Current

Current

@MissionMPSC


गुजरातमध्ये ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’चे राष्ट्रार्पण

  • गुजरातमध्ये नर्मदा नदीच्या तीरी उभारण्यात आलेला भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा राष्ट्राला अर्पण करण्यात आला आहे. हाजगातला सर्वात उंच (182 मीटर / 597 फूट) पुतळाठरला आहे.
  • गुजरातच्या नवागाम गावाजवळ असलेल्या सरदार सरोवर नर्मदा धरण येथे उभारण्यात आलेल्या या पुतळ्याला ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ असे संबोधले जात आहे. याच्या जवळच 17 किलोमीटरच्या परिसरात ‘फुलांची घाटी’ (Valley of Flowers) तयार केली जात आहे.
  • नर्मदा नदी - मध्यप्रदेश राज्यात वसलेले अमरकंटक हे नर्मदा नदीचे उगमस्थान आहे. समुद्रसपाटीपासून 1057 मीटर उंचीवर मैकल पर्वतरांगांमध्ये या नदीचा उगम होतो. नर्मदा नदी मुख्यतः मध्य भारतामध्ये वाहते. तिच्या पात्राची एकूण लांबी सुमारे 1,289 किलोमीटर एवढी आहे. नदी पूर्वेकडून वाहत पश्चिम दिशेकडे अरबी समुद्राला मिळते. ती 'भरोंच' नावाच्या ठिकाणी महासागरात विलीन होते. ती भारतातली पश्चिमेकडे वाहणारी सर्वात मोठी नदी आहे.


Report Page