#current

#current



 5 डीआरडीओ युवा वैज्ञानिक प्रयोगशाळांचे पंतप्रधानांकडून लोकार्पण


  • दिनांक 2 जानेवारी 2020 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बंगळुरु इथे संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेच्या 5 युवा वैज्ञानिक प्रयोगशाळांचे लोकार्पण केले.
  • डीआरडीओच्या या पाच प्रयोगशाळा बंगळुरु, मुंबई, चेन्नई, कोलकाता आणि हैदराबाद या पाच शहरांमध्ये आहेत. 
  • या प्रत्येक प्रयोगशाळा कृत्रिम बुद्धिमत्ता, क्वॉन्टम तंत्रज्ञान, कॉग्निटिव्ह तंत्रज्ञान, असिमेट्रिक तंत्रज्ञान आणि स्मार्ट मेटेरियल्स यासारख्या भविष्यातील संरक्षण प्रणालीच्या विकासासाठी महत्वपूर्ण प्रगत तंत्रज्ञानावर काम करणार 

प्रयोगशाळा व क्षेत्र 


  • बंगळुरु -वेगाने विकसित होत असलेल्या कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातील संशोधन 
  • आयआयटी मुंबई- क्वॉन्टम तंत्रज्ञानाचे संशोधन 
  • आयआयटी चेन्नई- कॉग्निटिव्ह तंत्रज्ञानाचे संशोधन 
  • जदावपूर विद्यापीठ,कोलकाता- असिमेट्रिक तंत्रज्ञानाबाबत संशोधन
  • हैदराबाद -स्मार्ट मेटिरियल्स संशोधन 

या प्रयोगशाळा देशातील उदयोन्मुख तंत्रज्ञान क्षेत्रातील संशोधन आणि विकासाच्या रुपरेषेला आकार देण्यात उपयुक्त 

मेक इन इंडिया आणि संरक्षण क्षेत्राला प्रोत्साहन देण्याच्या कार्यक्रमाला बळकटी देण्यात डीआरडीओचे संशोधनाची महत्वपूर्ण भूमिका 

इस्रोने ने 2019 या वर्षी शालेय विद्यार्थ्यांकरिता युवा वैज्ञानिक कार्यक्रम (युविका)या नावाने विशेष कार्यक्रमाची सुरुवात केली आहे 

या कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश हा शालेय विद्यार्थ्यांमध्ये अंतराळ विज्ञानाबत रुची वाढवणे हा आहे 

या कार्यक्रमाच्या माध्यमातून अंतराळ क्षेत्रातील भारताचा भविष्यकालीन विकासाचा पाया मजबूत करायचा आहे 


युवा वैज्ञानिक प्रयोगशाळांची भविष्यकालीन आवश्यकता   


  • संरक्षण तंत्रांवर विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा भरीव परिणाम होत आहे. 
  • आजचे वेगाने विकसित होत चाललेले तंत्रज्ञान विविध पारंपरिक निकषांना सातत्याने आव्हान देत आहे 
  • हे तंत्रज्ञान भविष्यातील संभाव्यतेची कल्पनाही न करता करण्यायोग्य बदलाने आणि वेगाने विकसित होत आहे 
  • या गतीशी उत्साही व चपळ तरूण अधिक परिणामकतेने जुळवून घेऊ शकतात 
  • त्यांची नाविन्यपूर्ण काम करण्याची क्षमता ही भविष्यकालीन राष्ट्राला उपयुक्त ठरणारी आहे 
  • प्रगत व भविष्यकालीन तंत्रज्ञान संशोधन क्षेत्रात काम करण्यासाठी डीआरडीओमध्ये कार्यरत असणाऱ्या ३५ वर्षाच्या आतील 
  • तरुण संशोधकांची निवड करण्यात आली असून त्यांना संधी देण्यात आली आहे 
  • आजच्या घडीला भारत स्टार्टअप्स देश म्हणून उदयास येत असताना या प्रयोगशाळा देशविकासासाठी मोलाच्या ठरणार आहेत 

संदर्भ : drdo.gov.inpib.gov.in 


अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण माहितीसाठी वाचा सकाळ करंट अपडेट्स व सकाळ इयरबुक २०२० 



Report Page