finding error part - 1

finding error part - 1

Rajesh D Hisekar ,

नमस्कार मित्रांनो ,

या पोस्टमध्ये मी तुम्हाला इंग्रजी मधील काही बेसिक गोष्टी सांगणार आहे ज्या तुम्हाला प्रश्न सॉल करताना उपयोगी पडतील.

सर्वप्रथम आपण Error या शब्दाचा अर्थ पाहू 

⚡ Error :- म्हणजे वाक्यातील थोडीशी चुक जी पूर्ण वाक्य चुकवण्यात कारणीभूत असते जसे की.

I buy an apples.

वरील वाक्यात असलेला error म्हणजे एप्पल या शब्दाला लागलेला S कारण एप्पल समोर an वापरलेल् आहे जे फक्त एकाच वस्तूसाठी वापरले जाते.


⚡वाक्यातील Error कसा ओळखावा :-

➡️ वाक्यातील क्रियापद चेक करा जर वाक्यात क्रियापदाचे पहिले रूप (V¹) असेल तर त्याच्या उजवीकडे असलेला subject पहा जर sub एक वचनी असेल तर क्रियापदाच्या पहिला रुपाला S/es लावा (अपवाद- I and You )जर करता अनेकवचनी असेल तर क्रियापदाच्या रूपाला s/es लावू नका.

Ex:-

Ram play cricket ❌

Ram plays cricket ✅


I plays cricket ❌

I play cricket ✅


He play cricket ❌

He plays cricket ✅


➡️ इंग्रजी मधील असे काही शब्द ज्यांना कधीच S/es लागत नाही ते शब्द नेहमी लक्षात ठेवा जसे की furniture, music, sheep, dear, swine, luggage जर अशा शब्दांना लागलेला असेल तर त्यामुळे पूर्ण वाक्य चुकीचे होते.

Ex:-

A). He sold all furnitures of his shop. ❌

B). He sold all furniture of his shop. ✅


➡️ सर्वाधिक चुका Subject verb agreement ह्या टॉपिक मध्ये करून देतात त्यामुळे तो टॉपिक व्यवस्थित करावा.


➡️ कोणत्याही वाक्यात जर Same हा शब्द वापरला असेल हा आणि त्यासमोर the लिहिलेले नसेल तर वाक्य चुकीचे असते.

Same ❌

The same ✅ 


➡️ वाक्यातील अनेकवचनी शब्दावर नेहमी लक्ष ठेवावे कारण की कधीकधी अनावश्यक शब्दासोबत s/es लागून येतो आणि त्या शब्दाचा पूर्ण अर्थच बदलून टाकतो ज्यामुळे ते वाक्य चुकीचे ठरते.


A) He plays crickets.❌

B) He play cricket. ✅

To be continue in next part....


Report Page