Economics Special Article...
https://t.me/TargetMpscMh📚 *ECONOMICS SPECIAL (06/05/2020)*📚
Join https://t.me/TargetMpscMh
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
★ लोकसंख्या (Population) Part.2
ब ) साक्षरता :-
◆ साक्षरता हे प्रगत समाजाचे लक्षण आहे. महाराष्ट्रात 83% लोक साक्षर असून स्त्रियांच्या साक्षरतेचे प्रमाण 67.5% आहे तर पुरुषांच्या साक्षरतेचे प्रमाण 80.2% आहे,
◆ मुंबई व मुंबई उपनगर मध्ये पुरुष साक्षरतेचे प्रमाण 87% आहे. कारण हा पूर्णपणे नागरी विभाग आहे. तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये साक्षरतेचे प्रमाण सर्वात जास्त आहे. पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांमधील साक्षरतेचे प्रमाण महाराष्ट्राच्या सरासरी साक्षरते इतकी आहे तर मध्य महाराष्ट्र व पूर्व महाराष्ट्र विभागांमध्ये हे प्रमाण कमी आहे. चंद्रपूर, गडचिरोली, नंदुरबार या जिल्ह्यांत आदिवासी जमातींचे प्रमाण जास्त असल्यामुळे साक्षरतेचे प्रमाण अतिशय कमी आहे.
◆ राज्यातील साक्षरतेचे प्रमाण 2001 मधील 76.9% पासून 2011 मध्ये 82.3% पर्यंत वाढले आहे. या कालावधीकरिता स्त्री-साक्षरता दरांमधील वाढ (8.9%) आहे. ही पुरुष साक्षरता दरापेक्षा (2.4%) अधिक आहे. स्त्री – पुरुष साक्षरता दरामधील तफावत 2001 मधील 18.9% वरून 2011 मध्ये 12.5% पर्यंत कमी झाली आहे.
◆ राज्यातील ग्रामीण व नागरी भागातील साक्षरतेचे प्रमाण अनुक्रमे 77% व 88.7% आहे. साक्षरता दरातील ग्रामीण- नागरी तफावत देखील 2001 मधील 15.1% वरून 2011 मध्ये 11.7% पर्यंत कमी झाली आहे.
क ) लिंग गुणोत्तर :-
◆ एखाद्या लोकसंख्येत स्त्रियांची संख्या दर हजार पुरुषाबरोबर किती अशा स्वरूपात लिंगगुणोत्तर सांगता येते. लिंगगुणोत्तरावरून लोकसंख्येची सामाजिक स्थिती समजते.ज्या लोकसंख्येत स्त्री-पुरुषांना समान दर्जा असतो तेथे हे प्रमाण हजाराच्या जवळ असते. महाराष्ट्रात पुरुषांपेक्षा स्त्रियांची संख्या कमी आहे.
◆ महाराष्ट्रात गेल्या 10 वर्षांमध्ये लिंग गुणोत्तर 992 वरून 929 वाढलेले आढळते. (Check again)
◆ महाराष्ट्रात सर्वात जास्त लिंग गुणोत्तर रत्नागिरी जिल्ह्यात (1122) आहे. कारण येथून पुरुषांचे व्यवसायानिमित्त स्थलांतर जास्त होते तर सर्वात कमी लिंग गुणोत्तर मुंबई शहर (838) जिल्ह्यात आहे.
◆ मुंबईकडे अन्य राज्यांतून व्यवसायानिमित्त पुरुषांचे होणारे स्थलांतर जास्त आहे.
◆ संपूर्ण लोकसंख्येचे लिंगगुणोत्तर निर्धारित केले जाते त्याचप्रमाणे अलीकडे 0 ते 6 या वयोगटासाठी देखील बाल लिंग गुणोत्तर काढले. याचा उपयोग व भविष्यकाळातील लोकसंख्येचे अंदाज करण्यासाठी होतो तसेच तो लोकसंख्येच्या एक सामाजिक निकष मानला जातो.
◆ महाराष्ट्रात या वयोगटातील लिंग गुणोत्तर 894 इतके आहे. सर्व राज्यातील सर्वात जास्त बाल लिंग गुणोत्तर गडचिरोली (961) जिल्ह्यात आहे. तसेच सर्वात कमी बाललिंग गुणोत्तर बीड (807) जिल्ह्यात आहे.
■ बाल लिंग गुणोत्तर प्रमाण :
◆ राज्यातील बाल लिंग गुणोत्तर प्रमाण 2001 मधील 913 वरून 19 ने कमी होऊन 2011 मध्ये 894 झाले आहे. बीड जिल्ह्यामध्ये 2011 मध्ये हे प्रमाण सर्वात कमी 807 नोंदवले गेले असून वर्ष 2001 ते 2011 या कालावधीमध्ये 86 गुणांची मोठी घसरण नोंदविली आहे.
◆ सन 2001 ते 2011 या कालावधीत कोल्हापूर (863), सातारा (895), सांगली (867) आणि चंद्रपूर (953) जिल्ह्यांमध्ये बाल लिंग गुणोत्तर प्रमाणामध्ये किंचित सुधारणा झाली आहे.
■ तिसरा लिंग गट :
◆ जनगणनेमध्ये इतर या तिसऱ्या लिंग गटाच्या 2011च्या जनगणनेत प्रथम समावेश करण्यात आला आहे. या गटामध्ये किन्नर लोकसंख्येसह ज्या व्यक्ती इतर गटांमध्ये नोंद करून घेण्यास इच्छुक आहेत. अशांचाही समावेश करण्यात आला आहे. जनगणना 2011 नुसार राष्ट्रीय पातळीतील सुमारे 4.88 लाख व्यक्तींची नोंद या गटांमध्ये करण्यात आली असून त्यापैकी 8.4% व्यक्ती राज्यामध्ये आहे. राज्यातील या गटाचा कार्य सहभाग दर 38 असून राष्ट्रीय पातळीवर तो 34 आहे.
★ लोकसंख्येची घनता :
◆ एखाद्या प्रदेशाचे क्षेत्रफळ व तेथील एकूण लोकसंख्या यावरून दर चौरस किलोमीटर मध्ये किती लोक राहतात याचे प्रमाण काढता येते. या प्रमाणास लोकसंख्येची घनता असे म्हणतात.
---------------------------------------------------
● लोकसंख्येची घनता = एकूण लोकसंख्या / एकूण क्षेत्रफळ
● महाराष्ट्राची घनता = 11,23,72,972 / 3,07,713 = 365.18
----------------------------------------------------
◆ महाराष्ट्राचे एकूण क्षेत्रफळ 3,07,713 चौरस किलोमीटर असून लोकसंख्या 11,23,72,972 इतकी आहे त्यामुळेच राज्याची सरासरी घनता लोकसंख्या घनता 365 इतकी आहे.
★ लोकसंख्येचे घनतेनुसार वितरण:-
1) अतिविरळ घनतेचे प्रदेश: ( 150 पेक्षा कमी लोकसंख्या)
◆ महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यात लोकसंख्येची घनता अत्यंत विरळ आहे. या जिल्ह्यात वनक्षेत्र जास्त असून आदिवासी लोकांचे अधिक प्रमाण आहे. शेती, वाहतूक व उद्योगांचा विकास न झाल्याने या जिल्ह्यात लोकसंख्येची घनता अतिविरळ आहे.
2) विरळ घनतेचे प्रदेश: (151 ते 300 लोकसंख्या )
◆ पश्चिम महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वताच्या पूर्व भागात दक्षिणोत्तर पर्जन्यछायेचा प्रदेश आढळतो. त्यामुळे धुळे, अहमदनगर, बीड या जिल्ह्यांमध्ये विरळ लोकवस्ती आढळते. राज्याच्या पूर्व भागात डोंगराळ आणि वनांचा प्रदेश असल्याने भंडारा,गोंदिया, चंद्रपूर या जिल्ह्यांत लोकसंख्या विरळ आढळते तर अमरावती, अकोला, वाशीम, यवतमाळ, हिंगोली, परभणी जिल्ह्यांमध्ये शेती उत्पादनातील अनिश्चितता व भटक्या जाती -जमातीचे प्रमाण जास्त असल्याने लोकसंख्या विरळ आढळते.
3) मध्यम घनतेचे प्रदेश: (301 ते 450 लोकसंख्या)
◆ पश्चिम महाराष्ट्रातील नाशिक, सातारा, जळगाव, अहमदनगर या जिल्ह्यांबरोबरच मराठवाडा आणि विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांत लोकसंख्येची घनता मध्यम आढळते या प्रदेशांमधे शेती हा प्रमुख व्यवसाय असून औद्योगिकरणात प्रगती होत आहे.
4) जास्त घनतेचे प्रदेश: (451 ते 600 लोकसंख्या)
◆ यामध्ये नागपूर व कोल्हापूर जिल्ह्याचा समावेश होतो. नागपूर हे देशाच्या मध्यवर्ती भागात असून वाहतूक मार्गाचे केंद्र आहे तर कोल्हापूर जिल्हा शेती व औद्योगिक उत्पादनात विकसित असल्याने तेथे लोकसंख्येची घनता जास्त आहे.
5) अति जास्त घनतेचे प्रदेश: ( 601 पेक्षा जास्त लोकसंख्या)
◆ मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पुणे या जिल्ह्यांची लोकसंख्येची घनता दर चौरस किलोमीटरला 600 पेक्षा जास्त आहे.
◆ मुंबई हे एक नैसर्गिक बंदर, महाराष्ट्राची राजधानी व देशाची आर्थिक राजधानी आहे. तसेच ठाणे, पुणे या जिल्ह्यांमध्ये तंत्रज्ञान व वाहतुकीचा विकास झाल्याने मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. या प्रदेशांकडे लोकसंख्येचे स्थलांतर झाल्याने लोकसंख्येची घनता अती जास्त आहे. या लेखाचा उर्वरीत भाग उद्या पाहू.
★अर्थशास्त्र, इतिहास, विज्ञान व भूगोलचे मागील लेख 👉 https://t.me/joinchat/AAAAAEDVriGYvqlXN0bU1Q वर पाहता येतील.
★ मित्रांनो अर्थशास्त्रचे लेख कसे वाटतात, आम्हाला खाली दिलेल्या link वर नक्की कळवा, तुमचा Feedback आमच्यासाठी खूप महत्त्वाचा असतो,आपल्याला लेख आवडल्यास जास्तीत जास्त मित्रांना Forward करा.
👉Feedback:- https://t.Me/Sudhirt_007
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
Join https://t.me/joinchat/AAAAAEDVriGYvqlXN0bU1Q
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂