Science Special Article..

Science Special Article..

https://t.me/TargetMpscMh

📚 *Science Special (06/12/2018)*📚

Join https://t.me/TargetMpscMh

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

इयत्ता 9 वी विज्ञान महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळ

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

Chapter 5:- द्रव्य (Matter)


◆ क्लोरीनचे सरासरी अणुवस्तुमान 35.5 एवढे आहे.

★ रेणूवस्तुमानालाच पूर्वी रेणुभार म्हणत.एकक u

◆ अणु व रेणूंची सापेक्ष संख्या समजण्यासाठी वैज्ञानिकांनी ग्रॅम मोल ही संकल्पना विकसित केली.पदार्थाच्या एक ग्रॅम – मोल एवढ्या राशीत असणार्यार रेणूंच्या संख्येसाठी N ही संज्ञा वापरतात. या वैशिष्ट्यपूर्ण संख्येला‘अॅव्होगड्रो अंक’ असे म्हणतात.आजपर्यंत माहीत असलेली एकूण मूलद्रव्ये जवळपास 119 आहेत.

◆ मूलद्रव्याच्या व्यवस्थितरीत्या केलेल्या मांडणीलाच ‘मूलद्रव्यांचे वर्गीकरण ‘ म्हणतात.

◆ मूलद्रव्याचे गुणधर्म हे त्यांच्या अणुअंकांचे आवर्तीफल असतात.

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

Chapter 6:- गती व गतीचे प्रकार


◆ गतीचे वेगवेगळे प्रकार आहेत. स्थानांतरणीय गती, घुर्णन गती, दोलन गती.

◆ स्थानांतरणीय गती एकरेषीय असू शकते किवा तिचा मार्ग वक्राकारही असू शकतो.

◆ अंतर ही अदिश राशि आहे तर विस्थापन ही सदिश राशि आहे.

◆ ज्या भौतिक राशींचे मापन दुसऱ्या राशींवर अवलंबून नसते त्यांना मूलभूत राशि असे म्हणतात. यांना व्यक्त करण्यासाठी दिशेची गरज नसते.

◆ उदा. लांबी, वस्तुमान, वेळ, तापमान इ.

★ एखाद्या वस्तूने एकक काळात कापलेल्या अंतरास त्या वस्तूची ‘चाल’ किंवा ‘सरासरी चाल’ असे म्हणतात.

अंतर(Distance)

चाल(Speed) = -------------------------

काळ(Time)

◆ एखाधा वस्तूने एकक काळात एखाद्या विशिष्ट दिशेने कापलेल्या अंतरास त्या वस्तूचा वेग अथवा सरासरी वेग म्हणतात.

विस्थापन (Displacement)

वेग(Velocity)= -----------------------------

काळ(Time)


★ वेगामधील बदलाचा दर म्हणजे त्वरण होय.

वेग बदल(change in Vel.)

त्वरण(Acceleration)= --------------------------

काळ(Time)

◆ जर वस्तूच्या वेगात सातत्याने वाढ होत असेल तर त्या वस्तूचे त्वरण धन (+ve) असते. जर वस्तूचा वेगात सातत्याने कमी/घट होत असेल तर ते त्वरण (-ve) ऋण असते.

◆ ऋण त्वरणास अवत्वरण असेही म्हणतात.


★ जी भौतिकराशी केवळ परिमाणाच्या सहाय्याने पूर्ण व्यक्त करता येते तिला ‘अदिश राशी’ किवा ‘अदिश’ असे म्हणतात.

◆ अदिश राशींची बेरीज-वजाबाकी अंकगणिताचे नियम वापरुन करता येते.

◆ अदिश राशी- वस्तूमान, चाल, कार्य, आकारमान, घनता, वेळ, अंतर, ऊर्जा.

★ जी भौतिक राशी पुर्णपणे व्यक्त करण्यासाठी तिचे परिमाण व दिशा या दोन्हींची आवश्यकता असते तिला ‘सदिश राशी’ किंवा ‘सदिश’ असे म्हणतात.

◆ सदिश राशी – विस्थापन, वेग, त्वरण, बल, गती, वजन इत्यादी.

★ सदिश राशी दर्शविण्यासाठी डोक्यावर बाण --> काढलेल्या चिन्हाचा वापर केला जातो.

★ गतीविषयक तीन समीकरणे

1. v = u + at

2. s = ut + ½ at²

3. v2 = u² + 2as

◆ एखाधा वस्तूच्या विराम अवस्थेत किंवा सरल रेषेतील एकसमान गतिमान अवस्थेत बदल घडवून आणणारी किंवा बदल घडवून आणण्याची प्रवृत्ती असलेली भौतिक राशी म्हणजे ‘बल’ होय.

◆ प्रत्येक वस्तू तिच्या गतिमान अवस्थेतील बदलाला म्हणजेच त्वरणाला विरोध करते. विरोध करण्याच्या या वृत्तीला ‘जडत्व’ असे म्हणतात.

◆ वस्तूमान आणि वेग यांच्या गुणाकाराला संवेग म्हणतात.

★ संवेग परिवर्तनाचा दर प्रयुक्त बलाशी समानूपाती असतो आणि संवेगाचे परिवर्तन बलाच्या दिशीने होते. हा न्यूटनचा गतीविषयक दुसरा नियम आहे.

उदा:- क्रिकेटच्या मैदानात खेळाडूने घेतलेला चेंडूचा झेल.

◆ एकक वस्तुमानात एकक त्वरण निर्माण करणाऱ्या बलास एकक बल असे म्हणतात.

◆ MKS पद्धतीने 1kg वस्तूमान 1 m/s2 त्वरण निर्माण करणार्या बलास एक न्यूटन बल असे म्हणतात.

★ एखाधा वस्तुमानावरील कार्यरत बल हे त्या वस्तूच्या वस्तुमानास व तिच्यावरील परिणामी त्वरण सामानुपाती असते.

■ प्रत्येक क्रिया बलास समान परिमाणाचे प्रतिक्रियाबल अस्तित्वात असते व त्यांच्या दिशा परस्पर विरुद्ध असतात. हा न्यूटनचा गतीविषयक तिसरा नियम आहे.

◆ उदा. रॉकेट किंवा अग्निबाण, भिंतीवर फेकलेला चेंडू.

★ दोन वस्तूंची टक्कर झाली तर या वस्तूंचा आघातापूर्वीचा एकूण संवेग हा त्यांच्या आघातानंतरच्या एकूण संवेगाइतकाच असतो.

◆ निसर्गात आढळणार्यां आणि परस्परांपासून भिन्न असणार्या सर्व बलांचे चार मुख्य प्रकार आहेत.

1) गुरुत्वबल,

2) विधूत चुंबकीय बल,

3) केंद्रकीय बल,

4) क्षीण बल,

★ सर्वांसाठी न्यूटन (N) हे एकक वापरले जाते.

★ न्यूटन यांनी गुरुत्वबलाचा शोध घेतला.

★ प्रयुक्त आकर्षणबलास ‘गुरुत्वबल’ म्हणतात.

■ पृथ्वीचे गुरुत्वबल हे चंद्राच्या गुरुत्वबलापेक्षा अधिक असते.

◆ विश्वातील कोणत्याही दोन वस्तू कोठेही असल्या तरी त्यांच्यात परस्परांना आकर्षणारे गुरुत्वबल प्रयुक्त असते.

◆ हे बल त्या वस्तूंच्या वस्तुमानाच्या गुणाकाराशी समानूपाती व वस्तूंमधील अंतराच्या वर्गाच्या वस्तानुपाती असते.

Gm1m2

F= ------------------------

✓Here M1 & M2 is the mass of two objects. & r is the distance between them.

◆ G चे मूल्य सर्व वस्तूंसाठी सारखेच आहे. म्हणून G ला ‘विश्वगुरुत्व स्थिरांक’ म्हणतात.

G चे मूल्य 6.67×10-¹¹ Nm²/kg² आहे.

◆ पृथ्वीचे वस्तुमान M=6×10²⁴ kg आहे. ✓सरासरी त्रिज्या R=6400 km आहे.

◆ एखाधा वस्तूला पृथ्वी ज्या बलाने आपल्या केंद्राच्या दिशेने ओढते त्याला वस्तूचे वजन म्हणतात. वजन हे एक बलच आहे.

◆ वस्तूचे वजन हे तिच्यावर कार्यरत पृथ्वीचे गुरुत्वबल होय.

◆ एखाधा वस्तूचे वस्तूमान म्हणजे त्या वस्तूत सामावलेल्या एकंदर द्रव्याची राशी होय.

◆ कोणत्याही वस्तूंवर कार्यरत गुरुत्वत्वरण किंवा गुरुत्वबल विषुववृत्तापेक्षा ध्रुवावर जास्त असते. कारण पृथ्वी ही ध्रुवावर थोडीशी चपटी आहे, तर विषुववृत्तावर ती फुगीर आहे.

◆ गुरुत्व त्वरणचे मूल्य ध्रुवावर 9.83m/s² तर विषुववृत्तावर 9.78 m/s² आहे.

✓ सामान्य पदार्थातील अणूंना व रेणूंना एकत्रित ठेवण्यार्या/ बलास विधूतचुंबकीय बल असे म्हणतात.

◆ विधुत चुंबकीय बल गुरुत्व बलापेक्षा अनेक पटींनी मोठे आहे.

◆ विधुत चुंबकीय बलाचे परिणाम साधारणपणे गुरुत्वाबलाच्या 1039 पट आहे.

★ केंद्रकीय बल केंद्रकातील कणांना एकत्र ठेवते.

■ इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, न्युट्रॉन यांच्या होणार्या अन्योन्य क्रियांमध्ये प्रयुक्त होणारे बल क्षीण बल म्हणतात.

★ या लेखाचा उर्वरित भाग उद्या पाहू.

★ विज्ञानाचे मागील लेख https://t.me/TargetMpscMh वर पाहता येतील.

★ मित्रांनो विज्ञान चे लेख कसे वाटतात, आम्हाला खाली दिलेल्या link वर नक्की कळवा, आणि आपल्याला लेख आवडल्यास आपल्या मित्रांना पण Forward करा.

Feedback:- https://t.Me/Sudhirt_007

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

◆ Join https://t.me/TargetMpscMh

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂


Report Page