Hhh

Hhh


  मध्यप्रदेशात ग्रामीण संपर्क सुधारण्यासाठी ADB सोबत $110 दशलक्षचा कर्ज करार

प्रधान मंत्री ग्रामीण रस्ते कार्यक्रमाच्या (PMGSY) अंतर्गत मध्यप्रदेश राज्यामधील ग्रामीण संपर्क वाढविण्यासाठी एकूण 2,800 किलोमीटरच्या रस्त्यांच्या सुधारण्यासाठी वित्तपुरवठा करण्यासाठी भारत सरकार आणि आशियाई विकास बँक (ADB) यांच्यामध्ये $110 दशलक्षचा कर्ज करार झाला आहे.

हा करार $500 दशलक्षाच्याद्वितीय ग्रामीण संपर्क गुंतवणूक कार्यक्रमाचा भाग आहे. भारतात आसाम, छत्तीसगड, मध्यप्रदेश, ओडिशा आणि पश्चिम बंगाल या राज्यांमधील सुमारे 12,000 किलोमीटरच्या रस्त्यांचा विकास केला जात आहे.

 ही एक क्षेत्रीय विकास बँक आहे, ज्याची स्थापना 19 डिसेंबर 1966 रोजी आशियाई देशांमधील आर्थिक विकास प्रकल्पांना वित्तपुरवठा करण्यासाठी केली गेली. मंडालुयोंग (फिलीपिन्स) येथे याचे मुख्यालय आहे. “फाइटींग पॉव्हर्टी इन एशिया अँड द पॅसिफिक” हे ADBचे घोषवाक्य आहे. याचे 67 देश सदस्य आहेत.


Report Page