Answer

Answer

Advance Mpsc

#GS_2

#Emergency


Q. 1492 ] खालीलपैकी राज्यघटनेतील कोणत्या दोन कलमांमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याची तरतूद केलेली आहे ?


1) कलम 352 आणि 366

2) कलम 356 आणि 365✅✅✅ अचूक उत्तर

3) कलम 356 आणि 366 

4) कलम 352 आणि 365

▱▰▱▰▱▰▱▰▱▰▱▰

🔰 क - 356 :-राज्यातील घटनात्मक यंत्रणा बंद पडल्यास त्याबाबत तरतुदी :-

▱▰▱▰▱▰▱▰▱▰▱▰

✍ जर राष्ट्रपतींना एखाद्या राज्याचे शासन तरतुदींना अनुसरून चालवणे शक्य नाही अशी परिस्थिती उद्भवली आहे अशी खात्री झाली तर, ते त्या राज्यात राष्ट्रपती राजवट लावण्याची घोषणा करू शकतात.

✍ अशी घोषणा ते संबंधित राज्याच्या राज्यपालांकडून तसा अहवाल प्राप्त झाल्यास किंवा तसा अहवाल प्राप्त न झाल्यासही करू शकतात.

▱▰▱▰▱▰▱▰▱▰▱▰

🔰 क - 365 :- केंद्राच्या निर्देशांचे पालन करण्यात कसूर केल्याचा परिणाम 

▱▰▱▰▱▰▱▰▱▰▱▰

✍ केंद्राने एखाद्या राज्याला दिलेल्या निर्देशांचे पालन करण्यात किंवा त्यांची अंमलबजावणी करण्यात त्या राज्याने कसूर केला तर, राष्ट्रपतींनी असे गृहीत धरणे कायदेशीर होईल की, त्या राज्याचे शासन घटनात्मक तरतुदिंना अनुसरून चालवणे शक्य नाही अशी परिस्थिती आहे.

▱▰▱▰▱▰▱▰▱▰▱▰

[Join @ADVANCEMPSC ]

Report Page