#current

#current

@Missionmpsc


MissionMPSC

भारत सरकारचे ‘राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक धोरण 2018’

  • भारत सरकारच्या केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने ‘राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक धोरण 2018’ (NPE 2018) याचा मसुदा प्रसिद्ध केला आहे. 2012 साली आखलेल्या राष्ट्रीय धोरणाच्या जागी नवे धोरण आणले जाणार आहे.
  • धोरणाची उद्दिष्टे -2025 सालापर्यंत $400 दशलक्ष एवढ्या रकमेची उलाढाल हे लक्ष्य साध्य करण्यासाठी आर्थिक विकासासाठी इलेक्ट्रॉनिक्स यंत्रणा संरचना आणि उत्पादन (ESDM) क्षेत्राच्या संपूर्ण मूल्य-साखळीत देशांतर्गत उत्पादनास प्रोत्साहन देणे.
  • इलेक्ट्रॉनिक्स यंत्रणा संरचना आणि उत्पादन (ESDM) क्षेत्रात उद्योगासाठी व्यवसाय सुलभ करणे.
  • इलेक्ट्रॉनिक्सच्या सर्व उप-क्षेत्रांमध्ये उद्योगांमार्फत संशोधन व विकास तसेच अभिनवतेला प्रोत्साहन देणे.
  • उदयोन्मुख तंत्रज्ञानाच्या क्षेत्रामध्ये एक व्यापक स्टार्ट-अपसाठी वातावरणाला समर्थन देणे आणि वास्तविकतेत जीवनातील प्रश्न सोडवण्यासह संरक्षण, कृषी, आरोग्य, स्मार्ट शहरे आणि ऑटोमेशन यासारख्या क्षेत्रात तंत्रज्ञानाच्या अनुप्रयोगांना समर्थन देणे.
  • इलेक्ट्रॉनिक्स यंत्रणा संरचना आणि उत्पादन (ESDM) क्षेत्रात कुशल मनुष्यबळाची उपलब्धता वाढविण्यासाठी समर्थन देणे.
  • इलेक्ट्रॉनिक्स यंत्रणा संरचना आणि उत्पादन (ESDM) क्षेत्रात निर्यात वाढविण्यासाठी समर्थन देणे.
  • देशात देशातच संरचित मायक्रोचिपचे उत्पादन देण्यास तसेच त्यांचा धोरणात्मक आणि महत्त्वपूर्ण आधारभूत संरचना क्षेत्रांमध्ये वापर करण्यास प्रोत्साहन देणे.
  • पर्यावरणाला अनुकूल अश्या पद्धतीने ई-कचर्‍याची सुरक्षितपणे विल्हेवाट, ई-कचर्‍याचे पुनरुत्पादन घेणारे उद्योग आणि ई-कचर्‍याचे व्यवस्थापन करण्यासाठी सर्वोत्तम पद्धतींचा विकास करण्यासाठी उद्योगांना संशोधन, अभिनवतेला प्रोत्साहन आणि समर्थन देणे


Report Page