#Current

#Current



मोहम्मद तौफिक अलावी यांची इराकच्या पंतप्रधानपदी निवड 


  • दि. १ फेब्रुवारी २०२० रोजी इराकचे अध्यक्ष बरहाम सालेह (Barham Salih) यांनी मोहम्मद तौफिक अलावी (Mohammed Tawfiq Allawi) यांची इराकचे नवे पंतप्रधान म्हणून नियुक्ती केली.
  • माजी पंतप्रधान आदेल अब्दुल माहदी (Adel Abdul Mahdi) यांनी राजीनामा दिल्यानंतर चार महिने इराकचे पंतप्रधानपद रिक्त होते. 
  • अलावी यांना मंत्रिमंडळ गठीत करण्यासाठी एक महिन्याच्या वेळ देण्यात आला असून, त्यांना पुढील निवडणुकांपर्यंत कार्यभार सांभाळायचा आहे. 
  • मात्र, पुढील निवडणूका कधी होणार याची तारीख अजून निश्चित करण्यात आलेली नाही.
  • दरम्यान, इराकमध्ये गेल्या चार महिन्यांपासून राजकीयदृष्ट्या स्वतंत्र पंतप्रधान, भ्रष्टाचार आणि आंदोलनाशी संबंधित हिंसाचाराच्या उत्तरदायित्वाची मागणी करणाऱ्या सरकारविरोधी आंदोलने अजूनही सुरू आहेत.
  • या सरकारविरोधी निदर्शनांत सुमारे ५००जणांचा मृत्यू झाला.

● इराकचे माजी पंतप्रधान


  • आदेल अब्दुल माहदी (Adel Abdul Mahdi) - ऑक्टोबर, २०१८ ते नोव्हेंबर, २०१९
  • हैदर अल-अबादी ( Haider al-Abadi) - सप्टेंबर, २०१४ ते ऑक्टोबर, २०१८
  • नूरी अल-मलिकी (Naouri al-Maliki) - मे, २००६ ते सप्टेंबर, २०१४

● मोहम्मद तौफिक अलावी (Mohammed Tawfiq Allawi)यांच्याबाबत 


  • जन्म : १ जुलै १९५४ (बगदाद, इराक), वय : ६५ वर्षे
  • अमेरिकी विद्यापीठ, बैरुत (American University of Beirut) मधून अभियांत्रिकी पदवी
  • २००३ नंतर राजकारणात पदार्पण
  • माजी पंतप्रधान नूरी अल-मलिकी (Nouri al-Maliki) यांच्या मंत्रिमंडळात दोनदा (२००६ व २०१०) दूरसंचार मंत्री 
  • अलावी भ्रष्टाचाराच्या विरोधात कठोर कारवाईसाठी प्रसिद्ध आहेत.
  • २०१२ मध्ये तत्कालीन पंतप्रधान मलिकीवर राजकीय हस्तक्षेप आणि भ्रष्टाचाराचा आरोप करत मंत्रिपदाचा राजीनामा दिला.

 इराक देशाबाबत 


  • इराक मध्यपूर्व (Middle East) प्रदेशातील एक प्रजासत्ताक देश आहे. 
  • राजधानी : बगदाद , राष्ट्रीय चलन : इराकी दिनार 
  • प्रमुख भाषा : अरबी व कुर्दिश 
  • इराकच्या पूर्वेला इराण (कुर्दिस्तान प्रदेश), दक्षिणेला सौदी अरब, आग्नेयेला कुवेत, पश्चिमेला जॉर्डन, वायव्येला सीरिया व उत्तरेला तुर्कस्तान हे देश आहेत.
  • खजुराची निर्यात करण्यात इराकचा जगात पहिला क्रमांक आहे 
  • तैग्रिस नदी ( Tigris river ) आणि युफ्रेटिस नदी ( Euphrates river) या दोन नद्यांमधला प्रदेश म्हणून या देशाला आधी 'मेसोपोटेमिया' (M esopotamia)असे म्हणत.

संदर्भ :iraqiembassy.uspresidency.iq


अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण माहितीसाठी वाचा सकाळ करंट अपडेट्स व सकाळ इयरबुक २०२०



Report Page