#Current

#Current

https://t.me/missionmpsc


‘झिका’ आजारावर स्वदेशी लस विकसित केली

  • हैदराबाद येथील भारत बायोटेक कंपनीने ‘झिका’आजाराची लस विकसित केली आहे.
  • या लसीमुळे झिका विषाणूच्या आशियाई आणि आफ्रिकी या दोन्ही प्रकारांपासून होणाऱ्या संसर्गापासून संरक्षण होण्यास मदत मिळणार.
  • झिका विषाणूवरील देशी लसीच्या चाचण्या भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (ICMR) तर्फे लवकरच केल्या जातील. मध्यप्रदेश, राजस्थान आणि गुजरातमध्ये या विषाणूने बाधित झालेल्या व्यक्ती आढळल्या आहेत. या लसीची मानवी वापरासाठीची सुरक्षितता, तिची परिणामकारकता आणि दुष्परिणाम तपासण्यासाठी या दुसऱ्या टप्प्यातील चाचण्या केल्या जातील.
  • झिका विषाणूचा वाहक असलेल्या एडिस प्रजातीच्या डासापासून मुख्यत्वे झिकाचा प्रसार होतो.
  • झिका विषाणूची लागण झाल्यानंतर ताप, त्वचेवर पुरळ येणे, स्नायू आणि सांधेदुखी, डोळे लाल होणे आदी लक्षणे दिसून येतात.


Report Page