#Current

#Current


विवेक प्रसाद व लालरेमसियामी यांना ‘उदयोन्मुख आंतरराष्ट्रीय हॉकीपटू’ पुरस्कार


  • दि. १० फेब्रुवारी २०२० रोजी आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाने (FIH -International Hockey Federation) भारताचा 'विवेक सागर प्रसाद' याची '२०१९ मधील उदयोन्मुख आंतरराष्ट्रीय पुरुष हॉकीपटू’ (2019's Rising Star of the Year) म्हणून निवड केली. 
  • भारताचीच लालरेमसियामी (Lalremsiami) हिची '२०१९ मधील उदयोन्मुख आंतरराष्ट्रीय महिला हॉकीपटू' म्हणून निवड झाली.
  • १९ वर्षीय विवेक आणि लालरेमसियामी यांनी अनुक्रमे एकूण ३४.५ व ४० टक्के मतांसह हा सन्मान आपल्या नावे केला.
  • पुरुषांमध्ये अर्जेटिनाचा मायको कॅसेला (Maico Casella) २२ % आणि ऑस्ट्रेलियाचा ब्लेक गोव्हर्स (Blake Govers) २०.९ % मतांसह अनुक्रमे दुस-या आणि तिस-या स्थानी राहिले. 
  • तर, महिलांमध्ये अर्जेंटिनाची जुलीयेता जनकुनास (Julieta Jankunas) २१.५ % आणि नेदरलँडची फ्रेडरिक मातला (Frederique Matla) १९.८ % मतांसह अनुक्रमेदुस-या आणि तिस-या स्थानी राहिल्या.

विवेकला मिळालेली मते : 

मतदार           मते 

सर्व राष्ट्रीय संघटना   ५० %

प्रसारमाध्यमे       २३ %

चाहते           १५.१ %


लालरेमसियामीला मिळालेली मते : 

मतदार           मते 

सर्व राष्ट्रीय संघटना -  ४७.७%

प्रसारमाध्यमे -      २८.४%

चाहते -          ३६.४%


 पुरुष हॉकीपटू विवेक सागर प्रसाद बाबत  


  • जानेवारी, २०१८ मध्ये भारतीय हॉकी संघात पदार्पण
  • भारतासाठी खेळलेला दुसरा सर्वात कमी वयाचा (17 वर्ष) खेळाडू
  • आतापर्यंत ५८ आंतरराष्ट्रीय सामने खेळले
  • २०१८ च्या युवा ऑलिम्पिकमध्ये भारताच्या 'हॉकी फाईव्ह संघा'चे नेतृत्व

 महिला हॉकीपटू लालरेमसियामी बाबत  


  • २०१७ मध्ये बेलारूसविरुद्धच्या कसोटी सामन्यातून हॉकीमध्ये पदार्पण
  • २०१८ च्या विश्वचषक स्पर्धेतील चमकदार कामगिरीने प्रकाशझोतात
  • २०१७ मध्ये कोरिया आणि २०१९ मध्ये स्पेनविरुध्दच्या कसोटी मालिकेत सर्वाधिक गोल करण्याचा विक्रम

● मागील उदयोन्मुख आंतरराष्ट्रीय हॉकीपटू पुरस्कारप्राप्त पुरुष व महिला 


  •   २०१७ - आर्थर व्हॅन डोरेन, बेल्जियम (Arthur Van Doren, Belgium) - मारिया जोस ग्रॅनाटो, अर्जेंटिना (Maria Jose Granatto, Argentina) 
  • २०१८ - आर्थर डी स्लुव्हर, बेल्जियम ( Arthur de Sloover, Belgium) - ल्युसिना व्होन डर हेदी, अर्जेंटिना (Lucina von de Heyde, Argentina)
  • २०१९ - विवेक सागर प्रसाद, भारत (Vivek Sagar Prasad, India) - लालरेमसियामी, भारत (Lalremsiami, India)
  • २०२०- भारतीय महिला हॉकी संघाची कर्णधार राणी रामपालला 'जागतिक खेळ संस्थे'तर्फे (World Games) यंदाचा 'वर्ल्ड गेम्स सर्वोत्तम खेळाडू’ (World Games Athlete of the Year) पुरस्कार जाहीर झाला आहे.
  •  हा प्रतिष्ठित पुरस्कार पटकावणारी राणी रामपाल जगातील पहिली हॉकीपटू आहे.
  • राणी रामपालला “भारतीय हॉकीची राणी” म्हटले जाते. 
  • २०२०साली राणी रामपालला प्रतिष्ठित 'पद्मश्री' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

● आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघ (FIH-International Hockey Federation)


  • फील्ड हॉकी आणि इनडोर फिल्ड हॉकी खेळांचे आंतरराष्ट्रीय प्रशासकीय मंडळ
  • मुख्यालय : लुसाने, स्वित्झर्लंड ( Lausanne,Switzerland)
  • पाच खंडात एकूण १२८ सदस्य संघ 
  • दर चार वर्षांनी पुरुष हॉकी विश्वचषक (१९७१ सालापासून) व महिला हॉकी विश्वचषक (१९७४ सालापासून) स्पर्धेचे आयोजन

संदर्भ : fih.chhockeyindia.orgtheworldgames.org )


अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण माहितीसाठी वाचा सकाळ करंट अपडेट्स व सकाळ इयरबुक २०२०



Report Page