#Current

#Current

Telegram.me/mpscquiz


Q). नुकत्याच गोव्यातील ब्रिक्स परिषदेसाठी निमंत्रित करण्यात आलेल्या दक्षिण आणि पूर्व या आशियाई खंडाना एकत्र आणणारी पुढीलपैकी कोणती संघटना आहे ?


a) सार्क 


b) जी-७ 


c) बिमस्टेक


d) एशिया पॅसिफिक 


Answer) Description:


बिमस्टेक म्हणजेच द बे ऑफ बंगाल इनिशिएटिव्ह फॉर मल्टी सेक्टरल टेक्निकल अॅोन्ड इकॉनॉमिक कॉर्पोरेशन या सात राष्ट्रांच्या संघटनामध्ये भारत, नेपाळ, भूतान, बांगलादेश, म्यानमार, थायलंड श्रीलंका या देशांचा समावेश आहे. दक्षिण आणि पूर्व या आशियाई खंडाना एकत्र आणणारी ही संघटना आहे . या संघटनेच्या सर्व सदस्य देशांच्या राष्ट्रप्रमुखांना गोव्यातील ब्रिक्स परीषदेसाठी निमत्रीत करण्यात आले होते. 


🔹BIMSTEC ने साजरा केला 20 वा वर्धापन दिन


6 जून 2017 रोजी बहुक्षेत्रिय तांत्रिक आणि आर्थिक सहकार्यासाठी बंगालची खाडी उपक्रम (Bay of Bengal Initiative for Multi-Sectoral Technical and Economic Cooperation - BIMSTEC) याच्या 20 व्या वर्धापन दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुभेच्छा दिल्या.

BIMSTEC आणि त्याची कार्ये

BIMSTEC हा प्रादेशिक सहकार्याच्या दृष्टीने एक नैसर्गिक व्यासपीठ आहे. या प्रादेशिक गटाचे बंगालच्या खाडीलगत असलेली सात राष्ट्रे सदस्य आहेत. BIMSTEC चे अध्यक्षपद (इंग्रजी) आद्याक्षरानुसार सदस्य राष्ट्रांकडे दिले जाते. 4 मार्च 2014 रोजी नेपाळने औपचारिकपणे (वर्तमान) अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली.


BIMSTEC मध्ये दक्षिण आशियातून भारत, नेपाळ, बांग्लादेश, भूटान आणि श्रीलंका या 5 देशांचा आणि दक्षिणपूर्व आशियातून म्यानमार आणि थायलंड या दोन देशांचा समावेश आहे. याचे मुख्यालय ढाका, बांग्लादेश येथे आहे.


हा प्रादेशिक गट दक्षिण आशियातील आणि दक्षिण-पूर्व देशांना जोडतो. या गटाने SAARC आणि ASEAN देशांमध्ये आंतर-क्षेत्रीय सहकार्यासाठी एक व्यासपीठ देखील तयार केले आहे.


▪️BIMSTEC मध्ये भारत


भारताने वर्ष 2000 आणि वर्ष 2006-2009 दरम्यान BIMSTEC चे अध्यक्षपद सांभाळले. भारत मुख्यताः पुढील गटांमध्ये नेतृत्वपूर्ण भूमिका निभावत आहे - वाहतूक व दळणवळण, पर्यटन, पर्यावरण व आपत्ती व्यवस्थापन, दहशतवाद विरोधी व आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी.


▪️BIMSTEC ची पार्श्वभूमी


BIMSTEC हा प्रादेशिक गट 6 जून 1997 रोजी बँकॉक घोषणापत्राद्वारे स्थापन करण्यात आला. याअंतर्गत असलेल्या संपूर्ण क्षेत्रात 1.5 अब्ज लोक वास्तव्यास आहेत, जे की एकूण जागतिक लोकसंख्येच्या 22% इतके आहे. या देशांची एकत्रित सकल स्थानिक उत्पादन (GDP) USD2.7 लाख कोटी इतके आहे.


1997 साली व्यापार, तंत्रज्ञान, ऊर्जा, वाहतूक, पर्यटन आणि मत्स्यव्यवसाय या सहा क्षेत्रांसह या गटाच्या कार्याला सुरुवात झाली. 2008 साली यामध्ये आणखी 9 क्षेत्रांचा समावेश केला, ज्यामध्ये कृषि, सार्वजनिक आरोग्य, गरीबी निर्मूलन, दहशतवाद विरोधी, पर्यावरण, संस्कृती, लोक संपर्क आणि हवामानातील बदल यांचा समावेश आहे.

Join 👉 @MPSCquiz

Report Page