Science Special Article..
https://t.me/TargetMpscMh
📚 *Science Special (29/11/2018)*📚
Join https://t.me/TargetMpscMh
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
इयत्ता 8 वी विज्ञान महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळ
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
Chapter 6:- रासायनिक अभिक्रिया आणि त्यांचे प्रकार.
◆ रासायनिक अभिक्रिया समीकरणांच्या स्वरुपात लिहितात.
◆ रासायनिक अभिक्रियेत भाग घेणार्या पदार्थांना अभिक्रिया कारके असे म्हणतात.
◆ अभिक्रियकारके समीकरणाच्या डाव्या बाजूला लिहितात.
◆ रासायनिक अभिक्रियेत तयार झालेल्या पदार्थांना उत्पादिते असे म्हणतात.
◆ उत्पादिते समीकरण्याच्या उजव्या बाजूला लिहितात.
◆ अभिक्रियाकारके आणि उत्पादिते यांच्या दरम्यान बाण दिला जातो तो अभिक्रियेची दिशा दर्शवितो.
★ रासायनिक अभिक्रियांचे प्रकार :--
1. संयोग अभिक्रिया
2. अपघटन अभिक्रिया
3. विस्थापन अभिक्रिया.
■ संयोग अभिक्रिया :- -
◆ ज्या अभिक्रियेत दोन किंवा अधिक अभिक्रियाकारका पासून फक्त एकाच उत्पादित तयार होते अशा अभिक्रियेस संयोग अभिक्रिया असे म्हणतात.
उदा:--CaO+H2O---------->Ca(OH)2+ऊर्जा
कॅल्सियम + पाणी कॅल्सियम
हायड्राऑक्साइड
◆ वरील अभिक्रियेत कॅल्सियम ऑक्साइड व पाणी यांची अभिक्रिया होऊन कॅल्सियम हायडॉक्साइड हे एकच संयुग तयार झाले या अभिक्रियेस संयोग अभिक्रिया असे म्हणतात.
■ अपघटन अभिक्रिया: --
◆ ज्या अभिक्रियेत एका पदार्थाचे अपघटण होऊन दोन किंवा अधिक पदार्थ तयार होतात त्या अभिक्रियेस अपघटण अभिक्रिया असे म्हणतात.
उदा :--वरील आम्लिकृत पाण्यातून विजेचा प्रवाह पाठवल्यास पाण्याचे विद्युत अपघटण होऊन हायड्रोजन व ऑक्सीजन हे दोन उत्पादिते मिळतात.
■ विस्थापन अभिक्रिया . :--
◆ ज्या अभिक्रियेत एक घटक दुसर्या घटकाला विस्थापित करून वेगळे करतो त्या अभिक्रियेला विस्थापन अभिक्रिया असे म्हणतात.
■ ऑक्सीडिकरन आणि क्षपण :--
■ ऑक्सीडिकरन:-
◆ ज्या अभिक्रियेमध्ये मूलद्रव्याशी किंवा संयुगाशी ऑक्सीजन चा संयोग होतो किंवा संयुगातून हायड्रोजन गमावला जातो त्या क्रियेला ऑक्सीडीकरण असे म्हणतात.
उदा :-- C + O2 -------------- CO2
■ क्षपण:-
◆ ज्या अभिक्रियेत मूलद्रव्याशी किंवा संयुगाशी हायड्रोजनचा संयोग होतो किंवा संयुगातून ऑक्सीजन गमावला जातो त्या क्रियेला क्षपण क्रिया म्हणतात.
उदा:- Cl2 + H2 ----------------> 2HCL
★ रासायनिक अभिक्रियेचा वेग :--
◆ लोखंडाचे गंजणे ही मंदगतीने होणारी अभिक्रिया आहे. धुण्याचा सोडा आणि लिंबाचा रस मिसळल्यास कार्बन डायऑक्साइड लगेच फसफसून बाहेर पडतो. ही जलद घडणारी अभिक्रिया आहे.
◆ रासायनिक अभिक्रियांचा वेग वाढण्यासाठी कणांचा आकार , तापमान, संहती आणि उत्प्रेरक असे अनेक घटक कारणीभूत ठरतात. काही अभिक्रिया उत्प्रेरकामुळे जलद गतीने घडतात.
◆ जो पदार्थ अभिक्रियेत प्रत्यक्ष भाग घेत नाही , पण त्याच्या केवळ उपस्थितीतीमुळे अभिक्रियेचा वेग वाढतो त्याला उत्प्रेरक असे म्हणतात.
◆ पोटॅशियम क्लोरेटपासून ऑक्सीजन तयार करताना मॅगनिज डायऑक्साइड हे उत्प्रेरकाचे कार्य करते.वनस्पति तेलाचे क्षपण केले, की त्यापासून वनस्पति तूप मिळते, या अभिक्रियेत रेनी निकेल उत्प्रेरकाचे कार्य करते.
■ उष्मादायी-उष्माग्राही अभिक्रिया:-
काही अभिक्रिया होताना त्यातून ऊर्जा बाहेर पडते तर काही अभिक्रिया होताना त्यात उष्णता शोषली जाते.
■उष्मादायी
◆ ज्या अभिक्रीयेतून उष्णता ऊर्जा बाहेर पडते त्या अभिक्रियेला उष्मदायी अभिक्रिया असे म्हणतात.
■ उष्माग्राही:-
◆ तर ज्या अभिक्रियेत उष्णता ऊर्जा शोषली जाते त्या अभिक्रियेस उष्माग्राही अभिक्रिया असे म्हणतात.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
Chapter 7:- विद्युतप्रवाह
◆ साध्या विद्युत घटात जस्ताची पट्टी ऋण तर तांब्याची पट्टी धन ध्रुव म्हणून कार्य करते.
■ लेकलॅन्स विद्युतघट :--
◆ साध्या व्होल्टा विद्युतघटानंतर 1866 मध्ये जॉर्ज लेकलॅन्स या फ्रेंच शास्त्रज्ञाने जो घट तयार केला त्यास लेकलॅन्स घट असे म्हणतात .
◆ यात दंडगोलाकार च्छिद्र पात्रात मॅगनीज डायऑक्साइड आणि कार्बन यांचे मिश्रण वापरले जाते. यामध्ये ठेवलेली कार्बणी दांडी धन ध्रुव म्हणून वापरली जाते. तर जस्तची दांडी घटाचा ऋण ध्रुव असते.
◆ एका काचेच्या भांड्यात अमोनिअम क्लोराईड द्रावण घेऊन त्यात छिद्र असलेले पात्र जस्तची दांडी ठेवतात. मॅगनिज डायऑक्साइड, जस्त आणि अमोनिअम क्लोराईड चा संयोग होऊन विद्युतप्रवाह मिळतो.
■ कोरडा विद्युतघट :--
◆ आज आपण सर्वत्र जो विद्युतघट वापरतो तो कोरडा विद्युतघट आहे. विद्युत खेळणी, वेजेरी इत्यादि मध्ये त्याचा वापर होतो.
◆ त्याच्यात एक धातूची टोपी, कार्बन ची कांडी मॅगनिज डायऑक्साइड आणि ग्राफाइट इत्यादि घटक असतात.
■ निकेल कॅडमीअम घट :
◆ आजकाल अनेक विद्युत उपकरणे हाताळावी लागतात. ड्रिल मशीन, बगीच्यात वापरावी लागणारी यंत्रे इत्यादि यात निकेल कॅडमीअम विद्युतघट वापरतात.
◆ निकेल कॅडमीअम विद्युत घटात कॅडमीअम हा धातू ऋण ध्रुव असतो, तर निकेल धन ध्रुव. या दोघामध्ये पोटॅशियम हायड्रोक्साइड ही अल्कली भरली जाते. हा घट वायुबंद करण्यात येतो. त्यामुळे गळती होत नाही. शिवाय निकेल कॅडमीअम घटाचा मुख्य फायदा म्हणजे हा अनेक वेळा पुनरप्रभारीत करता येतो.
■ बटन सेल : --
◆ बटन सेल म्हणजे गुंडीच्या आकाराचा घट होय. आजकाल घड्याळे, विद्युत खेळणी, कॅमेरा, कॅलकुलेटर, यांत हा विदयूत घट वापरण्यात येतो. जागा कमी असल्याने या घटाचा आकार कमी ठेवला जातो. बटन सेल ला लिथियम सेल देखील म्हणतात. अशा घटात लिथियम आयर्ण फॉस्फेट ऋण धुर्व तर कार्बन हा धन ध्रुव असतो. दोघांच्या दरम्यान लिथियम चे क्षार भरलेला असतो.
मित्रांनो विज्ञान चे लेख कसे वाटतात, आम्हाला खाली दिलेल्या link वर नक्की कळवा, आणि आपल्याला लेख आवडल्यास आपल्या मित्रांना पण Forward करा.
Feedback:- https://t.Me/Sudhirt_007
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
◆ Join https://t.me/TargetMpscMh ◆
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
