#Current

#Current

https://t.me/missionmpsc

# न्या. अमरेश्वर प्रताप साही: पटना उच्च न्यायालयाचे नवे मुख्य न्यायाधीश

  • न्यायमूर्ती अमरेश्वर प्रताप साही यांनी पटना उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश पदाची शपथ घेतली आहे.
  • बिहारचे राज्यपाल लालजी टंडन यांनी न्या. साही यांना शपथ दिली. या नियुक्तीपूर्वी न्या. साही इलाहाबाद उच्च न्यायालयात न्यायाधीश होते.
  • भारताच्या राज्यघटनेत नमूद कलम क्र. 214 अन्वये प्रत्येक घटकराज्याला एक उच्च न्यायालय असेल किंवा एक किंवा दोन राज्यांसाठी मिळून एक उच्च न्यायालय असेल अशी तरतूद करण्यात आलेली आहे.
  • सध्या देशात 24 उच्च न्यायालये कार्यरत आहेत. याशिवाय प्रत्येक राज्यामध्ये विभागीय पातळीवर खंडपीठे निर्माण करण्यात आली आहेत.
  • महाराष्ट्रचे उच्च न्यायालय मुंबई येथे असून त्याची महाराष्ट्रात पणजी (गोवा), नागपूर, औरंगाबाद अश्या तीन ठिकाणी तीन खंडपीठे आहेत.
  • उच्च न्यायालयात एक मुख्य न्यायाधीश आणि राष्ट्रपतीच्या आदेशानुसार ठरविण्यात आलेले संख्येनुसार इतर न्यायाधिश असतात.
  • उच्च न्यायालयातल्या सर्वोच्च न्यायाधिशांची नेमणूक करण्याचा अधिकार भारताच्या राष्ट्रपतीला आहे.



Report Page