Current

Current

Amol Jadhav Patil

बजरंग पुनिया, दीपा मलिक यांना 'खेल रत्न', तर रवींद्र जडेजाला अर्जुन पुरस्कार


आशियाई व राष्ट्रकुल स्पर्धेतील सुवर्णपदक विजेता कुस्तीपटू बजरंग पुनिया आणि पॅरा अॅथलिट दीपा मलिक यांना यंदाचा राजीव गांधी खेल रत्न पुरस्कार जाहीर झाला आहे.


नवी दिल्ली : आशियाई व राष्ट्रकुल स्पर्धेतील सुवर्णपदक विजेता कुस्तीपटू बजरंग पुनिया आणि पॅरा अॅथलिट दीपा मलिक यांना यंदाचा राजीव गांधी खेल रत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यांच्यासह क्रिकेटपटू रवींद्र जडेजा आणि पूनम यादव यांना अर्जुन पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. निवड समितीनं दोन दिवसांच्या बैठकीनंतर हा निर्णय जाहीर केला. 


बजरंगला 2015 मध्ये अर्जुन पुरस्कार आणि 2019मध्ये पद्म श्री पुरस्काराने सन्मानित केले होते. कुस्ती महासंघाने या पुरस्कारासाठी विनेश फोगाटच्या नावाची शिफारस केली आहे. नुकत्याच पार पडलेल्या त्बिलिसी ग्रां प्रि स्पर्धेत त्यानं इराणच्या पेइमन बिब्यानीला ( 65 किलो ) पराभूत करून सुवर्णपदक जिंकले होते. तत्पूर्वी त्यानं जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत रौप्यपदक जिंकून जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानही पटकावले होते. बजरंगच्या नावावर राष्ट्रकुल स्पर्धेतील दोन पदकं आहेत. त्यानं 2014च्या राष्ट्रकुल स्पर्धेत रौप्यपदक जिंकले होते, तर गतवर्षी सुवर्णपदक पटकावले.  


पॅरा गोळाफेक व भालाफेकपटू दीपा मलिकने 2016च्या पॅरालिम्पिक स्पर्धेत रौप्यपदक जिंकले होते. शिवाय आशियाई पॅरा स्पर्धेत दीपाच्या नावावर तीन कांस्य व एक रौप्यपदक आहे.


पुरस्कार विजेते


राजीव गांधी खेल रत्न - बजरंग पुनिया ( कुस्ती) व दीपा मलिक ( पॅरा अॅथलिट)


द्रोणाचार्य पुरस्कार - विमल कुमार ( बॅडमिंटन), संदीप गुप्ता ( टेबल टेनिस), मोहिंदर सिंग ढिल्लोन ( अॅथलिट)


जीवनगौरव पुरस्कार - मेर्झबान पटेल ( हॉकी), रंबीर सिंग खोक्कर ( कबड्डी), संजय भरद्वाज ( क्रिकेट)


अर्जुन पुरस्कार - तजिंदरपाल सिंग तूर ( अॅथलिट), मोहम्मद अनास याहीया ( अॅथलिट), एस भास्करन ( बॉडीबिल्डींग), सोनिया लाथेर ( बॉक्सिंग), रवींद्र जडेजा ( क्रिकेट), चिंग्लेनसाना सिंग कंगुजान ( हॉकी), अजय ठाकूर ( कबड्डी), गौरव सिंग गिल ( मोटर स्पोर्ट्स), प्रमोद भगत ( पॅरा स्पोर्ट्स बॅडमिंटन), अंजुम मुदगील ( शूटींग), हरमित राजुल देसाई ( टेबल टेनिस), पूजा धांडा ( कुस्ती), फॉदा मिर्झा ( इक्वेस्टेरियन), गुरप्रीत सिंग संधू ( फुटबॉल), पूनम यादव ( क्रिकेट), स्वप्ना बर्मन ( अॅथलिट), सुंदर सिंग गुर्जर ( पॅरा अॅथलिट), बी साई प्रणित ( बॅडमिंटन), सिमरन सिंग शेरगिल ( पोलो)


ध्यानचंद पुरस्कार - मॅन्युएल फ्रेडीक्स ( हॉकी), अरुप बसाक ( टेबल टेनिस), मनोज कुमार ( कुस्ती), नितीन किर्तने ( टेनिस), सी. लाल्रेमसंगा ( तिरंदाजी) 

Report Page