वनलाइनर :~ चालू घडामोडी : 19 सप्टेंबर 2020

वनलाइनर :~ चालू घडामोडी : 19 सप्टेंबर 2020

https://t.me/joinchat/AAAAAEXRmywtGDyU5kh7mQ

आंतरराष्ट्रीय

इन्स्टिट्यूट फॉर मॅनेजमेंट डेव्हलपमेन्ट (IMD) या संस्थेच्या ‘2020 स्मार्ट सिटी इंडेक्स’ याच्या यादीत पहिला क्रमांक - सिंगापूर (त्यापाठोपाठ हेलसिंकी आणि ज्यूरिख).

  • IMDच्या ‘2020 स्मार्ट सिटी इंडेक्स’ याच्या यादीत भारतीय शहरे - हैदराबाद (85 वा), नवी दिल्ली (86 वा), मुंबई (93 वा), बेंगळुरू (95 वा).

राष्ट्रीय

  • पेंढा जाळल्याने दिल्ली आणि त्याच्या आसपासच्या भागावर होणाऱ्या परिणामाचे सखोल विश्लेषण करण्यासाठी ही विदेशी संस्था ‘समुदाय प्रतिसाद मंच’ स्थापन करणार आहे - नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस अॅडमिनिस्ट्रेशन (NASA).
  • ‘अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद (AICTE) उत्कर्ष संस्थान विश्वकर्मा पुरस्कार 2020’ याचा प्रथम विजेता (एकूणच) – कॉलेज ऑफ इंजिनीयरिंग, पुणे.
  • विमानात वाय-फाय इंटरनेट सेवा देणारी पहिली भारतीय विमानचालन कंपनी – विस्तारा.
  • खासगी विमानांसाठी भारताचे पहिले सर्वसामान्य विमानचालन टर्मिनल - इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ, दिल्ली.
  • 13 सप्टेंबर 2020 पर्यंत, भारताने एअर बबल करार केलेले 10 देश – अमेरिका, कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, ब्रिटन, मालदीव, संयुक्त अरब अमिराती, कतार, अफगाणिस्तान आणि बहरीन.
  • होमिओपॅथीक शिक्षण आणि सराव पद्धती नियमित करण्यासाठी मान्यता देण्यात आलेली नवी संस्था - केंद्रीय होमिओपॅथी परिषद.

व्यक्ती विशेष

  • उप-राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार पदावर असलेली व्यक्ती, जिचा कार्यकाळ 3 सप्टेंबर 2020 पासून एक वर्षासाठी वाढविण्यात आला - पंकज सरन.

क्रिडा

  • आंतरराष्ट्रीय टेनिस महासंघाकडून बदलण्यात आलेले ‘फेड कप’ स्पर्धेचे नवे नाव - बिली जीन किंग कप.

राज्य विशेष

  • या राज्याच्या राज्य शालेय शिक्षण विभागाने इयत्ता 5 वी प्राथमिक शिक्षणाच्या अंतर्गत समाविष्ट करणार आहे - महाराष्ट्र.
  • 18 सप्टेंबर रोजी या राज्याच्या पोलीस विभागाच्या वतीने “cOcOn 2020” नामक सायबर सुरक्षा व हॅकिंग परिषद आयोजित करण्यात आली होती - केरळ.
  • हिमाचल प्रदेशाचे मुख्यमंत्री जय राम ठाकूर यांच्या हस्ते या ठिकाणी “स्वच्छता कॅफे”चे उद्घाटन करण्यात आले - नालागड, सोलन जिल्हा.
  • ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ कार्यक्रमांतर्गत, गोवा याची जोडी या राज्यासोबत तयार करण्यात आली - झारखंड.

ज्ञान-विज्ञान

  • अशोक लेलँड आणि _____ या कंपनीने ‘झिंक एअर बॅटरी’ विकसित करण्यासाठी IIT मद्रास या संस्थेसोबत करार केला - हिंदुस्तान झिंक.
  • जगातला आकाराने सर्वात छोटा अल्ट्रासाऊंड डिटेक्टर, जो जर्मन संशोधकांनी विकसित केलेला असून तो सरासरी मानवी केसांपेक्षा 100 पट छोटा आहे - सिलिकॉन व्हेवगाइड-एटालॉन डिटेक्टर (SWED).

सामान्य ज्ञान

  • संयुक्त राष्ट्रसंघाची सनद – स्वीकारले: 26 जून 1945; प्रभावीः 24 ऑक्टोबर 1945.
  • वाणिज्यदूतीय संबंध विषयी व्हीएन्ना करारनामा - स्वीकारले: 24 एप्रिल 1963; प्रभावीः 19 मार्च 1967.
  • विशेष मिशन विषयी करारनामा (न्यूयॉर्क करारनामा) - स्वीकारले: 8 डिसेंबर 1969; प्रभावीः 21 जून 1985.
  • राज्ये व त्यांच्या मालमत्तेची न्यायिक उन्मुक्ति विषयी संयुक्त राष्ट्रसंघाचा करारनामा स्वीकारण्यात आला तो दिवस - 2 डिसेंबर 2004.
  • नरसंहाराच्या गुन्ह्यावरील प्रतिबंध व शिक्षा विषयी करारनामा - स्वीकारले: 9 डिसेंबर 1948; प्रभावी: 12 जानेवारी 1951.
  • वर्णद्वेषाच्या सर्व प्रकारांचे निर्मूलन विषयी आंतरराष्ट्रीय करारनामा - स्वीकारले: 7 मार्च 1966; प्रभावी: 4 जानेवारी 1969.

https://t.me/joinchat/AAAAAEXRmywtGDyU5kh7mQ

Report Page