यूएफा सुपर चषक फुटबॉल : बायर्न म्युनिकला जेतेपद

यूएफा सुपर चषक फुटबॉल : बायर्न म्युनिकला जेतेपद

https://t.me/LoksattaOnline

जावी मार्टिनेझच्या निर्णायक गोलमुळे बायर्न म्युनिकने सेव्हियाचा २-१ असा पराभव करत यूएफा सुपर चषक फुटबॉल स्पर्धेचे जेतेपद पटकावले.

मोजक्या प्रेक्षकांसह रंगलेल्या या लढतीत बायर्न म्युनिकने अतिरिक्त वेळेत जेतेपद संपादन केले. मार्टिनेझने १०४व्या मिनिटाला गोल करत बायर्नच्या जेतेपदावर मोहोर उमटवली. तब्बल सात वर्षांनंतर बायर्नने सुपर चषकाचे जेतेपद पटकावले.

डेव्हिड अलाबाने मारलेला फटका सेव्हियाचा गोलरक्षक यासिन बोऊनोऊ याने परतवून लावल्यानंतर मार्टिनेझने परतीच्या फटक्यावर गोल लगावला. हाच गोल सामन्यात निर्णायक ठरला.

युरोपा लीग विजेत्या सेव्हियाने सुरुवातीलाच सामन्यात आघाडी घेतली होती. डेव्हिड अलाबाच्या चुकीमुळे १३व्या मिनिटाला सेव्हियाला पेनल्टी-किक मिळाली होती. त्यावर लुकास ओकाम्पोस याने कोणतीही चूक न करता सेव्हियाचे खाते खोलले होते. त्यानंतर ३४व्या मिनिटाला लेऑन गोरेट्झका याच्या गोलच्या बळावर बायर्न म्युनिकने बरोबरी साधली.

◉𝐉𝐨𝐢𝐧 𝐭𝐡𝐞 𝐜𝐡𝐚𝐧𝐧𝐞𝐥 𝐚𝐧𝐝 𝐬𝐮𝐠𝐠𝐞𝐬𝐭 𝐲𝐨𝐮𝐫 𝐟𝐫𝐢𝐞𝐧𝐝𝐬 𝐭𝐨 𝐣𝐨𝐢𝐧 𝐭𝐡𝐞 𝐜𝐡𝐚𝐧𝐧𝐞𝐥 𝐥𝐢𝐧𝐤 ↡↡

https://t.me/LoksattaOnline