#Current

#Current

https://t.me/missionmpsc

झारखंडमधील वीज प्रणाली सुधारण्यासाठी जागतिक बँकेकडून $310 दशलक्षची मदत

  • झारखंड वीज व्यवस्था सुधारणा प्रकल्पासाठीभारत सरकारचा जागतिक बँकेशी $ 310 दशलक्ष इतक्या रकमेचा एक कर्ज करार झाला आहे.
  • झारखंड राज्यामधील नागरिकांना विश्वसनीय, दर्जेदार आणि परवडणारी चोवीस तास वीज पुरवण्यासाठी हा प्रकल्प राबवला जाणार आहे. या मदतीने वीजेसंबंधी पायाभूत सुविधा तसेच अन्य घटकांच्या विकासास सहाय्य प्राप्त झाले आहे. हा प्रकल्प 2014 साली सुरू करण्यात आलेल्या भारत सरकारच्या ‘सर्वांसाठी वीज’ कार्यक्रमाचा एक भाग आहे.
  • झारखंड राज्यात ताज्या आकडेवारीनुसार सर्व नागरिकांमध्ये 80% हून अधिक नागरिकांना वीज उपलब्ध करून देण्यात आली आहे. आता सर्वांना चोवीस तास अखंड पुरवठा देण्याच्या उद्देशाने प्रयत्न चालवले जात आहेत.
  • जागतिक बँक (WB) ही भांडवल पुरविण्यासाठी विकसनशील देशांना कर्ज देणारी एक आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्था आहे. जागतिक बँक हा संयुक्त राष्ट्रसंघ प्रणालीचा एक भाग आहे. अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन, डी.सी. येथे जागतिक बँकेचे मुख्यालय आहे. यामध्ये आंतरराष्ट्रीय पुनर्रचना आणि विकास बँक (International Bank for Reconstruction and Development- IBRD) आणि आंतरराष्ट्रीय विकास महामंडळ (International Development Association -IDA), अश्या दोन संस्थांचा समावेश आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) आणि तीन इतर संस्थांसह जागतिक बँकेची स्थापना 1944 सालच्या ब्रेटोन वूड्स परिषदेत करण्यात आली.


Report Page