Current

Current

#SWAS, SAFAL आणि STAR: CSIRद्वारा विकसित कमी प्रदूषण फैलावणारे फटाके




SWAS, SAFAL आणि STAR: CSIRद्वारा विकसित कमी प्रदूषण फैलावणारे फटाके

विज्ञान व उद्योग संशोधन परिषद (CSIR) येथील शास्त्रज्ञांनी कमी प्रदूषण फैलावणारे फटाके विकसित केले आहेत. ते म्हणजे –

  • सेफ वॉटर रिलीझर (SWAS)
  • सेफ मिनीमल अॅल्युमिनियम (SAFAL)
  • सेफ थर्माईट क्रॅकर (STAR)
  • याशिवाय, CSIR-CEERI ने इलेक्ट्रॉनिक क्रॅकर (ई-क्रॅकर) विकसित केले आहे. हे फटाके प्रकाश/ध्वनी याचा प्रभाव उत्पन्न करण्यासाठी उच्च-व्होल्टेज इलेक्ट्रोस्टॅटिक डिस्चार्जच्या तंत्रज्ञानावर आधारित आहे, जे इलेक्ट्रिक स्पार्क उत्पन्न करतात. ई-लडी, ई-अनार, ई-क्रॅकरसाठी तंत्र इत्यादी विविध उत्पादनांना विकसित केले आहे.
  • पोस्ट कम्बशन कंट्रोल सिस्टम आणि डिव्हाइस - CSIR-NEERI ने स्थानिक धूळ नियंत्रणासाठी फोटोचिप सामग्री म्हणून PURE-WAYU ही नवीन यंत्रणा विकसित केली आहे.
  • रिड्युस्ड एमिशन क्रॅकर - CSIR-CECRI (कराईकुडी) ने कमी उत्सर्जन होणारे फटाके विकसित केले.
  • बिजली क्रॅकर - CSIR-NEERI ने प्रदूषके-विरहित फटाके विकसित केले.

नवे फटाके केवळ पर्यावरणाला अनुकूल आहेत. शिवाय परंपरागत फटाक्यांपेक्षा 15-20% स्वस्त आहेत. हे फटाके पाण्याचे बाष्प आणि/किंवा कमी धूर आणि कमी वायू उत्सर्जित करणारे आहेत. फटाक्यांमध्ये वापरली जाणारी पोटॅशियम नायट्रेट आणि सल्फर ही प्रदूषके नव्या फटाक्यांमध्ये वापरली गेली नाहीत.


Report Page