध्यमातून अमेरिकेने आंतरराष्ट्रीय अर्थकारणाबरोबरच राजकारणावरही दबदबा निर्माण केलेला आहे. त्यामुळे अमेरिकेच्या डॉलरच्या वर्चस्वाला आव्हान देण्यासाठी प्रामुख्याने चीन तयारी करतो आहे. ते आव्हान देताना युआनच्या माध्यमातून व्यापार वाढवायचा हे चीनचे उद्दिष्ट आहे. यामध्ये इतर देशांनाही युआनच्या माध्यमातून व्यापार करण्यासाठी चीन प्रवृत्त करत आहे.

चीनला प्रचंड मोठ्या प्रमाणावर सोन्याचा साठा करून त्या साठ्याच्या आधारावर युआनची किंमत वाढवायची आहे आणि अमेरिकेला आव्हान द्यायचे आहे. कोरोना महामारीनंतर ज्यापद्धतीने अमेरिका आणि युरोपीयन देशांमध्ये चीनच्या बाबतीत विश्वासार्हतेचा प्रश्न निर्माण झाला त्यामुळे चीनवर किती विश्वास ठेवायचा, चीनवर किती अवलंबून राहयचे याविषयी जग पुनर्विचार करु लागले आहे. अशा स्थितीत आपली गेलेली पत पुन्हा मिळवायची असेल आणि डॉलरला खर्‍या अर्थाने आव्हान द्यायचे असेल तर चीनला युआनचे मूल्य प्रचंड वाढवावे लागणार आहे. युआनमधून होणारा व्यापार देखील वाढवावा लागणार आहे. त्यामुळे चीनने आपली सोन्याची खरेदी प्रचंड प्रमाणात वाढवल्याचे दिसत आहे.

सद्यस्थितीत अनेक देशांच्या केंद्रीय बँका मोठ्या प्रमाणावर सोन्याची खरेदी करत आहेत. यामध्ये प्रामुख्याने रशिया आणि चीन या दोन देशांच्या केंद्रीय बँका अग्रेसर आहेत. पीपल्स बँक ऑफ चायना या चीनच्या सरकारी बँकेने गेल्या १७ महिन्यांमध्ये रेकॉर्ड ब्रेक म्हणजे साधारण २००० टन सोन्याची खरेदी केलेली आहे. पिपल्स बँक ऑफ चायनाच्या परकीय गंगाजळीमध्ये सोन्याचा हिस्सा चीनला वाढवायचा आहे.

* अमेरिकन निर्बंधांची भीती

चीनला येणार्‍या काळामध्ये तैवानच्या एकीकरणाची प्रक्रिया पुढे न्यायची आहे. यासाठी प्रसंगी लष्करी बळाचा वापर करण्यासही आपण मागेपुढे पाहणार नाही, ही बाब शी झिनपिंग यांनी चालू वर्षाच्या सुरुवातीला राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणामध्ये स्पष्ट केली आहे. यामध्ये कोणत्याही राष्ट्राने हस्तक्षेप केल्यास त्याची गय केली जाणार नाही, हेही चीनने बजावले आहे. तथापि, चीनला एक महत्त्वाची भीती आहे, ती म्हणजे युक्रेन युद्धानंतर अमेरिकेने ज्याप्रमाणे रशियावर ५००० हून अधिक आर्थिक निर्बंध घातले, तशाच प्रकारे तैवानवर आक्रमण केल्यास आपल्याविरुद्धही असे निर्बंध टाकले जाऊ शकतात. त्या काळासाठीची पूर्वतयारी म्हणून चीन हा सोन्याची खरेदी वाढवतो आहे. सबब या विक्रमी सोनेखरेदीमागे तैवानसंदर्भात आक्रमक पावले टाकण्याची रणनीती हेही एक कारण असण्याची शयता नाकारता येणार नाही.

* रिअल इस्टेटमधील पडझड

आशिया खंडात मागच्या वर्षापर्यंत भारत हा सोन्याच्या आयातीमध्ये अव्वल स्थानी होता. परंतु आता चीनने यामध्ये बाजी मारल्याचे दिसून येत आहे. खरे तर चीन हा सोन्याचा मोठ्या प्रमाणात निर्माता देखील आहे. असे असूनही चीनने सोन्याची आयात वाढवलेली आहे. चीनी लोकांची गुंतवणूकही प्रामुख्याने सोन्यामध्ये वाढलेली आहे. कारण चीनी लोकांना गुंतवणूकीचे पर्याय फार मर्यादीत स्वरुपात आहेत. आजवर त्यांची गुंतवणक ही प्रामुख्याने रिअल इस्टेट क्षेत्रामध्ये होती. कारण त्यांना परदेशांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी अनेक निर्बंध आहेत. चीनी नागरीक परदेशात किती रकमेपर्यंत गुंतवणूक करू शकतात यावर चीनच्या सरकारचे नियंत्रण आहे. त्यामुळे तेथील नागरीक रिअल इस्टेट क्षेत्रामध्य प्रामुख्याने पैसे गुंतवत असत. पण कोरोना महामारीनंतर चीनमधील बांधकाम उद्योग कोसळला आहे. याचाही परिणाम चीनी लोकांच्या सोन्याच्या गुंतवणुकीवर झालेला दिसत आहे.


⚡️परराष्ट्र, संरक्षण धोरणातील, आंतरराष्ट्रीय संबंधातील सर्व चालूघडामोडींविषयी, मराठी व इंग्रजीतून माहिती व विश्लेषणासाठी फॉलो करा.

Twitter -

https://twitter.com/skdeolankar?s=09

Instagram -

https://instagram.com/dr.shailendradeolankar?igshid=1dpe34b2p0ai2

Report Page