Answer

Answer

Advance Mpsc

From A. K.

#GS_1 

#History_MH 


Q. 1486] मूकनायक पाक्षिकाचे पहिले संपादक कोण होते ?


1) पांडुरंग भाटकर✅✅✅ अचूक उत्तर

2) दिनकर जवळकर

3) ज्ञानदेव घोलप

4) बाबासाहेब आंबेडकर

▱▰▱▰▱▰▱▰▱▰▱▰

🔰 डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता🔰

▱▰▱▰▱▰▱▰▱▰▱▰

🎯 मूकनायक :-

★ समाजाच्या वेदना व विद्रोह प्रकट करण्यासाठी 'मुकनायक' या पाक्षिकाचा

31 जानेवारी, 1920 रोजी जन्म झाला.

 ★ मूक अशा अस्पृश्यांचे नायकपण-नेतेपण आपण स्वीकारल्याचे मूकनायक काढून 1920 साली त्यांनी जाहीर केले. 

★ यासाठी त्यांना राजर्षी शाहू महाराज यांचे आर्थिक सहकार्य लाभले होते. 

★ मूकनायकाचे ध्येय धोरण स्पष्ट करण्यासाठी त्यावर ,

काय करुन आता धरुनिया भीड | नि:शक हे तोड वाजविले ||1||

नव्हे जगी कोण मुकियाचा जाण | सार्थक लाजोनी नव्हे हित ||2||

तुकारामाच्या या ओळी बिरुदावली म्हणून छापल्या जात असे. 


★ वृत्तपत्राचे 'मूकनायक' हे नावही त्यांना ''नव्हे जगी कोणी मुकियाचा जाण'' या चरणावरुन सुचले आहे हे निश्चित.


★ मुकनायचे १ ले संपादक :- श्री पांडुरग नंद्र भाटकर 

२ रे संपादक :- ज्ञानदेव घोलप


★ बाबासाहेब विलायतेला गेले व 1923 मध्ये 'मूकनायक' बंद पडले.


🎯 बहिष्कृत भारत :-


★ बहिष्कृत भारत हे पाक्षिक त्यांनी 3 एप्रिल 1927 रोजी काढले.


★ या पाक्षिकाचे ते स्वत: संपादक होते.


★ दुसऱ्या अंकापासून बहिष्कृत भारतावर बिरुदावली म्हणून ज्ञानदेवांच्या ओव्या उद्धृत केलेल्या असत.


★ या वृत्तपत्रातील सर्व मजकूर बाबासाहेब स्वत: लिहित असत. 


★ लोक वर्गणीदार होऊ शकले नाही. कायमची आर्थिक तरतूद करणे बाबासाहेबांना शक्य झाले नाही. या सर्व व्यापातापामुळे बहिष्कृत भारत 15 नोव्हेंबर, 1929 रोजी बंद पडले.


🎯समता :- 


★ 29 जुन 1928 सुरू केले.


★ समता पत्र "समाज समता संघाचे" मुखपत्र होते.


🎯 जनता :-


★ जनता वृत्तपत्राचा प्रथम अंक 24 नोव्हेंबर 1930 रोजी प्रकाशित झाला. 


★ संपादक श्री. देवराव विष्णू नाईक होते. 


★ जनता प्रारंभी पाक्षिक होते. 31 ऑक्टोबर 1931 रोजी ते साप्ताहिक झाले.


★ या वृत्तपत्राची बिरुदावली म्हणून ''गुलामाला तु गुलाम आहेस असे सांगा म्हणजे तो बंड करुन उठेल'' हे वाक्य होते. 


★ जनता या पत्रात त्यांनी सर्व निकडीचे प्रश्न चर्चिलेच पण जनतेतून विशेष म्हणजे त्यांनी विलायतेहून लिहून पाठविलेली पत्रे प्रकाशित झाली आहेत. 


★ 1955 पर्यंत जनता सुरु होते. या वृत्तपत्राचे संपादक वेळोवेळी बदलले.


 ★ कधी त्यात अनियमितपणा निर्माण झाला पण तरी ते खूप दिवस टिकले. 4 फेब्रुवारी 1956 रोजी जनताचे नामकरण प्रबुद्ध भारत असे करण्यात आले.

▱▰▱▰▱▰▱▰▱▰▱▰

[ Source:- मराठी विश्वकोश, Govt of India, Ministry of E & IT]

Report Page