nmkbeedmarathi

nmkbeedmarathi

Job alerts

Join @nmkbeedmarathi

भारतीय नौसेनेत अविवाहित पुरुष उमेदवारांसाठी १०+२ (बी.टेक्.) कॅडेट एन्ट्री स्कीम (पर्मनंट कमिशन) ४ वर्षे कालावधीचा कोर्स जुलै, २०१८ पासून इंडियन नेव्हल अॅकॅडमी केरळ येथे भरती.

पात्रता – १२वी (विज्ञान) (फिजिक्स/ केमिस्ट्री/मॅथ्स विषयांसह सरासरी ७०% गुण आणि दहावी किंवा १२वीला इंग्रजी विषयात किमान ५०% गुण) जेईई (मेन), २०१७ परीक्षा उत्तीर्ण. (एसएसबी मुलाखतीसाठी जेईई (मेन), २०१७ मधील अखिल भारतीय रँकनुसार बोलाविले जाईल


निवड पद्धती – एसएसबीतील गुणवत्तेनुसार निवडलेल्या उमेदवारांना वैद्यकीय चाचणीनंतर एक्झिक्युटिव्ह / इंजिनीअरिंग / इलेक्ट्रिकल ब्रँचसाठी ४ वर्षे कालावधीच्या अॅप्लाइड इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन / मेकॅनिकल / इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनीअरिंगच्या बी.टेक्. कोर्ससाठी ट्रेिनग दिले जाईल.
ट्रेिनगचा सर्व खर्च भारतीय नौदल करणार आहे. कॅडेट्सना कपडे आणि जेवण मोफत दिले जाईल. कोर्स यशस्वीरीत्या पूर्ण झाल्यावर उमेदवारांना जवाहरलाल नेहरू (जेएनयू) विद्यापीठामार्फत बी.टेक्. डिग्री दिली जाईल आणि सब-लेफ्टनंट पदावर तनात केले जाईल.


ऑनलाइन अर्ज www.joinindiannavy.gov.in  या संकेतस्थळावर दि. ३० नोव्हेंबर, २०१७ पर्यंत करावेत.



Report Page