#Current

#Current


फरिदाबाद येथील राष्ट्रीय वित्तीय व्यवस्थापन संस्थेला माजी अर्थमंत्री दिवंगत अरुण जेटली यांचे नाव देण्याचा केंद्र सरकारचा निर्णय 

  • दिनांक ११ फेब्रुवारी २०२० रोजी फरिदाबाद येथील राष्ट्रीय वित्तीय व्यवस्थापन संस्थेला (The National Institute of Financial Management (NIFM)) माजी वित्तमंत्री अरुण जेटली यांचे नाव देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला 
  • अरुण जेटली राष्ट्रीय वित्तीय व्यवस्थापन संस्था’ असे संस्थेचे नामकरण होईल.
  • 1993 मध्ये या संस्थेची स्थापना झाली 
  • दिवंगत अरुण जेटली यांनी या संस्थेसाठी मोठे योगदान दिले आहे.
  • अरुण जेटली यांनी वस्तू व सेवा कर (जीएसटी) सुरू करणे व त्याची योग्य अंमलबजावणी व देखरेख करण्यात महत्त्वाची भूमिका निभावली 
  • त्यांच्या कार्यकाळात रेल्वे बजेटचे अर्थसंकल्पात विलीनीकरण झाले. 
  • जेटली यांनी दिवाळखोरी आणि दिवाळखोरी संहिता (Insolvency and Bankruptcy Code)याबाबत महत्वपूर्ण दिशादिग्दर्शन केले 


राष्ट्रीय वित्तीय व्यवस्थापन संस्था (NIFM) 


  • राष्ट्रीय वित्तीय व्यवस्थापन संस्था ही देशाच्या सार्वजनिक धोरण, आर्थिक व्यवस्थापन आणि प्रशासनाच्या क्षमता वाढविण्यासाठी तसेच समस्या निर्मूलनासाठी कार्यरत आहे. 
  • १९९३ मध्ये भारत सरकारच्या वित्त मंत्रालयाच्या अंतर्गत नोंदणीकृत संस्था म्हणून एनआयएफएमची स्थापना केली गेली.
  • सुरवातीला केंद्रीय लोकसेवा आयोगा मार्फत (यूपीएससी) भरती केलेल्या अधिकाऱ्यांना प्रशिक्षित करण्याचे काम एनआयएफएमद्वारे केले जात होते 
  • भारत सरकारमधील विविध खाती आणि आर्थिक विभागातील वरिष्ठ आणि उच्च व्यवस्थापन पदांच्या व्यवस्थापनासाठी जबाबदार असलेल्या विविध सेवांसाठी प्रशिक्षित मनुष्यबळ या संस्थेमार्फत पुरवले जात होते  
  • केंद्र सरकारच्या वरिष्ठ आणि मध्यम पातळीच्या व्यवस्थापनासाठीही प्रशिक्षण देण्याचे काम एनआयएफएम करते 
  • एनआयएफएम राज्य सरकारे, संरक्षण आस्थापना, बँका आणि इतर वित्तीय संस्था यांना देखील प्रशिक्षण सेवा पुरवते.
  • वेगवेगळ्या संघटित सेवेतील अधिकारी, वेगवेगळ्या राज्य सरकारसाठी कार्यरत असलेले अधिकारी आणि नागरी व संरक्षण आस्थापनांमधील कर्मचारी यांच्यात संवाद, विचारांची व अनुभवांची देवाणघेवाण करून प्रशासकीय आणि प्रशासकीय सुधारणांमध्ये एनआयएफएम महत्वाची भूमिका निभावते.
  • याखेरीज एनआयएफएम लेखापरीक्षण, आर्थिक व्यवस्थापन, संसदेच्या अंतर्गत आर्थिक बाबी, सार्वजनिक धोरण तसेच वितरण प्रणालीशी संबंधित इतर विषयांवरही संशोधन करते 
  • तसेच या संशोधन अभ्यासाचे निष्कर्ष विविध शोध निबंध, जर्नल्स आणि पुस्तकांद्वारे प्रकाशित आणि प्रसारित करण्याचे काम करते 


राष्ट्रीय वित्तीय व्यवस्थापन संस्थेची रचना 


  • भारत सरकारचे केंद्रीय अर्थमंत्री एनआयएफएम सोसायटीचे अध्यक्ष तसेच खर्च विभागाचे सचिव हे शासन मंडळ (बोर्ड ऑफ गवर्नर्स) के अध्यक्ष असतात 
  • मीना अग्रवाल ह्या राष्ट्रीय वित्तीय व्यवस्थापन संस्थेच्या संचालक आहेत 

संदर्भ : pib.gov.in,nifm.ac.in

अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण माहितीसाठी वाचा सकाळ करंट अपडेट्स व सकाळ इयरबुक २०२० 


--




Report Page