#Current

#Current

https://t.me/missionmpsc


जागतिक शौचालय दिन: 19 नोव्हेंबर

  • दरवर्षी 19 नोव्हेंबर या दिवशी जागतिक शौचालय संघटनेच्या (World Toilet Organization-WTO) नेतृत्वात जगभरात ‘जागतिक शौचालय दिन’ पाळला जातो. यावर्षी हा दिन ‘व्हेन नेचर कॉल्स’ या संकल्पनेखाली पाळला गेला.
  • दिनांक 19 नोव्हेंबर 2001 रोजी स्थापना करण्यात आलेल्या जागतिक शौचालय संघटनेचा स्थापना दिन ‘जागतिक शौचालय दिन’ म्हणून पाळण्याचा निर्णय घेण्यात आला.
  • 145 देशांमध्ये केल्या गेलेल्या अभ्यासात असे आढळून आले आहे की, 58% अतिसार अस्वच्छतेमुळे होते. अतिसार या आजारामुळे 2015 साली पाच वर्षाखालील कमी वयाच्या 5,26,000+ बालकांचा मृत्यू झाला. यावर उपाय म्हणून शौचालयाला प्रोत्साहन दिले जात आहे. संघटनेने शौचालयांची असुविधा, त्यापासुन होणारे आजार आणि मानवी जीवनाचा अविभाज्य भाग असणार्‍या शौचालयाची समस्या संयुक्त राष्ट्रसंघापुढे मांडली. संयुक्त राष्ट्रसंघाने निश्चित केलेल्या 2030 शाश्वत विकास लक्ष्य 6 (SDG-6) अंतर्गत, 2013 साली शौचालयाला मानवाची महत्त्वाची गरज म्हणून तांत्रिक आणि कायदेशीर मान्यता दिली.
  • जागतिक शौचालय संघटना (World Toilet Organization-WTO) ही एक आंतरराष्ट्रीय ना-नफा संस्था आहे.
  • ही जगभरात स्वच्छता आणि शौचालय संदर्भात परिस्थितीत सुधारणेसाठी जबाबदार आहे.
  • जॅक सिम यांनी WTO ची स्थापना दिनांक 19 नोव्हेंबर 2001 रोजी 15 सदस्य देशांसमवेत केली, जी आता 151 पर्यंत पोहचलेली आहे. संघटना जागतिक शौचालय परिषदेची आयोजक आहे.
  • 2014 साली 18-20 नोव्हेंबर या काळात जगातला पहिला आंतरराष्ट्रीय शौचालय महोत्सव दिल्लीत आयोजित केला गेला होता


Report Page