HI

HI


*विष्णू सखाराम खांडेकर*


*जन्म: ११ जानेवारी १८९८*


*मृत्यू:२ सप्टेंबर १९७६*


#persons


    वि.स.खांडेकर यांचा जन्म महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यात झाला. त्यांचे जन्म नाव गणेश आत्माराम खांडेकर असे होते. त्यांचे वडील सांगली रियासत मध्ये मुन्शी म्हणून कार्यरत होते. त्यांनी शालेय जीवनापासूनच अनेक चित्रपटामध्ये आणि विविध नाटकामध्ये अभिनय करण्याची आवड जोपासली होती.


    १९२० साली वि.स.यांनी कोकणातील सिंधुदुर्ग जिल्यातील शिरोडे या छोट्या गावी शिक्षक म्हणून रुजू झाले. त्या शाळेत त्यांनी १९३८ सालापर्यंत नोकरी केली. शिक्षकी पेशात असताना ते त्यांचा मोकळा वेळ मराठी साहित्य संपादन करण्यात व्यतीत करत. त्यांनी त्यांच्या पूर्ण आयुष्यात जवळपास १६ कादंबऱ्या,६ नाटके,२५० लघुकथा,१०० प्रबंध,५० रूपकात्मक लेख,आणि जवळपास २०० टिकात्मक निबंध लिहले आहेत.


*साहित्य*


वि.स.यांचे प्रमुख लिखित साहित्य: 


• ययाती

• हृदयाची हाक

• उल्का 

• दोन मने

• हिरवा चाफा 

• दोन ध्रुव 

• रिकामा देव्हारा 

• क्रौंचवध 

• पहिले प्रेम 

• अमृत वेल 

• सुखाचा शोध 

• एक पानाची कहाणी 

• रानफुले 


*पुरस्कार आणि सन्मान:*

     


     १) १९४१ सालच्या सोलापूर येथील मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद वि.स.नी भूषवले होते.

     २) त्यांच्या साहित्यातील योगदानाबद्दल १९६८ साली भारत सरकारने त्यांना 'पद्मभूषण' हा किताब देऊन गौरव केला.

     ३) १९७० साली साहित्य अकादमीची साहित्य अकादमी फेलोशिप प्राप्त केली.

     ४) १९७४ साली साहित्यातील सर्वोत्कृष्ट पुरस्कार म्हणून ओळखला जाणारा ज्ञानपीठ पुरस्कार त्यांच्या 'ययाती' या कादंबरीस मिळाला. 

     ५) १९८८ साली शिवाजी विद्यापीठ,कोल्हापूर या विद्यापीठाने त्यांच्या सन्मानार्थ D.Litt (डी.लिट) हि पदवी प्रदान केली.

     ६) नंतरच्या काळात त्यांच्या सन्मानार्थ भारत सरकारने त्यांच्या नावाचे पोस्ट स्टॅम्प जारी केला होता 

     ७) आजही अनेक ग्रंथालयांना,शाळांना त्यांच्या सन्मानार्थ त्यांचे नाव प्रदान केले आहे.



*MPSC चे महत्वाचे pdf, लेख व चालू घडामोडी अपडेट्स यासाठी t.me/specialmpsc हे टेलीग्राम चॅनेल जॉईन करा.*

Report Page