#Current

#Current


'कोरोना' विषाणूचे नवे नाव : कोविड-१९ (COVID-19) 


  • दि. ११ फेब्रुवारी २०२० रोजी जागतिक आरोग्य संघटनेने (WHO : World Health Organization) 'कोरोना विषाणू'च्या (Corona Virus) नव्या नावाची घोषणा केली.
  • जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस एधानोम गेब्रेयेसुसने (Tedros Adhanom Ghebreyesus) यांनी एका पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. 'कोरोना' विषाणूला 'कोविड-१९' (COVID-19) हे अधिकृत नाव देण्यात आले.
  • COVID-19 : Corona Virus Disease 2019 ( CO - Corona, VI- Virus, D - Disease)
  • हा विषाणू ३१ डिसेंबर २०१९ रोजी पहिल्यांदा चीनमध्ये आढळला होता.
  • तेव्हापासून चीनमध्ये ११०० हून अधिक जणांचा मृत्यू, तर ४२ हजारहून अधिक जणांना कोरोनाची लागण 
  • आतापर्यंत जगातील जवळपास ४० देशांमध्ये या आजाराचा प्रसार
  • यामुळे, जागतिक आरोग्य संघटनेने 'जागतिक आरोग्य आणीबाणी जाहीर' केली आहे
  • या विषाणूची निर्मिती सर्वप्रथम वटवाघूळांच्या माध्यमातून आणि त्यानंतर साप व इतर प्राण्यांद्वारे माणसाला लागण झाली असावी, अशी शक्यता वैद्यकीय संशोधकांनी वर्तवली आहे.
  • भारतात आतापर्यंत कोरोनाचे तीन रुग्ण केरळमध्ये आढळले आहेत. मात्र, चीनच्या वुहानमधून मायदेशी आणण्यात आलेल्या ६४० पैकी एकालाही संसर्ग नाही.

● नवे नाव कशासाठी देण्यात आले?


  • जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख संचालक टेड्रोस एधानोम गेब्रेयेसुस (Tedros Adhanom Ghebreyesus) व मुख्य वैज्ञानिक सौम्या स्वामिनाथन (Dr. Soumya Swaminathan) यांनी पत्रकार परिषदेत कोरोना विषाणूला नवे नाव का देण्यात आले, याची उल्लेखनीय कारणे सांगितली आहेत.

१) विषाणू व संबंधित रोगाला एक अधिकृत नावे असले, की चुकीच्या नावांचा वापर व त्यानिमित्ताने एका विशिष्ट समूहाला कलंकित करण्याच्या (Stigmatize) वृत्तीला रोखता येते

२) तसेच, यामुळे भविष्यात उद्भवणाऱ्या कोरोना विषाणूंचा प्रकारणांच्यावेळी एक मानक स्वरूप (Standard Format) उपलब्ध असेल.

३) एखाद्या जागतिक रोगावरून एखाद्या देशाला किंवा विशिष्ट समूहाला कलंकित करण्याचा प्रयत्नांना आळा घालण्याच्या उद्देशाने संघटने नवे नाव निवडले आहे. 

४) 'COVID-19' हे नवे नाव कोणत्याही भौगोलिक स्थानाचा, प्राण्यांचा, व्यक्तीचा अथवा व्यक्तींच्या विशिष्ट समूहाचा उल्लेख करत नाही.


● कोरोना व्हायरस (Corona Virus)


  • वैद्यकीय शास्त्रज्ञांच्या मते, हा विषाणू प्राण्यांपासून मनुष्यापर्यंत पसरतो.
  • जागतिक आरोग्य संघटनेनुसार (WHO) हा विषाणू समुद्री खाद्यपदार्थांशी निगडीत आहे.
  • प्रसाराची सुरुवात चीनच्या हुबेई प्रांताच्या वुहान (Wuhan, Hubei) शहरातील सीफूड मार्केटमधून झाली. 
  • त्यानंतर, याचे रूग्ण थायलंड, सिंगापूर, जपानमध्येही आढळून आले.

● लक्षणे

कोरोना व्हायरसची लागण झालेल्या व्यक्तीमध्ये ताप, सर्दी, श्वास घेण्यास त्रास होणे, नाक वाहणे, घसा खवखवणे अशी लक्षणे जाणवतात.


● विषाणू (Viruses)


  • हे अपेशीय (Non-celluar/Acellular)सजीव-निर्जीवांच्या 'मध्यस्थितीतील सजीव' आहेत 
  • शोध : दिमीत्री इव्हानोस्की, १८९२ (Dmitry Ivanovsky,1892)
  • 'व्हायरस'असे नामकरण : पाश्चर (Pasteur)
  • संरचना : DNA किंवा RNA चा लांब रेणू व त्याभोवती प्रथिनांचे आवरण
  • अतिसूक्ष्म असून फक्त इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शकाखाली दिसतात 
  • आकार : १० ते १०० नॅनोमिटर (जिवाणूच्या १० ते १०० पट लहान)
  • फक्त इतर सजीव पेशींतच जिवंत राहू शकतात. 
  • त्या पेशींच्या मदतीने स्वतःचे प्रथिने तयार करून असंख्य प्रतिकृती निर्माण करण्याची क्षमता
  • विविध रोगांस कारणीभूत
  • उदा. मानवात : पोलिओ विषाणू, इन्फ्लुएन्झा (Influenza) विषाणू , HIV AIDS चा विषाणू इत्यादी.
  • वनस्पती : टोमॅटो विल्ट, टोबॅको मोझाईक विषाणू इ.
  • जिवाणू : बॅक्टेरिओफेज (Bacteriophage)

● जागतिक आरोग्य संघटना ( WHO : World Health Organization)


  • आंतरराष्ट्रीय सार्वजनिक आरोग्य संबंधित संयुक्त राष्ट्रसंघाची एक विशेष संघटना
  • पूर्वी ‘एजन्सी ऑफ द लीग ऑफ नेशन्स’ म्हणून ओळखली जायची
  • स्थापना : ७ एप्रिल १९४८
  • मुख्यालय : जिनेव्हा, स्वित्झर्लंड (Geneva, Switzerland)
  • 'संयुक्त राष्ट्रसंघ विकास गटा'ची सदस्य संघटना

संदर्भ : who.intnews.un.org, विज्ञान पाठ्यपुस्तक (NCERT) ]

अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण माहितीसाठी वाचा सकाळ करंट अपडेट्स व सकाळ इयरबुक २०२०







Report Page