बायडेन यांचे भाषण लिहिणाऱ्या रेड्डी यांच्यावर कौतुकाचा वर्षांव

बायडेन यांचे भाषण लिहिणाऱ्या रेड्डी यांच्यावर कौतुकाचा वर्षांव

https://t.me/LoksattaOnline
अमेरिकेचे नवे अध्यक्ष जो बायडेन यांचे पहिलेवहिले भाषण लिहिणारी व्यक्ती भारतीय वंशाची असून त्या व्यक्तीचे नाव विनय रेड्डी असे आहे.

अमेरिकेचे नवे अध्यक्ष जो बायडेन यांचे पहिलेवहिले भाषण लिहिणारी व्यक्ती भारतीय वंशाची असून त्या व्यक्तीचे नाव विनय रेड्डी असे आहे. अमेरिकेतील सध्याच्या आव्हानांच्या काळात लोकशाही, ऐक्य आणि आशा यांचे महत्त्व यांचा समावेश असलेले भाषण लिहिल्याबद्दल रेड्डी यांच्यावर कौतुकाचा वर्षांव होत आहे.

मूळचे तेलंगणचे असलेले रेड्डी यांनी लिहिलेल्या भाषणात बायडेन यांच्या प्रशासनाची उद्दिष्टे सांगितली असून राष्ट्रीय राजकीय स्थितीवर प्रकाश टाकला आहे. त्यामधील प्रेरणादायी शब्दांमुळे त्यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

आपण कोण आहोत हे या क्षणाने कठीण काळातही दर्शविले आहे, आम्ही केवळ स्वप्न पाहात नाही तर ती सत्यात आणतो, आम्ही केवळ काय आहे त्याकडे पाहात राहात नाही तर काय असू शकेल ते पाहतो. आधी आम्ही चंद्रावर झेप घेतली आणि त्यानंतर तेथे ध्वज रोवला, आम्ही निर्भय, महत्त्वाकांक्षी, धाडसी आहोत, आम्ही पुन्हा उभारी घेऊ, ही अमेरिकेची आकांक्षा आहे.

- कमला हॅरिस, अमेरिकेच्या उपाध्यक्ष

◉𝐉𝐨𝐢𝐧 𝐭𝐡𝐞 𝐜𝐡𝐚𝐧𝐧𝐞𝐥 𝐚𝐧𝐝 𝐬𝐮𝐠𝐠𝐞𝐬𝐭 𝐲𝐨𝐮𝐫 𝐟𝐫𝐢𝐞𝐧𝐝𝐬 𝐭𝐨 𝐣𝐨𝐢𝐧 𝐭𝐡𝐞 𝐜𝐡𝐚𝐧𝐧𝐞𝐥 𝐥𝐢𝐧𝐤 ↡↡

https://t.me/LoksattaOnline

Report Page