'हायब्रीड'चा अवलंब करताना...

'हायब्रीड'चा अवलंब करताना...

महाराष्ट्र टाइम्स संपादकीय
सुनील वॉरियर

करोनाकाळाने आपल्या आयुष्यात अनेक नव्या गोष्टी आल्या, त्यापैकी एक म्हणजे ''. आता घरून काम आणि ऑफिसमधून काम या दोन्हीची सांगड घालणारी ' पद्धत अनेक ठिकाणी अवलंबिली जात आहे. या पद्धतीच्या फायद्या-तोट्याचा हा लेखाजोखा...

कोव्हिड महासाथीच्या उद्रेकानंतर जगाने टाळेबंदीचा अनुभव घेतला. आपल्यापैकी अनेकांना सर्वार्थाने नवीन कार्यालयीन पद्धतीचा अवलंब करावा लागला. कार्यालयीन कामकाज कुठूनही किंवा घरातून करण्याची मुभा नव्या धोरणांनी दिली. तरीही काही काही कामाचे स्वरूपच असे होते, की तिथे शंभर टक्के 'रिमोट वर्क' शक्यच नसते. अशा परिस्थितीत दोन पद्धतींमध्ये समतोल साधण्यासाठी जो सुवर्णमध्य काढण्यात आला त्यालाच आता '' म्हणतात. या पद्धतीच्या व्यवस्थेत कर्मचाऱ्याला कार्यालयीन कामकाज हे ऑफिसला जाऊन पूर्ण करावे लागते, तर कधी तरी थोडे फार कामकाज कार्यालयाबाहेरून (बहुतांशी घरातून) करण्याची मोकळीक असते. या पद्धतीचे काम सोपवताना आणि त्यावर देखरेख ठेवताना बऱ्याच फेरव्यवस्थेची आवश्यकता असते. कार्यालयीन ठिकाणी कार्यतत्पर जागांची सुविधा उपलब्ध करून देण्याऐवजी प्रोत्साहन देणाऱ्या टीमचे फेरआरेखन करावे लागते. सामाजिक अंतर राखण्यासाठी भरपूर मोकळ्या जागेची सोय आणि रिमोट (कार्यालयाबाहेरून/ बहुतांशी घरातून) तसेच कार्यालयांत येऊन काम करणाऱ्यांकरिता अधिक लवचीक कार्यालयीन वेळापत्रके निश्चित करावी लागतात.

अलीकडेच 'सेल्सफोर्स'च्या सर्वेक्षणातून माहिती समोर आली, की साधारणपणे ६४ टक्के कर्मचाऱ्यांना अधूनमधून कार्यालयाबाहेरून काम करायला आवडते. आणखी ३७ टक्के कर्मचारी वर्गाची महासाथीनंतर पूर्णवेळ घरातून काम करण्यास पसंती दिसून आली. एक संकल्पना म्हणून हायब्रीड कार्यालयीन पद्धत उत्तम सिद्धान्त ठरतो आहे. या पद्धतीचे फायदे आणि तोटेही आहेत. आधी फायदे पाहू.

'हायब्रीड'चे फायदे

उत्पादकतेवर भर : पारंपरिकरीत्या, मालकाला अधिकाधिक कर्मचारी वर्ग कार्यालयात हजर राहावा ही अपेक्षा असायची. त्याला कामाच्या तासांची हमी पाहिजे आणि अधिकाधिक कार्यशीलता अपेक्षित होती. आपला प्रकल्प नेमून दिलेल्या तासांच्या आत पूर्ण व्हावा व त्याकडे व्यवस्थापनाचे लक्ष असावे असा सर्वसाधारण दृष्टिकोन असे. मात्र, आताच्या काळात उत्पादनशीलता आणि त्याचे परिणाम सुधारण्यावर अधिक भर असतो. टीमना आवश्यक ते स्रोत उपलब्ध करून त्यांना पाठबळ देणे, आणि कामाचे व जबाबदऱ्यांचे सुस्पष्ट विभाजनाला प्राधान्य दिले जाते.

कामकाज खर्चात कपात : कार्यालयात कर्मचारी संख्या कमी करून आकाराने लहान कार्यालयीन जागा शोधण्याकडे मालकांचा कल आहे. हायब्रीड मॉडेल मोठ्या प्रमाणावर रुजताना, भाडे खर्चात बचत होते आणि कार्यालयीन सोयीसुविधादेखील मर्यादित प्रमाणात लागतात. याचा अर्थ कर्मचारी वर्गाचा प्रवासावर होणारा खर्च आणि वेळ या दोन्हीची बचत होते. बसण्याच्या सुट्या जागांऐवजी मीटिंग रूमची संख्या वाढवल्याने चांगली बचत होते.

भागीदारीची पुनर्व्याख्या : आता कर्मचाऱ्यांचे ब्रेनस्टॉर्म किंवा त्यांच्यासोबत एकत्र काम करण्यासाठी सल्लामसलतीकरिता मीटिंग रूमची आवश्यकता उरलेली नाही. कोणत्याही वेळी संवाद आणि व्हीडिओ कॉलची सोय असणारी सॉफ्टवेअर उपलब्ध असल्याने मीटिंगकरिता ठरावीक जागेची गरज उरलेली नाही. त्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणी पसरलेल्या कर्मचारी वर्गाच्या समन्वयाला चालना मिळते. सगळे एकाच ठिकाणी, एकत्र कार्यरत असल्याची भावना जोपासली जाते. उदाहरणार्थ टीमकरिता आठवड्यातून एकदा ३० मिनिटांचे सत्र उपलब्ध करून देण्यात येते. त्यामध्ये सुरू असलेले प्रकल्प, सोपवण्यात आलेल्या जबाबदाऱ्या आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे कामाच्या पलीकडील कर्मचारी आव्हाने, चर्चा, कर्मचाऱ्यांचे कल्याण इत्यादीचे आदान-प्रदान होते. कार्यालयाबाहेरून काम करताना व्यवस्थापनाकडून लवचीकता आणि विश्वासाची गरज कर्मचाऱ्याला असते. मालकांनी कर्मचारी वर्गाला लॅपटॉप आणि डेस्कटॉपसह त्याच्या सोयीनुरूप कामाच्या अनुषंगाने भत्ता उपलब्ध करून दिला, तर साचेबद्ध आणि नेहमीच्या दैनंदिनीला बगल मिळते. कर्मचारी वर्गात संवाद साधला जातो आणि व्यावसायिक व वैयक्तिक जीवनाबद्दल संवाद साधला जातो. हायब्रीड पद्धत उत्पादकता वाढविण्यासोबतच कर्मचाऱ्याच्या समाधानाची पातळी वाढवते. त्यामुळे कर्मचारी वर्गाला सातत्याने शिकण्याच्या आणि विकासाच्या संधी उपलब्ध होतात.

कर्मचारी व त्याच्या कुटुंबाचा सहभाग : बऱ्याच संघटना आपल्या कर्मचारी वर्गासोबत, त्याचे कुटुंब आणि मुलांनादेखील विविध उपक्रमांत सामील करून घेत आहेत. आरोग्य आणि तंदुरुस्तीवरील सत्रे, अंताक्षरी, टॅलेंट शो, स्कॅवेंजर हंट, हौजी इत्यादीत कर्मचारी कुटुंबासह सहभागी होतात. तसेच चित्रकला, रंगकाम स्पर्धा, डीआयव्हाय वर्कशॉप, कथाकथन इत्यादींत बालकांचा समावेश असतो.

'हायब्रीड'चे तोटे

असे असले तरी हायब्रीड पद्धतीचे काही तोटेही आहेत. ते असे :

क्लाएंट अनुभवाला घसरण : अनेक व्यवसायांत, क्लाएंट व्यवस्थापनाचा विशेष स्तर (स्पेशलायझेशन लेव्हल) असतो. कार्यालयात क्लाएंट समोर येऊन बसणे अनिवार्य नसल्याने काही अतिमहत्त्वाच्या आणि गंभीर प्रकरणांकडे दुर्लक्ष होऊ शकते. एखाद्या क्लाएंटला विशेष सेवा पाहिजे असल्यास त्याविषयीची बोलणी करण्यासाठी समोरासमोर संभाषणाची आवश्यकता वाटू शकते. अशा पद्धतीत ओळखीतल्या ग्राहक अनुभवाला ग्रहण लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. अर्थात या समस्येवर तंत्रज्ञानाची मदत घेता येते. मात्र, त्यात एकूणच नवीन आखलेल्या प्रक्रियांचे सुरळीत आदान-प्रदान होत नाही.

वाढते कर्मचारी अलगीकरण : दीर्घकाळापासून कर्मचारी हे आपल्या सहकाऱ्यांपासून दूर राहिले तर परस्पर सद्भाव हरवण्याची शक्यता निर्माण होते. मैत्रीपूर्ण संवाद तुटल्याने एकटेपणा जाणवू लागतो. कंपनीच्या सहकारी वर्गासोबत हास्यविनोद, गप्पागोष्टी आणि कंपनी आउटिंग दुरापास्त होते. कार्यालयांत आधीच महिलावर्ग तोकडा असतो. त्यातच महिलांची मते ऐकून घेणारा कान दुरावतो. कामाशिवाय होणारा संवाद बंद होतो. सद्यस्थितीत मानसिक आणि भावनिक आरोग्याकडे काटेकोर लक्ष देणे मुख्य गरज आहे. दीर्घकालीन अलगीकरणाने मनुष्याची 'कुणीतरी आपले ऐकावे, आपणही कुणाच्या संपर्कात असावे' ही गरज मारून टाकली जाते. इथे एम्प्लॉयी वेलनेस प्रोग्राम महत्त्वाची भूमिका बजावू शकतात.

सायबर जोखमीचा धोका अधिक : ज्या वेळी रिमोट पद्धतीने कार्यालयीन कामकाज चालते, त्या वेळी सायबर हल्ला होऊन महत्त्वाची माहिती गमावण्याचा धोका सर्वाधिक असतो. अशा स्थितीत कंपन्यांनी सुरक्षित डिजिटल पर्याय व सेवांचा अवलंब करत सातत्याने सॉफ्टवेअर अद्ययावत करणे, सशक्त पासवर्ड व्यवस्थापन आणि बहुआयामी ऑथेंटिकेशनच्या माध्यमातून डेटाचोरीला पुरेसे संरक्षण प्रदान करणे अत्यावश्यक ठरते.

वैयक्तिक अडचणी : कार्यालयीन कामकाज आणि आयुष्याचा समतोल राखण्यातली अभिनव आव्हाने नवी आहेत. काही कर्मचारी हे पालकही असतात. मुलांकडे किंवा अन्य घरगुती कामांकडे लक्ष देऊन मीटिंगला उपस्थिती लावण्याचे शिवधनुष्य त्यांना एकत्र पेलायचे असते. त्यातून सहकाऱ्याचे व्यक्तिगत आयुष्य कामाच्या आड येण्यासारख्या अडचणी येऊ शकतात. घरून काम करण्याच्या पद्धतीत विपरीत परिणाम होऊन एकंदर मानसिक आरोग्याचे खच्चीकरण होऊ शकते. अशा वेळी व्यवस्थापकांसमोर परिस्थितीने ही नवी आव्हाने उभी केली आहेत.

(लेखक 'फ्युचर जेनराली इंडिया इन्शुरन्स'मध्ये मुख्य लोकाधिकारी आहेत.)

---



मटाचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करा

Report Page