PuneRooms चॅनेल वर रूममेट्स हवे असल्याचा msg/request पाठवण्याबाबत काही सूचना

PuneRooms चॅनेल वर रूममेट्स हवे असल्याचा msg/request पाठवण्याबाबत काही सूचना

eMPSCkatta



@eMPSCkatta टेलिग्राम चॅनेल कडून चालवल्या जात असलेल्या @PuneRooms चॅनेल बाबतीत मागील अनुभव पाहता, या चॅनेल वर रुममेट्सची request पोस्ट करण्यासाठी काही नियम कडक करत आहे. जे लोक हे नियम पाळतील केवळ त्यांचीच requeat चॅनेल वर पोस्ट होईल याची नोंद घ्यावी....

1) तुमच्या रूममध्ये जागा असल्यास तिथे रूममेट्स मिळवून देण्यात हे चॅनेल मदतगार ठरेल, रूम हवी आहे या प्रश्नाचे उत्तर आपल्या चॅनेलवर मिळत नाही. (आम्ही ब्रोकर नाही आहोत, तेंव्हा रूम/1-2 BHK हवा आहे आशा आशयाच्या request करू नयेत.)

2) टेलिग्राम युजरनेम सेट करून ते तुमच्या msg मध्ये नोंद केल्याची खात्री करूनच आपली request पाठवावी. तुमच्या request मध्ये संपर्कासाठी फक्त नि फक्त टेलिग्राम युजरनेमच टाकावे, फोन नंबर टाकू नये. (टेलिग्राम युजरनेम पुढील प्रमाणे सेट करावे - Setting > Username>set username)
● युजरनेम कसे सेट करावे हे जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

3) आपल्या request मध्ये फोन नंबर टाकु नयेच.

●फक्त टेलिग्राम युजरनेमच का? फोन नंबर का नाही?

याचा फायदा असा होईल की जे लोक तुम्हाला टेलिग्राम वर msg करतील फक्त त्यांनाच तुम्ही तुमचा फोन नंबर द्या. नंबर सार्वजनिक झाला तर तुमची requirment पूर्ण झाल्या नंतरही तुम्हाला कॉल येत राहतील जे तुम्हाला त्रासदायक ठरू शकते.
(चॅनेल वरील सदस्य चॅनेल वरील request त्यांच्या मित्र/मैत्रिणींनाही फॉरवर्ड करत असतात, अशावेळी आम्ही चॅनेल वरील आपली request डिलीट केली तरीही फॉरवर्ड केलेलं msg डिलीट होत नसतात. त्यामुळे, नंतरही कॉल/msg येऊ शकतात)

म्हणून यापुढे request पाठवताना कुणीही फोन नंबरचा उल्लेख करू नये.... आशा request टाकल्या जाणार नाहीत.

4) request ज्या अकाउंट वरून आलेली आहे, त्याच अकाउंटचे युजरनेम msg मध्ये दिलेले असावे. मित्र/मैत्रीण/बहीण/भाऊ यांच्यासाठी request पाठवू नयेत. ज्याचे त्याचे काम त्याला करू द्यावे. आपण त्यांना योग्य फॉरमॅट मध्ये request पाठवण्यास मदत करावी.
(यापूर्वी काही लोकांनी खोडसाळपणे/त्रास देण्याच्या हेतूने दुसऱ्याचे युजरनेम नोंदवून request पाठवल्या होत्या, अशावेळी वादाचे प्रसंग उद्भवू शकतात. हे टाळण्यासाठीच ज्या अकाउंट वरून request आलेली आहे त्याच अकाउंट चे युजरनेम दिले असल्याची खात्री करावी.)

5) @eMPSCkatta टेलिग्राम चॅनेल कडून चालवली जाणारी ही एक विद्यार्थी उपयोगी आणि मोफत सेवा असल्याने, आम्ही आलेल्या request रोजच्या रोज टाकत नाही. सर्वसाधारणपणे आम्ही 2-3 दिवसांच्या अंतराने योग्य फॉरमॅटमध्ये आलेल्या request @PuneRooms चॅनेलवर पाठवत असतो.
(वरील बाब लक्षात घेऊन @PuneRooms वर नवीन request पोस्ट होण्याची वाट पाहावी, दररोज msg करण्याची गरज नाही. आपण योग्य फॉरमॅट मध्ये request पाठवली असेल तर इतरांबरोबर आपलीही request @PuneRooms वर पोस्ट होईल. इतरांच्या request पोस्ट होऊनही आपली झाली नसेल तर प्रथम आपण पाठवलेल्या माहितीमध्ये काही त्रुटी आहेत का पहाव्यात, असल्यास सुधारणा करून आपल्या request चा msg पुन्हा पाठवावा.)

6) ज्याप्रमाणे 2-3 दिवसांनी नवीन request पोस्ट केल्या जातात, त्याचप्रमाणे 2 ते 3 दिवसातून जुन्या request डिलीट केल्या जातात. त्यामुळे आपली मागणी पूर्ण होताच request डिलीट करा असा msg वारंवार करू नये.
(मागणी पूर्ण होताच आपले युजरनेम बदलावे, यामुळे आपणास कोणी msg/संपर्क करू शकणार नाही, शिवाय फॉरवर्ड झालेल्या msg मधून येणारे msg/टेलिग्राम कॉल्स पासूनही सुटका होईल.)

7) आपण चालवत असलेल्या या मोफत उपक्रमातून प्रेरणा घेऊन काही इतर लोकांनीही आशा प्रकारच्या चॅनेल्सची निर्मिती केली आहे, @PuneRooms या आपल्या नावाप्रमाणे नामसाधर्म्य असलेली टेलिग्राम चॅनेल्स सुरू केलेली आहेत. मात्र त्यासाठी ते लोक पैसे घेतात. तरी आपण @PuneRooms आणि इतर चॅनेल मधील हा मूलभूत फरक लक्षात घ्यावा.
(आपली इतर ठिकाणी फसवणून झाल्याचे/इतर अडमीननी पैसे घेतल्याचे msg आम्हास करू नये. आमची सेवा विद्यार्थ्यांसाठी पूर्णपणे मोफत आहे. याची नोंद घ्यावी. आपली request आम्हास केवळ @eMPSCkattaAdmin या अकाउंट वरच पाठवावी. या अकाउंट शिवाय इतर ठिकाणी पाठवलेल्या request/दिलेल्या पैश्यासाठी आम्ही म्हणजे @PuneRooms किंवा @eMPSCkatta किंवा @eMPSCkattaAdmin जबाबदार असणार नाहीत.)

8) सर्वात महत्वाचे, रूममेट्ससाठी दिलेल्या request मधील माहिती आधारे त्यांना संपर्क करताना त्यांनी दिलेल्या वेळेत संपर्क करावा. त्यांना त्रास होईल अशाप्रकारचे संभाषण/चुकीची भाषा वापरू नये.
(खासकरून मुलींना मुलांकडून बिनकामाचे msg केले जातात, त्यावर आवर घालावा. मुलींनीही अशाप्रकारच्या बिनकामी msg करणाऱ्यांना तात्काळ ब्लॉक करावे.)

9) रूम मेट्ससाठी request फक्त खालील फॉरमॅट मधेच पाठवावी:
----------------------------------------------------------------------
रुम पार्टनर्स हवे आहेत- मुले/मुली

फ्लॅट/रूम

भाडे-
डिपॉजिट-
ब्रोकरेज-

ठिकाण-

संपर्कासाठी टेलिग्राम युजरनेम-

संपर्कची निश्चित वेळ-

वरील माहिती आम्हास https://t.me/empsckattaAdmin येथे पाठवावी
----------------------------------------------------------------------

Report Page