#current

#current

https://t.me/missionmpsc


नागालँड राज्याच्या निर्मितीचा 55वा वर्धापन दिन साजरा करण्याच्या पार्श्वभूमीवर, दि. 1 डिसेंबर 2018 रोजी ‘हॉर्नबिल महोत्सव 2018’ याचे उद्घाटन केले गेले. 1963 साली भारताच्या तत्कालीन राष्ट्रपती डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी नागालँडला भारतीय संघाचा 16वा राज्य म्हणून जाहीर केले होते.

यानिमित्त आयोजित एका कार्यक्रमात केंद्रीय गृह मंत्रालयातर्फे कोहिमा (नागालँड) या शहरात नागालँड राज्यासाठी ‘आणीबाणी प्रतिसाद सहाय्य यंत्रणा’ (Emergency Response Support System -ERSS) कार्यरत करण्यात आली आहे.

ERSS प्रकल्पाच्या अंतर्गत संपूर्ण-भारतभरासाठी तयार करण्यात आलेला '112' हा एकच आणीबाणी क्रमांक कार्यरत करण्यात आले आहे. हिमाचल प्रदेशानंतर नागालँडमध्येही (देशातले दुसरे तर ईशान्य भारतातले पहिले राज्य) आता हा क्रमांक कार्यरत करण्यात आला आहे.

सेवेची वैशिष्ठ्ये -

  • या क्रमांकाला राज्यामधील आपत्कालीन प्रतिसाद केंद्राद्वारे पोलीस (100), अग्निशमन (101), आरोग्य सेवा (108), महिला मदतक्रमांक (1090) आणि इतर मदतक्रमांकांशी जोडले जाणार आहे.
  • या सेवा '112 इंडिया' नावाच्या मोबाईल अॅपमध्ये देखील उपलब्ध करून दिलेल्या आहेत. विशेषकरून महिलांसाठी ‘112 इंडिया’ मोबाइल अॅपमध्ये एक अद्वितीय 'SHOUT' नावाचे एक वैशिष्ट्य आहे, ज्यामुळे परिसरातील नोंदणीकृत स्वयंसेवकांकडून त्वरित मदत मिळू शकेल. हे वैशिष्ट्य केवळ महिलांसाठी उपलब्ध आहे.
  • ‘आणीबाणी प्रतिसाद सहाय्य यंत्रणा (ERSS)’ प्रकल्पाच्या अंतर्गत, संपूर्ण राज्याला सेवा पुरविण्यासाठी कोहिमा, दिमापूर आणि मोकोकचूंग येथे तीन जिल्हा आदेश केंद्रांसह (DCCs) कोहिमा या शहरात एक आणीबाणी प्रतिसाद केंद्र (ERC) स्थापन करण्यात आले आहे.


Report Page