current

current

@mpsc_jeet telegram channel

परिषद:- #parished | #current_affairs 

----------------------------------------------


• हिंद महासागर परिषद’

मालदीव देशाची राजधानी माले या शहरात 3 आणि 4 सप्टेंबर 2019 रोजी ‘हिंद महासागर परिषद 2019’ पार पडली. या वर्षी या परीषदेची "हिंद महासागर प्रदेश सुरक्षित करणे: पारंपारिक आणि पारंपारिक आव्हाने" ही थीम होती. मालदीव सरकार आणि सिंगापूरचे एस. राजरत्नम स्कूल ऑफ इंटरनॅशनल स्टडीज यांच्या संयुक्त विद्यमाने इंडिया फाउंडेशनतर्फे या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.या परिषदेत भारताचे प्रतीनिधीत्व परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी केले. तिसरे हिंद महासागर परिषद व्हियेतनाम येथे २७- २८ ऑगस्ट २०१८ रोजी आयोजित केले होते या परिषदेत भारताच्या माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज्य यांनी भाग घेतला होता तर दुसरी परिषद श्रीलंकेचे राजधानी कोलंबो येथे २०१७ मध्ये पार पडले होते. तर पहिली परिषद २०१६ मध्ये सिंगापूर येथे झाले होते.


• पहिली जागतिक युवा परिषद:-

स्थळ :- दिल्ली

दिनांक:- 23 ऑगस्ट 2019

उद्‌घाटक:- राष्ट्रपती राम नाथ कोविंद

आयोजक:- युनेस्को महात्मा गांधी शांतता आणि शाश्वत विकास संस्था आणि मनुष्यबळ विकास मंत्रालय

थीम:- द्या

उद्दिष्ट :-स्वत:मध्ये परिवर्तन घडवण्यासाठी तसेच समाजात सदैव शांतता नांदावी यासाठी युवकांना प्रेरणा मिळावी आणि त्यांच्या मनात दया, करूणा बिंबवावी हे या परिषदेचे उद्दिष्ट आहे.


• 7 वे कम्युनिटी रेडिओ संमेलन:-

स्थळ:- दिल्ली

दिनांक :-27 ते 29 ऑगस्ट २०१९

संकल्पना ;- शाश्वत विकास उद्दिष्टांसाठी कम्युनिटी रेडिओ

उद्‌घाटक:- अमित खरे(माहिती आणि प्रसारण सचिव )

आयोजन:- माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने या संमेलनाचे आयोजन केले असून, देशभरातली सर्व कम्युनिटी रेडिओ यात सहभागी

संमेलनाची या वर्षीची संकल्पना शाश्वत विकास उद्दिष्टांसाठी कम्युनिटी रेडिओ अशी आहे


• शांघाय सहयोग संघटनेच्या सदस्य राष्ट्रांचे लष्करी वैद्यकिय चिकित्सा संमेलन :

12 व 13 सप्टेंबर 2019 रोजी शांघाय सहयोग संघटनेच्या सदस्य राष्ट्रांनी प्रथमच सैन्य चिकित्सा संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.सन 2017 मध्ये शांघाय सहयोग संघटनेचे सदस्यत्व मिळाल्यानंतर भारताने प्रथमच सैन्य सहकार्य कार्यक्रमात सहभाग घेतला आहे. या संमेलनाचे आयोजन भारतीय लष्करातर्फे मुख्यालय एकात्मिक संरक्षण आस्थापना च्या कार्यप्रणालीनुसार करण्यात आले आहे. संमेलनाचा उद्देश लष्करी चिकित्सा क्षेत्रात सर्वेात्तम कार्यप्रणाली निर्माण करणे, क्षमतांमध्ये वाढ करणे आणि निर्माण होणाऱ्या समस्यांवर उपाययोजना शोधने हा आहे. SCO सदस्य राष्ट्रांमध्ये चिकित्सा विशेषज्ञांमध्ये युध्दकाळात चिकित्सा सुविधा उपलब्ध करुन देणे आणि रुग्णांना सुरक्षा प्रदान करण्याबाबतच्या उपायांबाबत विचार विनिमय करण्यासाठी सदस्य देशांमधील वरिष्ठ सैन्य चिकित्सकांनीही या संमेलनात भाग घेतला. या संमेलनात संवाद भागीदार असलेल्या नेपाळ आणि श्रीलंका यांनीही आपले प्रतिनिधीमंडळ पाठविले होते.भारतात सशस्त्र सेना वैद्यकिय सेवा महासंचनालय (Directorate General Armed Forces Medicle Services) ही या क्षेत्रातील सर्वेाच्च संघटना असून ती लष्कर, नौसेना व हवाई दलातील वैद्यकिय सेवांचे समन्वय करते. ही संस्था संरक्षण मंत्रालयाच्या नियंत्रणाखाली काम करते. संस्थेचे महासंचालक पद लेफ्टनंट जनरल अथवा नौसेना किवा हवाई दलातील समकक्ष अधिकारी यांना देण्यात येते. संमेलनात जैव आतंकवादाच्या धोक्याचा सामाना करण्यासाठी विकसीत कराव्या लागणाऱ्या क्षमतांचे महत्वही अधोरेखीत करण्यात आले. प्रादेशिक आतंकवाद विरोधी संरचना हे शांघाय सहकार्य संघटनेचे महत्वाचे लक्ष्य आहे. ज्याद्वारे आतंकवाद, अलगाववाद आणि उग्रवाद यांच्याविरोधात सदस्य राष्ट्रांमध्ये सहकार्य वाढविण्यासाठी कार्य करते. संघटनेचे मुख्यालय उजबेकिस्तान मध्ये ताश्कंद येथे आहे.


• १२ वी भारतीय सुरक्षा परिषद:-

दिनांक:- ८ ऑगस्ट २०१९

स्थळ:- दिल्ली

थीम:- नवीन राष्ट्रीय सायबर सुरक्षा धोरणाकडे

परिषदेत राष्ट्रीय पायाभूत सुविधांची सुरक्षा, सायबर धोके: घटना, आव्हाने आणि प्रतिसाद या सारख्या अनेक विषयांवर चर्चा झाली. केंद्रीय गृह मंत्रालयाने देशात समन्वित आणि प्रभावी पद्धतीने सायबर गुन्ह्यांचा सामना करण्यासाठी 'इंडियन सायबर क्राइम कोऑर्डिनेशन सेंटर' (आय 4 सी) योजना सुरू केली आहे. याच बरोबर 'सायबर स्वच्छता केंद्र' देखील सुरू करण्यात आले आहे.

Report Page