@skdeolankar

@skdeolankar

https://t.me/skdeolankar


सेमीकंडटरच्या क्षेत्रात आत्मनिर्भरतेकडे...

- डॉ. शैलेंद्र देवळाणकर,परराष्ट्र धोरण विश्लेषक.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलीकडेच भारतातील तीन सेमीकंडटरची निर्मिती करणार्‍या प्रकल्पांचे उद्घाटन केले. हा एक अत्यंत ऐतिहासिक स्वरुपाचा क्षण होता. या तीनपैकी दोन प्रकल्प गुजरातमध्ये तर एक आसाममध्ये उभारण्यात येणार आहे. टाटा कंपनीकडे यापैकी दोन प्रकल्प आहेत, तर तिसरा प्रकल्प मुरुगन कंपनीकडे आहे. यानिमित्तानए सेमीकंडटरच्या मॅन्युफॅचरींगच्या क्षेत्रात भारताची एंट्री झाली आहे. या तिन्ही प्रकल्पांसाठी सुमारे १५ अब्ज डॉलर्स इतका खर्च करण्यात येणार असून त्यातून ५ लाख जणांना रोजगार मिळण्याची शक्यता आहे.

विसावे शतक हे प्रामुख्याने तेलाचे शतक होते. या शतकाचे संपूर्ण राजकारण हे कच्च्या तेलाचा पुरवठा, तेलविहिरींवरील मालकी हक्क याभोवती फिरत होते. त्यामुळे दुसर्‍या महायुद्धानंतर राजकारणाचे प्रमुख केंद्र पश्चिम आशिया बनला. एकविसाव्या शतकामध्ये राष्ट्रांची उद्दिष्टे बदललेली आहेत. हे शतक टेनॉलॉजीचे युग आहे. त्यातही सेमीकंडट्रर्सना या युगात अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालेले आहे. किंबहुना, विसाव्या शतकातील तेलाची जागा एकविसाव्या शतकात सेमीकंडटर्सनी घेतली आहे, असे म्हटल्यास ते गैर ठरणार नाही. कारण मोबाईल फोन्स, कॉम्प्युटर्स, लॅपटॉप, वैद्यकीय क्षेत्र, वाहननिर्मिती विश्व, बँकिंग विश्व, संरक्षण क्षेत्र, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अशा जीवनाशी निगडित सर्वच क्षेत्रांमध्ये प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणाने सेमीकंडटर म्हणजेच मायक्रोचिपचा वापर केला जात आहे. पूर्वीच्या काळी एका पूर्ण खोलीमध्ये बसेल इतका संगणक असायचा; पण २०१४ मध्ये आयफोन ६ आला तेव्हा एका छोट्याशा मायक्रोचिपमध्ये संगणकातील सर्व गोष्टी सामावलेल्या आहेत. त्यामुळे आज संपूर्ण जगभरात सेमीकंडटरच्या क्षेत्रामध्ये प्रवेश करण्यासाठी राष्ट्राराष्ट्रांचे जोरदार प्रयत्न सुरू झालेले दिसताहेत. विशेषतः प्रगत देश सेमीकंडटर उत्पादनाच्या क्षेत्रात आत्मनिर्भर बनण्यासाठीच्या योजना आखत आहेत. आजवर भारत या स्पर्धेमध्ये खूप मागे होता. विशेष म्हणजे भारतामध्ये १९६० च्या दशकामध्ये सेमीकंडटरचे उद्योग सुरू करण्यासारखी परिस्थिती होती. परंतु त्यावेळी याकडे फारसे गांभीर्याने पाहिले गेले नाही. याउलट जपान, अमेरिका चीन, तैवान यांसारख्या देशांनी त्यामध्ये बरीच मोठी झेप घेत या संपूर्ण बाजारपेठेवर आपला प्रभाव वाढवत एक प्रकारची मतेदारीच तयार केली. विशेषतः तैवानचा उल्लेख यामध्ये अग्रक्रमाने करावा लागेल. कारण आजघडीला जगभरात तयार होणार्‍या सेमीकंडटर्सपैकी जवळपास ८० ते ९० टके मायक्रोचिप्स तैवानमध्ये तयार होतात.

चार वर्षांपूर्वी आलेल्या कोरोना महामारीमुळे जागतिक पुरवठा साखळी पूर्णतः विस्कळित झाली. मायक्रोचिप्स ही या पुरवठा साखळीची एक महत्त्वाची कडी आहे. कोरोनाकाळात या सेमीकंडटरचा पुरवठा खंडित झाल्यामुळे वाहनउद्योगासह अनेक उद्योगांना खूप मोठे नुकसान सहन करावे लागले. २०२०-२१ या काळात भारतामध्ये बहुतांश वाहन कंपन्यांकडे कारसाठीची मागणी होती, पण ती देण्यासाठी कारखान्यांमध्ये कारची निर्मिती पूर्णत्वाला गेलेली नव्हती. यामागचे कारण सेमीकंडटरचा अपुरा पुरवठा हे होते. चीन, जपान आणि तैवान या देशांवर सेमीकंडटरबाबत जगाचे परावलंबित्व असल्याने आणि तेथे लॉकडाऊनमुळे सर्वच उद्योग बंद पडल्याने कोरोनोत्तर काळात अनेक देशांनी या क्षेत्रात स्वावलंबी होण्यासाठी प्रयत्न करायला सुरुवात केली.

दुसरी गोष्ट म्हणजे चीनसारख्या एकाधिकारशाही असणार्‍या रिव्हिजनिस्ट देशाबाबतची साशंकता कोरोना काळात प्रचंड वाढीस लागली. त्यामुळे जागतिक पुरवठा साखळीमध्ये चीनला पर्याय ठरणारा देश कुणी असू शकतो का याचा शोध सातत्याने पश्चिमी जगाकडून घेतला जाऊ लागला. त्यादृष्टिकोनातून भारताकडे हे देश पाहात आहेत. त्यामुळे भारताने सेमीकंडटरच्या क्षेत्रात पुढाकार घेतल्यास त्याला पश्चिमी देश समर्थन करण्यास तयार आहेत. विशेषतः अमेरिकेचीही यामध्ये साथ मिळू शकते. गतवर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेच्या दौर्‍यावर गेले असता तेथे मायक्रॉन या कंपनीबरोबर सेमीकंडटर क्षेत्रातील एक महत्त्वपूर्ण सामंजस्य करार झाला. त्यानंतर एकूणच सेमीकंडटर निर्मितीच्या मुद्दयाला भारतात गती प्राप्त झाली. गेल्या काही वर्षांपासून भारत यासाठी प्रयत्नशील आहेच. त्यासाठी प्रॉडशन लिंक इन्सेन्टिव्ह (पीएलआय) मोठ्या प्रमाणावर दिले जात आहेत. पण तरीही त्याला गती मिळत नव्हती. अमेरिका दौर्‍यानंतर ती मिळाली.

सेमीकंडटर निर्मितीच्या प्रक्रियेमध्ये तीन टप्पे आहेत. पहिला म्हणजे डिझायनिंग. हे काम अत्यंत गुणवत्तापूर्ण असल्याने त्यासाठी अत्यंत कौशल्यप्राप्त तंत्रज्ञांची गरज भासते. तसेच यासाठी संशोधन आणि विकासही मोठ्या प्रमाणावर करावा लागतो. दुसरा टप्पा आहे मॅन्युफॅचरींग म्हणजे चिपमधील सुटे भाग तयार करणे आणि तिसरा टप्पा असेम्ब्लिंग म्हणजेच हे सर्व सुटे भाग एकत्र जोडून चिप तयार करणे. यापैकी डिझायनिंगच्या क्षेत्रात भारतीय मोठ्या प्रमाणावर आहेत; पण हे डिझायनिंग ते भारतासाठी करत नाहीत. अमेरिकेतील इंटेलसारखी कंपनी, जापनीज कंपन्या किंवा पश्चिमी देशातील कंपन्यांसाठी हे काम केले जाते. मॅन्युफॅचरींग आणि असेम्ब्लिंगच्या क्षेत्रात फारसे भारतीय नाहीयेत. गुजरातमधील प्रकल्प हे मॅन्युफॅचरींग करणारे आहेत, तर आसाममधील प्रकल्प असेम्ब्लिंगचा आहे.

आज भारत आत्मनिर्भर भारत आणि मेक इन इंडियासारख्या प्रकल्पांच्या माध्यमातून मॅन्युफॅचरींग हब बनण्याच्या दिशेने प्रवास करतो आहोत. भारत आज मोबाईलच्या मॅन्युफॅचरींगच्या क्षेत्रात खूप पुढे गेला आहे. जगातील दुसर्‍या क्रमांकाचा मोबाईल उत्पादक देश म्हणून आज भारताने स्थान मिळवले आहे. भारताने गतवर्षी ११ अब्ज डॉलर्सचे मोबाईल फोन निर्यात केले. सॅमसंगचे सर्वच मोबाईल भारतात बनताहेत. अ‍ॅपलचे जवळपास २५ टके मोबाईल भारतात तयार केले जात आहेत. भारताला येत्या काही वर्षांत मोबाईल फोनच्या निर्यातीचा आकडा ५० अब्ज डॉलरपर्यंत न्यायचा आहे. त्याचप्रमाणे आपण संरक्षण आणि इलेट्रॉनिक क्षेत्रातही आपण आत्मनिर्भर बनण्याचा प्रयत्न करत आहोत. या तिन्ही क्षेत्रांमध्ये सेमीकंडटर हा आत्मा आहे. भारत सद्यस्थितीत याबाबत तैवान, चीन, जपान आदी देशांवर विसंबून आहे. हे परावलंबित्व कमी करत स्वावलंबी बनण्यासाठी भारताने याबाबत पुढाकार घेतला आहे. कारण उद्याच्या भविष्यात सेमीकंडटरच्या अपुर्‍या पुरवठ्याचा परिणाम भारताच्या अर्थव्यवस्थेवर, उद्योजगतावर होता कामा नये.

सेमीकंडटरच्या क्षेत्रात अनेक आव्हाने असली तरी भारताकडे कुशल मनुष्यबळाची उपलब्धता मुबलक असल्याने या क्षेत्रात प्रगती करणे आपल्यासाठी फारसे कठीण ठरणारे नाही. अलीकडेच केंद्रीय दळणवळण आणि इलेट्रॉनिस आणि आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ‘भारत या वर्षाच्या अखेरीस पहिल्या स्वदेशी सेमीकंडटर चिप लाँच करण्याचा साक्षीदार असेल, असे म्हटले आहे. केंद्र सरकारच्या उद्दिष्टांनुसार २०२९ मध्ये सेमीकंडटरच्या क्षेत्रातील ज्या पाच इकोसिस्टीम्स आहेत त्यामध्ये भारताचा समावेश असेल. यासाठी जवळपास ५५ अब्ज डॉलर्सपर्यंतची गुंतवणूक कशी करता येईल यादृष्टीने भारताची पावले पडताहेत.

आव्हाने कोणती ?

सेमीकंडटर निर्मितीच्या क्षेत्रातील वाटचाल ही आव्हानात्मक असणार आहे. विशेषतः यासाठी आवश्यक असणार्‍या पायाभूत सुविधा सक्षम असणे गरजेचे असते. यामध्ये वीजपुरवठा, पाणीपुरवठा, इंटरनेट केबल्सचे जाळे यांचा समावेश होतो. भारत गेल्या काही वर्षांत पायाभूत सुविधांच्या विकासावर प्रचंड वेगाने काम करत आहे. जवळपास १.४ ट्रिलीयन डॉलर्सचे प्रकल्प भारतात राबवले गेले आहेत. त्यामुळे गुजरात आणि आसाममधील या प्रकल्पांना पाणी, वीज पुरवठा अखंडित कसा राहील यासाठी विशेष काळजी घेतली आहे.

आज भारत आपली प्रतिमा बदलण्याच्या प्रयत्नात आहे. गेल्या काही वर्षांत जगाचे बॅक ऑफिस म्हणून भारत पुढे आला. आता भारत मॅन्युफॅचरींगमध्ये पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहे. यासाठी पंतप्र्रधान मोदींनी टेक-एड असा शब्दप्रयोग वापरला आहे. मागील दशक हे सोशल मीडियाचे दशक म्हणून गाजले. अमेरिकन कंपन्यांची मतेदारी असणार्‍या फेसबुक, व्हॉटसअ‍ॅप, इन्स्टाग्राम यांसारख्या सोशल मीडियाने संपूर्ण विश्व व्यापून टाकला. आताचे दशक हे मायक्रोचिपचे असणार आहे. त्यामुळेच पंतप्रधानांनी टेनॉलॉजी ड्रिव्हन डिकेड अर्थात टेकेड असा शब्दप्रयोग वापरला. पंतप्रधान मोदींनी याप्रसंगी इंडस्ट्री ४.० कडेही लक्ष वेधले. मागील तीन औद्योगिक क्रांतींमध्ये भारत प्रेक्षक म्हणून पहात होता. त्याचा मोठा फटका बसला. आता चौथ्या औद्योगिक क्रांतीचा एक मोठा भाग बनण्याचा भारताचा प्रयत्न आहे. त्यादृष्टीने भारत सेमीकंडटर्सच्या निर्मितीकडे पहात आहे. येणार्‍या काळात भारताने या क्षेत्रात येणार्‍या कंपन्यांची उभारणी लवकरात लवकर व्हावी यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. भारताला या क्षेत्रातील रिसर्च अँड डेव्हलपमेंटची इकोसिस्टीम तयार करायची आहे. या इकोसिस्टीममध्ये सेमीकंडटर तयार होणार आहेत. त्यासाठी मुलांना उद्युत करणे गरजेचे आहे. अमेरिकेमध्ये सेमीकंडटरच्या क्षेत्रात अनेक रिसर्च लॅब आहेत. पंतप्रधान मोदींनी अमेरिका भेटीदरम्यान त्यांना भेटही दिली होती. अशा लॅब भारतात तयार कराव्या लागतील. यासाठी आरअँडडीवर होणारा खर्च वाढवावा लागेल. सद्यस्थितीत तो जीडीपीच्या दोन टकेही नाहीये. अनेक देशांचा हा खर्च सहा ते सात टयांपर्यंत आहे. विकसनशील देशाकडून विकसित देशाकडे जाण्याच्या प्रवासात सेमीकंडटर्सच्या क्षेत्रात आत्मनिर्भर व्हायचे असेल तर उच्च शिक्षणाच्या क्षेत्रात संशोधन आणि विकासावर भर द्यावा लागणार आहे. तूर्त भारताने याबाबत केलेली सुरुवात ही स्वागतार्ह आहे.


⚡️परराष्ट्र, संरक्षण धोरणातील, आंतरराष्ट्रीय संबंधातील सर्व चालूघडामोडींविषयी, मराठी व इंग्रजीतून माहिती व विश्लेषणासाठी फॉलो करा.

Twitter -

https://twitter.com/skdeolankar?s=09

Instagram -

https://instagram.com/dr.shailendradeolankar?igshid=1dpe34b2p0ai2

Report Page