#Current

#Current



ओडिशात द्वितीय 'बिमस्टेक आपत्ती व्यवस्थापन सराव-२०२०' चे आयोजन


  • दि. ११ ते १३ फेब्रुवारी २०२० दरम्यान ओडिशा राज्यातील भुवनेश्वर आणि पुरी येथे द्वितीय 'बिमस्टेक आपत्ती व्यवस्थापन सराव-2020' (BIMSTEC Disaster Management Exercise -2020) पार पडला.
  • आयोजक : राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल, भारत सरकार (NDRF-National Disaster Response Force, India) 
  • विषय : भूकंप अथवा वादळामुळे अत्यंत गंभीर हानी होणारे सांस्कृतिक वारसा स्थळ ( A Cultural Heritage Site That Suffers Saviour Damage in the Earthquake and Fielding or Storm)
  • ११ फेब्रुवारी रोजी ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन

वैशिष्ट्ये


  • भूकंप आणि पूर परिस्थिती आल्यास कशाप्रकारे तोंड द्यावे आणि होणारे नुकसान कमी करण्यासाठी कोणत्या कृती कराव्यात यांवर भर
  • वारसा ठिकाणांचा अश्या परिस्थितीत कसा बचाव करावा, यावर विशेष मार्गदर्शन आणि प्रात्यक्षिकांचे आयोजन
  • याअंतर्गत, १२ फेब्रुवारीला गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांच्या हस्ते 'कार्यक्षेत्र प्रशिक्षण सरावा'चे (Field Training Exercise) उद्घाटन
  • या प्रशिक्षणात भारत, बांगला देश, नेपाळ, म्यानमार आणि श्रीलंका या देशांचे बचाव दल व संबंधित अधिका-यांचा सहभाग

 बिमस्टेक आपत्ती व्यवस्थापन सराव (BIMSTEC DMEx)


  • बिमस्टेक सदस्यांमध्ये आपत्ती धोका कमी करण्यात सहकार्य आणि समन्वय वाढीस प्रोत्साहन देण्यासाठी, तसेच प्रतिसाद देण्याची क्षमता वाढीस लावण्यासाठी आयोजन
  • पहिला ‘बिमस्टेक आपत्ती व्यवस्थापन सराव-२०१७
  • कालावधी : १० ते १३ ऑक्टोबर २०१७
  • ठिकाण : नवी दिल्ली 

विषय: आपत्तीवर प्रतिसाद म्हणून प्रादेशिक संसाधनांची उपलब्धता करवून देण्यात प्रदेशाची तयारी आणि स्थितिस्थापकता तपासणे (Testing the region’s preparedness and resilience towards effective activation of inter-governmental interaction for immediate deployment of regional resources for disaster response.)


बिमस्टेक (BIMSTEC- Bay of Bengal Initiative for Multi Sectoral Technological and Economic Cooperation)


  • बंगालच्या उपसागरालगत असलेल्या सात देशांचा प्रादेशिक तांत्रिक-आर्थिक गट 
  • सदस्य :बांगला देश, भारत, म्यानमार, श्रीलंका, थायलंड, नेपाळ आणि भूतान
  • स्थापना : ६ जून १९९७ 
  • सचिवालय : ढाका (बांगला देश) 

● राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF- National Disatster Response Force)


  • एखाद्या नैसर्गिक किंवा मानवनिर्मित आपत्तीच्या वेळी होणारी हानी टाळण्यासाठी स्थापना
  • स्थापना : सन २००६, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा, २००५ अंतर्गत (NDM Act, 2005)
  • देशातील विविध स्वरूपात निर्माण होणाऱ्या आपत्तींना तोंड देण्यासाठी भारत सरकारने आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू केला.
  • भारतात सर्वच ठिकाणी हा कायदा लागू
  • कोणतीही दुर्घटना घडल्यानंतर तातडीने बचावकार्य करण्याची जबाबदारी या दलाकडे 
  • कामकाज : केंद्रीय गृह मंत्रालय, भारत सरकार
  • स्थापनेच्या वेळी एनडीआरएफचे देशभरात आठ बटालियन होते. 
  • आता एकूण बटालियन संख्या : १२ (प्रत्येक बटालियनमध्ये सुमारे 1,149 अधिकारी आणि जवान कार्यरत)

संदर्भ: pib.gov.inbimstec.orgndrf.gov.in)

अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण माहितीसाठी वाचा सकाळ करंट अपडेट्स व सकाळ इयरबुक २०२०




Report Page