#current

#current

https://t.me/missionmpsc


दक्षिण आफ्रिका देशाचे राष्ट्रपती सिरिल रामाफोसा हे भारताच्या 70 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित केल्या जाणार्‍या उत्सवांचे मुख्य पाहुणे असणार, असे जाहीर करण्यात आले आहे.

अर्जेंटिनाची राजधानी ब्यूनस आयर्स येथे चाललेल्या ‘जी-20 शिखर परिषद 2018’च्या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपती रामाफोसा यांना मुख्य पाहुणे बनण्यासाठी आमंत्रण दिले आणि ते त्यांनी स्वीकारले.

माटामेला सिरिल रामाफोसा हे दक्षिण आफ्रिकेचे पाचवे राष्ट्रपती आहेत. जेकब झुमा यांनी दि. 15 फेब्रुवारी 2018 रोजी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर रामाफोसा राष्ट्रपती झाले.

भारताच्या प्रजासत्ताक दिनाविषयी -

भारतीय प्रजासत्ताक दिन हा भारताच्या प्रजासत्ताकात दरवर्षी 26 जानेवारीला पाळला जाणारा राष्ट्रीय दिन आहे. जवाहरलाल नेहरूंनी दि. 26 जानेवारी 1930 रोजी लाहोर अधिवेशनात तिरंगा फडकावून पूर्ण स्वराज्याची घोषणा केली होती. त्याची आठवण म्हणून 26 जानेवारी हा दिवस राज्यघटना अंमलात आणण्यासाठी निवडण्यात आला.

दि. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला ब्रिटीश राजवटीपासून स्वातंत्र्य मिळाले. स्वतंत्र भारताला स्वत:चे संविधान नव्हते. भारताचे कायदे हे भारतीय राज्यशासनाच्या 1935 सालच्या कायद्यावर आधारित होते. त्यामुळे दि. 29 ऑगस्ट 1947 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली भारताच्या संविधानाच्या निर्मितीसाठी मसुदा समिती स्थापन झाली आणि अंतिम मसुदा दि. 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान समितीने स्वीकारला. या संविधानाचे राष्ट्रार्पण दि. 26 जानेवारी 1950 रोजी करण्यात आले आणि त्यानिमित्ताने भारताचा पहिला प्रजासत्ताक दिन साजरा केला गेला. त्यावेळी इंडोनेशियाचे तत्कालीन राष्ट्रपती सुकर्णो हे मुख्य पाहुणे म्हणून उपस्थित होते.

प्रजासत्ताक दिन भारतातल्या तीन राष्ट्रीय सुट्ट्यांपैकी एक आहे. इतर दोन राष्ट्रीय सुट्ट्या आहेत - स्वातंत्र्य दिवस (15 ऑगस्ट) व गांधी जयंती (2 ऑक्टोबर).


Report Page