#current

#current

@MissionMPSC

आंतरराष्ट्रीय आपत्ती निवारण दिन: 13 ऑक्टोबर

  • दरवर्षीप्रमाणे दिनांक 13 ऑक्टोबर 2018 रोजी ‘रिड्युसींग डिझास्टर इकनॉमिक लॉसेस’ या विषयाखाली ‘आंतरराष्ट्रीय आपत्ती निवारण दिन’ पाळण्यात आला आहे.
  • यावर्षीचा विषय आपत्ती जोखीम निवारणासंबंधी सेंदाई आकृतिबंध (Sendai Framework on Disaster Risk Reduction -SFDRR) याच्या सात लक्ष्यांवर केंद्रित 2016 साली सुरू केलेल्या "सेंदाई सेव्हन" नावाच्या मोहिमेचा भाग म्हणून राखण्यात आला आहे. या वर्षी सेंदाई आकृतिबंधच्या ‘लक्ष्य – C’ यावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे, जे 2030 सालापर्यंत जागतिक GDPशी संबंधित आहे.
  • आंतरराष्ट्रीय आपत्ती निवारण दिन (किंवा आंतरराष्ट्रीय आपत्ती परिसीमन दिन / International Day for Disaster Reduction) पहिल्यांदा 1989 साली पळाला गेला. सुरूवातीला हा दिवस प्रत्येक ऑक्टोबर महिन्याच्या दुसर्‍या बुधवारी पाळला जात होता. त्यानंतर संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासभेने या दिनासाठी 2009 सालापासून 13 ऑक्टोबर ही तारीख निश्चित केली.
  • सन 2005 मध्ये संयुक्त राष्ट्रसंघाच्या माध्यमातून 'ह्योगो कृती आकृतिबंध' (Hyogo Framework for Action) ठरविण्यात आला. भारतात सन 2005 साली स्थापन करण्यात आलेल्या 'राष्ट्रीय आपत्ती निवारण प्राधिकरण' (NDMA) याने आपत्ती निवारणाबाबत अनेक मार्गदर्शक सूत्रे ठरवून दिली आहेत.


Report Page