Uses of article Basic
Rajeshhisekar ,नमस्कार मित्रांनो
इंग्रजीमधील आर्टिकल हा टॉपिक वाटतो तेवढा सोपा नाही Article वरील प्रश्न हा कधीही चुकू शकतो त्यामुळे प्रश्न सोडवताना काळजीपूर्वक वाचून सोडवावा. त्यासाठी मी तुम्हाला काही नियम सांगणार आहे एकदा का तुम्ही हे नियम लक्षात घेतले तर article वरचे साधे साधे प्रश्न हे तुमचे कधीच चुकणार नाहीत.
Tips-
A- म्हणजे एक (कोणतीही एक)
An- म्हणजे सुद्धा एकच (कोणतेही एक)
The - म्हणजे एक किंवा अनेक पण परफेक्ट जे सांगायचं आहे तेच (definite)
आर्टिकल वरील प्रश्न सोडवताना खालील स्टेप्स फॉलो कराव्यात :-
📌Step1:-
ज्या शब्दा समोर आर्टिकल वापरायचे आहे तो शब्द एक-दोन-तीन असा मोजता येतो का हे पहावे जर शब्द मोजता येत नसेल तर त्यासमोर कन्फर्म A & An वापरू नये पण जर शब्द मोजता येत असेल तर त्या समोर A किंवा An हे वापरता येते तसेच त्यासमोर The सुद्धा लावता येते.
Ex. She is________excellent.
( वरील वाक्यात A किंवा An वापरता येत नाही कारण excellent हा शब्द एक-दोन-तीन असा मोजता येत नाही).
📌Step 2 :- The च्या वापराची शक्यता तपासा तपासण्यासाठी हे पहा कि ज्या शब्दा समोर आर्टिकल वापरायचा आहे तो शब्द काही स्पेसिफिकेशन दर्शवते का जसे
Ex- I met a girl, the girl was very beautiful.
वरील वाक्यात गर्ल हा शब्द जेव्हा पहिल्यांदा वापरला तेव्हा ती माझ्या ओळखीची नव्हती म्हणून त्यासमोर A वापरलेला आहे पण जेव्हा गर्ल या शब्दाचा उच्चार वाक्यात दुसऱ्यांदा आला तेव्हा ती girl माझ्या ओळखीची झालेली आहे म्हणून The वापरलेला आहे
म्हणजेच मी girl ला भेटलो होतो त्या गर्ल बद्दल त्या स्पेसिफिक गर्ल बद्दल बोलत आहे म्हणून तिथे The वापरला.
📌Step 3:- शेवटच्या step ला A वापरायचं की An वापरायचं ते पहा त्यासाठी
ज्या शब्दात समोर A किंवा An वापरायचे आहे त्या शब्दाची सुरुवात पुढील उच्चाराने [ अ आ अॅ ऑ इ उ ए ] होत असेल तर त्यासमोर An वापरावे अन्यथा A वापरावे .
Ex-
An umbrella (अ नी सुरुवात)
A university (यु नी सुरुवात )
सर्वांना समजेल अशा भाषांमध्ये मांडण्याचा मी पुरेपूर प्रयत्न केलेला आहे.......
धन्यवाद....!
[ Join @ADVANCEMPSC ]
[ Join @Adv_English ]