#Current

#Current

https://t.me/missionmpsc


. 1 डिसेंबर 2018 रोजी काठमांडू (नेपाळची राजधानी) या शहरात ‘आशिया प्रशांत शिखर परिषद 2018’ याला सुरुवात करण्यात आली. दोन दिवस चालणार्‍या या परिषदेचीसंकल्पना "अॅड्रेसींग द क्रिटिकल चॅलेंजेस ऑफ अवर टाइम: इंटरडिपेंडन्स, म्यूचुअल प्रोस्पेरिटी, अँड यूनिवर्सल वॅल्यूज" ही आहे.

परिषदेत भारताचे नेतृत्व भारताचे केंद्रीय मंत्री आणि माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांनी केले आहे. त्यांनी आपल्या मुख्य भाषणात जागतिक दहशतवाद आणि हवामानातील बदल अश्या मुख्य आव्हानांबद्दल चिंता व्यक्त केली.

परिषदेत 45 देशांमधून उपस्थित असलेल्या प्रतिनिधींनी शांती, विकास, सुशासन आणि सांसद सदस्यांची भूमिका, हवामानातील बदल आणि प्रसारमाध्यमांची भूमिका यासारख्या विविध जागतिक मुद्द्यांवर चर्चा चालवली.

आशिया विषयी –

आशिया हा पृथ्वीवरील सात भूखंडांपैकी एक आहे. आशिया जगातला सर्वात मोठा व सर्वात अधिक लोकसंख्या असलेला खंड आहे. जगातली 60% लोकसंख्या आशियात राहते. पृथ्वीच्या एकूण क्षेत्रफळापैकी 8.6% भाग आशियाने व्यापला आहे. आशिया खंडाचे 6 विभाग पाडले गेले आहेत, ते आहेत,

  • पूर्व आशिया (8 देश)
  • मध्य आशिया (5 देश)
  • दक्षिण आशिया (9 देश)
  • आग्नेय आशिया (11 देश)
  • नैऋत्य आशिया (मध्यपूर्व) (19 देश)
  • उत्तर आशिया (एकमेव - रशिया)

प्रशांत क्षेत्राविषयी -

प्रशांत महासागर (Pacific Ocean) हा पृथ्वीवरील सर्वात मोठा महासागर आहे. याने व्यापलेल्या प्रदेशाला ‘प्रशांत क्षेत्र’ म्हणून ओळखले जाते. यामध्ये 42 सार्वभौम देश आणि 12 भूभागांचा समावेश आहे.

युरोपच्या शोधकांनी प्रशांत महासागराचा 16व्या शतकात शोध लावला. प्रशांत महासागराने पृथ्वीच्या पृष्ठभागाचा 32% भाग व्यापला आहे व जगातल्या एकूण पाण्याच्या 46% पाणी प्रशांत महासागरामध्ये आहे. 10.911 मीटर इतकी खोली असलेला ‘मेरियाना गर्ता’ हा प्रशांत महासागरातला सर्वात खोल बिंदू आहे. न्यू गिनी हे प्रशांत महासागरामधील सर्वात मोठे बेट आहे.

ओशनिया हा पृथ्वीवरील एक खंड, ज्यामध्ये प्रशांत महासागरात पसरलेली अनेक बेटे आहेत. या खंडात 15 स्वतंत्र देश आणि 16 संस्थाने व प्रांत आहेत. ओशनिया खंडाचे साधारण 4 भाग मानले जातात, ते आहेत –

  • ऑस्ट्रेलेशिया (ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड)
  • मेलनेशिया (6 देश)
  • मायक्रोनेशिया (8 देश)
  • पॉलिनेशिया (13 देश)


Report Page